मुंबई: स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) यांनी स्कोडा कायलाकच्या ५०,००० युनिट्सच्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या गाठला असून, यामधून कंपनीची केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमावरील ठाम वचनबद्धता अधोरेखित होते. २०२५ मध्ये कंपनीने नोंदवलेल्या ३६ टक्के वर्ष-दर-वर्ष वाढीत कायलाकचे योगदान लक्षणीय राहिले आहे. भारतातील संचालनाचे प्रमाण वाढवणे तसेच लोकलायझेशनच्या स्तरात सातत्याने वाढ करणे या धोरणांमुळे हा टप्पा साध्य करण्यात एसएव्हीडब्ल्यूआयपीएलला यश मिळाले आहे.

या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या औचित्याने आयोजित समारंभात केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री, मा. श्री. एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले, “उत्पादनातील हा लक्षणीय टप्पा गाठल्याबद्दल तसेच ‘मेड इन इंडिया’ उपक्रमाप्रती अखंड वचनबद्धता दाखवल्याबद्दल मी स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे अभिनंदन करतो.”
यावेळी स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पियुष अरोरा म्हणाले, “या महत्त्वपूर्ण सोहळ्यास माननीय मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी यांनी उपस्थित राहून शोभा वाढवल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. कायलाकच्या ५०,००० युनिट्सच्या उत्पादनाचा टप्पा पार होणे हे आमच्या ग्राहकांनी या वाहनावर दाखवलेल्या विश्वासाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. एमक्यूबी-ए०-इन प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेल्या कायलाकच्या यशातून ‘भारतासाठी आणि जगासाठी भारतात डिझाइन केलेल्या’ वाहनांना देश-विदेशातील ग्राहकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाची स्पष्ट प्रचिती येते.”
कायलाकच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने आपल्या चाकण येथील उत्पादन प्रकल्पाची क्षमता ३० टक्क्यांनी वाढवली असून, लोकलायझेशनचा स्तर अधिक उंचावण्यासाठी स्थानिक पुरवठादारांसोबतचे सहकार्यही मजबूत केले आहे. हा उपक्रम स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन समूहाच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याचा एक भाग असून, यामधून स्थानिक अभियांत्रिकी कौशल्ये आणि सोर्सिंग क्षमतांचा विकास करण्यावरील समूहाचा ठाम भर दिसून येतो.
एसएव्हीडब्ल्यूआयपीएलसाठी कायलाकच्या उत्पादनातील ही सिद्धी ही भारतातील स्थानिक कौशल्य विकसित करण्यासाठी आणि सशक्त, एकात्मिक ऑटोमोटिव्ह इकोसिस्टम उभारण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिपाक आहे. मॉडेल पोर्टफोलिओचा विस्तार करताना आणि देशभरातील उत्पादन क्षमतांमध्ये वाढ करत असताना, समूह लोकलायझेशन आणि उत्पादनातील उत्कृष्टतेला सातत्याने प्राधान्य देत आहे.
चाकण येथील उत्पादन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्रोतांचा वापर करून विकसित करण्यात आलेली कायलाक ही गाडी भारताच्या इंजिनियरिंग, प्रॉडक्ट डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातील वाढत्या क्षमतांचे प्रभावी प्रतिबिंब आहे. एसएव्हीडब्ल्यूआयपीएलची पहिली सब-४-मीटर एसयूव्ही असलेल्या कायलाकने २०२५ मध्ये समूहाने नोंदवलेल्या ३६ टक्के वर्ष-दर-वर्ष वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा अशा टप्प्यावर साध्य झाला आहे, जेव्हा कंपनीने उत्पादनाचा विस्तार, स्पर्धात्मक किंमत धोरण आणि दीर्घकालीन पुरवठा भागीदारी मजबूत करण्यावर धोरणात्मक लक्ष केंद्रित केले आहे.