स्‍प्राइटने शर्वरी व सुनिल ग्रोव्‍हर असलेली नवीन टीव्‍हीसी ‘स्‍पाइसी को दे स्‍प्राइट का तडका’

News Service

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्‍ट २०२५: स्प्राइट या प्रतिष्ठित लेमन अँड लाइम-फ्लेवर्ड बेव्‍हरेजने नवीन मोहिम ‘स्‍पाइसी को दे स्‍प्राइट का तडका’ लाँच करत भोजनाचा आस्‍वाद घेण्‍याची नवीन परंपरा सुरू केली आहे. भारतीयांना आवडणाऱ्या मसालेदार चवीमधून ही ब्रँड संकल्‍पना प्रेरित आहे. चटपटीत स्‍पाइस-स्‍प्राइट-स्‍पाइस लूपभोवती डिझाइन करण्‍यात आलेली ही मोहिम स्‍प्राइटला मसालेदार खाद्यपदार्थांसोबत आस्‍वाद घेण्‍यासाठी परिपूर्ण सोबती बनवते, प्रत्‍येक आस्‍वादामध्‍ये अधिक स्‍वाद देत ग्राहकांना अद्वितीय अनुभव देते.

मनोरंजनूपर्ण ब्रँड जाहिरातीमध्‍ये युथ आयकॉन व स्‍प्राइट ब्रँड अॅम्‍बेसेडर शर्वरी उत्‍साही रेस्‍टॉरंटमध्‍ये प्रवेश करते, जेथे कॉमेडी किंग सुनिल ग्रोव्‍हर खेळकरपणे विविध व्‍यक्तिरेखांमध्‍ये मसालेदार खाद्यपदार्थांबाबत सांगतात. प्रत्‍येक मसालेदार खाद्यपदार्थासोबत स्‍प्राइट येते, ज्‍यामुळे मसालेदार खाद्यपदार्थ आवडणाऱ्यांना स्‍प्राइटचा आस्‍वाद घेण्‍याची संधी मिळते. विनोदी व खेळकरपणे ही जाहिरात दाखवते की, स्प्राइटची अद्वितीय चव मसालेदार खाद्यपदार्थांसाठी पूरक असण्‍यासोबत प्रत्‍येक आस्‍वाद अधिक उत्‍साहित करते, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या आवडत्‍या खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेण्‍याचा उत्‍साहपूर्ण मार्ग मिळतो.
कोका-कालो इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या मार्केटिंगच्‍या उपाध्‍यक्ष सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, ”भारतीयांना मसालेदार खाद्यपदार्थ खूप आवडतात, पण त्‍यासोबत योग्‍य पेयाचा आस्‍वाद घेण्‍याबाबत आजही त्‍यांच्‍या मनात प्रश्‍न आहे. यासंदर्भात स्‍प्राइट उपयुक्‍त ठरते. चटपटीत, लेमन-लाइम चव थंडावा देण्‍यासोबत मसालेदार खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेण्‍याचा अनुभव अधिक उत्‍साहित करते. ‘स्‍पाइसी को दे स्‍प्राइट का तडका’सह आम्‍ही या धमाल जोडीला सादर करत आहोत, तसेच स्‍प्राइटसाठी नवीन मार्ग तयार करत आहोत, दीर्घकालीन संबंधाची सुरूवात करत आहोत, जेथे आम्‍हाला विश्वास आले की, ही जोडी जनरेशन झेडसोबत दृढ नाते निर्माण करण्‍यास मदत करेल.”

शर्वरी म्‍हणाल्‍या, ”स्‍प्राइटने धमाल व अगदी समर्पक ‘स्‍पाइसी को दे स्‍प्राइट का तडका’ मोहिमेसह पुन्‍हा एकदा आपला दर्जा दाखवला आहे. मला आवडलेली बाब म्‍हणजे स्‍प्राइट नेहमी उत्‍साहवर्धक मोहिमा घेऊन येते, ज्‍या प्रत्‍येक वेळी नवीन आणि उत्‍साहवर्धक वाटतात. ब्रँड म्‍हणून स्‍प्राइटचा जनरेशन झेडसोबत संलग्‍न होण्‍याचा मनसुबा आहे आणि ही जाहिरात त्‍याचे आणखी एक परिपूर्ण उदाहरण आहे. मसालेदार खाद्यपदार्थांसोबत स्प्राइटचा आस्‍वाद घेण्‍याची संकल्‍पना चवीला आणखी उत्तम बनवते. मी सर्वांना या संयोजनाचा आस्‍वाद घेताना पाहण्‍यास अत्यंत उत्सुक आहे.”

सुनिल ग्रोव्‍हर म्‍ळणाले, ”माझ्यासाठी उत्तम आहार उत्‍साहवर्धक अनुभव देतो आणि या मोहिमेमधून तो अनुभव मिळतो. मी मसालेदार खाद्यपदार्थांना कधीच नाही म्‍हणू शकत नाही आणि त्‍यांच्‍यासोबत स्‍प्राइटचा आस्‍वाद घेणे अद्वितीय अनुभव आहे. जाहिरातीची शूटिंग करताना खूप धमाल आली आणि स्‍प्राइटसाठी असलेले प्रेम अधिक वाढज्ले आहे.”

”भारतीयांना मसालेदार खाद्यपदार्थांची असलेली आवड अद्वितीय आहे आणि जनरेशन झेडसाठी हे सन्‍मानाचे प्रतीक आहे,”असे ऑगिल्‍व्‍ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणाले. ”आम्‍हाला पूर्णत: नवीन पद्धतीने त्‍या आवडीशी संलग्‍न होण्‍याची अविश्वसनीय संधी दिसली. ‘स्‍पाइसी को दे स्प्राइट का तडका’ फक्‍त मोहिम नाही तर स्‍प्राइटचा अद्वितीयरित्‍या आस्‍वाद घेण्‍याचे आवाहन आहे.”

या मोहिमेचा भाग म्‍हणून स्‍प्राइट लोकप्रिय फूड व स्‍नॅकिंग ब्रँड्ससोबत सहयोग करत आहे, जसे चिंग्‍स, मास्‍टरचाऊ, बिंगो, जोलेचिप्‍स, वाव! चायना आणि टू यम. यामधून सर्वसमावेशक उपक्रम आणि को-ब्रँडेड अनुभव मिळेल आणि मसालेदार खाद्यपदार्थांसाठी परिपूर्ण सोबती म्‍हणून स्‍प्राइटची भूमिका वाढेल. मसालेदार खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घ्‍यायचा असेल तर ‘स्‍पाइसी को दे स्‍प्राइट का तडका’सह त्‍यांचा आस्वाद घ्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button