साऊथ आफ्रिकन टूरिझमने ओटीएम २०२६ मध्‍ये इंडिया ट्रॅव्‍हल ट्रेडला गती दिली, अॅन्‍युअल रोडशो २०२६ सुरू ठेवला आहे

News Service
  • ओटीएम २०२६ मध्‍ये सहभागानंतर बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता व दिल्‍ली येथे बहु-शहरीय इंडिया रोडशो सुरू ठेवला आहे.
  • भारतातील विश्रांतीसाठी केल्‍या जाणाऱ्या प्रवासाला गती देण्‍यासोबत माइस व कॉर्पोरेट प्रवासाला चालना देण्‍याचा मनसुबा.

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२६: साऊथ आफ्रिकन टूरिझमने आऊटबाऊंड ट्रॅव्‍हल मार्केट (ओटीएम) २०२६ मध्‍ये आपला सहभाग यशस्‍वीरित्‍या पूर्ण केला आहे, ज्‍यासह दक्षिण आफ्रिकेसाठी प्रमुख विकास बाजारपेठ म्‍हणून भारताचे स्‍थान अधिक दृढ झाले आहे. जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ओटीएम २०२६ ने पर्यटन मंडळाला गंतव्‍य दक्ष‍िण आफ्रिका दाखवण्‍यासाठी आणि भारतातील ट्रॅव्‍हल ट्रेडसोबत सहयोग अधिक दृढ करण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्म दिला.
२२ प्रदर्शकांसोबत साऊथ आफ्रिकन टूरिझमने भारतातील पर्यटकांसाठी ऑफरिंग्‍जचा वैविध्‍यपूर्ण पोर्टफोलिओ सादर केला, ज्‍यामध्‍ये अनुभवात्‍मक आरामदायी पर्यटन, लक्‍झरी स्‍टे, साहसी व वन्‍यजीव अनुभव आणि जागतिक दर्जाच्‍या माइस पायाभूत सुविधेचा समावेश होता. गौंतेंग, वेस्‍टर्न केप आणि म्‍पुमालंगा यांसारख्‍या प्रांतांनी भारतातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेणे सुरू ठेवले आहे.

भारताच्‍या वाढत्‍या महत्त्‍वाबाबत मत व्‍यक्‍त करत साऊथ आफ्रिकन टूरिझमच्‍या मार्केटिंग अँड कम्‍युनिकेशन्‍स मॅनेजर (एमईआयएसईए) श्रीमती मीताली करमरकर म्‍हणाल्‍या, ”भारतातील पर्यटन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. दक्ष‍िण आफ्रिकेमध्‍ये संपूर्ण माहिती असलेल्‍या व साहसी अनुभवी पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. विश्रांतीसाठी व कुटुंबासोबत घेतल्‍या जाणाऱ्या पर्यटनाच्‍या आनंदाव्‍यतिरिक्‍त आम्‍हाला व्‍यवसाय, माइस आणि मिश्रित ब्लिजर विभागांमधून मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे, ज्‍यासह दक्षिण आफ्रिकेची कॉर्पोरेट पर्यटकांच्‍या भावी पिढीसाठी प्रासंगिकता अधिक दृढ होत आहे.”
२०२५ मध्ये, दक्षिण आफ्रिकेसाठी भारत ७वी सर्वात मोठी परदेशी स्रोत बाजारपेठ आणि एकूण आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत १५व्या क्रमांकावर राहिला. दक्षिण आफ्रिकेमध्ये येणाऱ्या एकूण आंतरराष्‍ट्रीय पर्यटकांपैकी ३.० टक्‍के भारतीय पर्यटक होते, ज्‍यामधून या बाजारपेठेचे वाढते महत्त्व दिसून येते. भारतीय बाजारपेठेने महामारीपूर्व प्रमाणाच्‍या तुलनेत ७३ टक्‍के सुधारणेची नोंद केली, ज्‍यामधून पर्यटनाला मिळत असलेली गती निदर्शनास येते.

ओटीएम २०२६ ने भारतातील ग्राहक आणि दक्षिण आफ्रिकेमधील पुरवठादारांमधील विद्यमान व्‍यवसाय सहयोग दृढ करण्‍याची संधी दिली, तसेच नवीन सहयोगांना चालना दिली. ओटीएम सारखे प्‍लॅटफॉर्म्‍स भारतातील ट्रेड परिसंस्‍थेमध्‍ये गंतव्‍याबाबत माहिती वाढवण्‍यासाठी आणि लांब अंतरापर्यंतच्‍या पर्यटन नियोजनामध्‍ये आत्‍मविश्वास वाढवण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत.
२०२५ मध्‍ये भारतीय पर्यटकांनी विविध कारणांसाठी दक्षिण आफ्रिकेला प्रवास केला, जसे व्यावसायिक प्रवास (२४.५ टक्‍के), मित्र आणि नातेवाईकांना भेट देणे (२२.५ टक्‍के), व्यावसायिक बैठका / माइस (२१.५ टक्‍के) आणि सुट्ट्यांमधील पर्यटन (२०.९ टक्‍के). या वैविध्‍यपूर्ण स्‍वरूपामधून निदर्शनास येते की, भारतातील पर्यटनाची व्‍याप्‍ती आता समकालीन विश्रांतीसाठी केल्‍या जाणाऱ्या प्रवासाच्‍या पलीकडे जात आहे.

व्‍यापारी सहभागाच्‍या महत्त्वावर भर देत श्रीमती करमरकर पुढे म्‍हणाल्‍या, ”साऊथ आफ्रिकन टूरिझमचे लक्ष्‍यित उपक्रम- जसे कॉर्पोरेट थिंक टँक सिरीज, लर्न साऊथ आफ्रिका प्रशिक्षण उपक्रम आणि अॅन्‍युअल इंडिया रोडशोच्‍या माध्‍यमातून सतत सहभाग यामुळे ही गती अधिक वाढली आहे. एकत्रित, हे प्रयत्‍न गंतव्‍याबाबत अधिक माहिती देत आहेत, तसेच भारतातील कॉर्पोरेट व माइस प्रवासाला चालना देत आहेत.”

ओटीएम मुंबईनंतर साऊथ आफ्रिकन टूरिझमने बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्‍ली येथे अॅन्‍युअल इंडिया रोडशो २०२६ सुरू ठेवला आहे, ज्‍यासह बाजारपेठेतील आपली उपस्थिती वाढवत आहे. २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कोविडपूर्व आकडेवारीच्‍या पुढे जाण्‍याचा अंदाज आहे, ज्‍यामुळे पर्यटन मंडळाला भारत त्‍यांच्‍यासाठी वेगाने वाढणारी स्रोत बाजारपेठ म्‍हणून आपला दर्जा कायम ठेवेल¸ अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button