एपीजे सत्या आर्ट फेस्टिव्हल २०२४ (क्रिएटिव्ह कॅस्केड्स) “Creative Cascades” कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत समुह कला प्रदर्शनाचे आयोजन

समुह कला प्रदर्शनकालावधी: २ ते ७ डिसेंबर २०२४स्थळ : कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, नरिमन पॉईंट मुंबईवेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ एपीजे एज्युकेशन द्वारा प्रस्तुत एका सामूहिक कला प्रदर्शनाचे आयोजन केले असून हे प्रदर्शन कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, नरिमन पॉईंट मुंबई ४०००२१ येथे २ ते ७ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ ह्या कालावधीत रोज सर्वांना विनामूल्य बघता येईल. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन २ डिसेंबर २०२४ रोजी कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, मुंबई येथे संध्याकाळी ६ वाजता प्रमुख अतिथि – श्रीमती सुषमा पॉल बर्लीआ – चेअरमन एपीजे एज्युकेशन ह्यांच्या हस्ते होईल. त्यावेळी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर रसिक कलाप्रेमी, संग्राहक उपस्थित राहतील. ह्या प्रदर्शनात कलेच्या क्षेत्रातील मान्यवर कलाकार, विद्यार्थी, संशोधक तसेच रचनात्मक शैलीत आपल्या कलाकृती तयार करणारे प्रथितयश चित्रकार, शिल्पकार वगैरेंच्या कलाकृती ठेवण्यात येतील.      एपीजे एज्युकेशन ही संस्था डॉ. सत्यपॉल ह्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी सुरु केली व तिच्या छत्रछायेत हल्ली २६, प्रथितयश कलाशिक्षण व प्रसार करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. हा वारसा त्यांची सुपुत्री श्रीमती सुषमा पॉल बर्लीआ समर्थपणे सांभाळत असून ए पी जे सत्या व सर्वण ग्रुप, एपीजे सत्या  विद्यापीठ सोहना, गुरुग्राम हरयाणा, ए पी जे कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स, जालंधर, पंजाब व ए पी जे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, नवी दिल्ली वगैरे कलाप्रवर्तक संस्थांच्या माध्यमातून ते आर्ट फॉउंडेशन गेली ५० वर्षे कला शिक्षणाचे व  प्रसाराचे करीत आहे. ह्यासाठी ठिकठिकाणी कला प्रदर्शनाचे व कलामहोत्सवांचे ती संस्था नेहमी आयोजन करीत असते आणि त्याद्वारे अनेक होतकरू व गुणवान कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्याद्वारे त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा प्रसार ती संस्था करते. अशा प्रकारे तिने आजवर ललित कला अकादमी, नवी दिल्ली, रशियन वकालत, नवी दिल्ली, हॉटेल अशोका, नवी दिल्ली वगैरे ठिकाणी ह्या प्रकारे कलामहोत्सवांचे आयोजन केले असून त्याद्वारे अनेक गुणवान कलाकारांना त्यांची कला रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी बहुमोल मदत केली आहे. त्यात चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, छायाचित्रण वगैरेचा समावेश होतो.     प्रस्तुत प्रदर्शनात विविध माध्यमातील चित्रे व शिल्पाकृती, ड्रॉईंग्ज, टॅपेस्ट्रीएस, टेराकोटामधील कलारूपे, छायाचित्रे वगैरे ठेवण्यात येतील. त्यात मुख्यतः तैलरंग, जलरंग, एक्रिलिक रंग, मिक्स मीडिया, टेराकोटा ह्यातील कलाकृती व छायाचित्रे ह्यांचा समावेश राहील. विविध कलासंस्थांमधील चित्रकलेचे अध्ययन करणारे विद्यार्थी, संशोधक तसेच होतकरू कलाकार ह्यांनी विविध माध्यमांच्या व तंत्रांचा वापर करून तयार केलेली कलारूपे वास्तववादी शैली, निम्न अमूर्त शैली व अमूर्त शैली ह्यामध्ये असून त्यात निसर्गवैभव, व्यक्तिचित्रे, भावपुर्ण चित्रे, ऐतिहासिक वास्तूंचे महत्व विशद करणारी चित्रे, धार्मिक स्थळे व संकल्पना दर्शविणारी चित्रे, जीवनाचे वास्तव दर्शविणारी चित्रे सादर केली आहेत.

error: Content is protected !!
Call Now Button