स्‍मार्टपणे टॅप करा, व्हिसासह सुरक्षित राहा: सुरक्षित कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्ससाठी ५ टिप्‍स

News Service

कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्समध्‍ये स्‍थानिक किराणा स्‍टोअर्सपासून क्विक मेट्रो राइड्सपर्यंत भारतीयांच्‍या पेमेंट करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याची क्षमता आहे. कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट जलद, सोपे व सुरक्षित आहे. आत्‍मविश्‍वासाने टॅप करत पेमेंट करण्‍यास मदत करण्‍यासाठी व्हिसा व्‍यावहारिक टिप्‍स सांगत आहेत, ज्‍यामुळे तुम्‍ही सुरक्षितपणे व कार्यक्षमपणे कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्स करू शकता.

  1. स्विच ऑन करा आणि स्‍मार्टपणे पेमेंट करा: तुमच्‍या मोबाइल बँकिंग अॅपमध्‍ये लॉग इन करा आणि कॉन्‍टॅक्‍टलेस व्‍यवहार करा. तुम्‍ही टॅप करून पेमेंट करण्‍याची मर्यादा देखील सेट करू शकता.
  2. टॅप करण्‍यापूर्वी दोन वेळा तपासा: कार्ड टॅप करण्‍यापूर्वी पीओएस टर्मिनलवरील रक्‍कम तपासा, ज्‍यामुळे व्‍यस्‍त, गर्दी असलेल्‍या स्‍टोअर्समध्‍ये चुकीच्या रकमेचे पेमेंट होणार नाही.
  3. ५,००० रूपयांपेक्षा जास्‍त पेमेंटसाठी पिन क्रमांकचा वापर करा: आरबीआय मार्गदर्शकतत्त्वांनुसार ५,००० रूपयांपर्यंतच्‍या कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्ससाठी पिन क्रमांकाची गरज नाही. पण या मर्यादेपेक्षा अधिक रकमांसाठी पिन क्रमांक प्रविष्‍ट करत टॅप आणि पे करू शकता, ज्‍यामधून विनासायास व जलद चेकआऊट्सची खात्री मिळते.
  4. स्‍मार्टफोनवर टॅप टू पे कार्यान्वित करा: लोकप्रिय, विश्‍वसनीय डिजिटल पेमेंट अॅप्‍सवर तुमच्या व्हिसा कॉन्‍टॅक्‍टलेस कार्ड तपशीलाची भर करा आणि तुमच्‍या एनएफसी सक्षम फोनचा वापर करत आत्‍मविश्‍वासाने टॅप व पेमेंट करा.
  5. व्‍यवहाराबाबत अलर्ट्स कार्यान्वित करा: एसएमएस व अॅप नोटिफिकेशन्‍स सुरू ठेवा, ज्‍यामुळे तुम्‍हाला अगदी लहान व्‍यवहारांसह प्रत्‍येक व्‍यवहाराबाबत त्‍वरित अलर्ट्स मिळतील. यामुळे त्‍वरित संशयास्‍पद शुल्‍कांना ओळखण्‍यास मदत होते आणि त्‍यांना थांबवण्‍यासाठी बँकेला कळवता येते.

व्हिसाच्‍या या स्‍मार्ट टिप्‍ससह गतीशील, सोईस्‍कर आणि उच्‍च दर्जाच्‍या सुरक्षित कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्सचा आनंद घ्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button