टाटा मोटर्स आणि व्‍हर्टेलो यांनी इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहनांसाठी आकर्षक लीजिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍याकरिता सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या

News Service

मुंबई, १५ मे २०२५: टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी आणि व्‍हर्टेलो ही बीस्‍पोक इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदाता यांनी देशभरातील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहने अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यासाठी दोन्‍ही कंपन्‍यांदरम्‍यानच्‍या सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षऱ्या केल्‍याची घोषणा केली. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून व्‍हर्टेलो सानुकूल लीजिंग सोल्‍यूशन्‍स देईल, ज्‍यामुळे ताफा मालकांना शाश्‍वत गतीशीलतेमध्‍ये सहजपणे परिवर्तन करण्‍यास मदत होईल. हे सोल्‍यूशन्‍स संपूर्ण टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल पोर्टफोलिओला लागू असतील.
या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, “टाटा मोटर्स इलेक्ट्रिक गतीशीलतेचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, तसेच सर्व ग्राहकांना शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍स उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेत आहे. व्‍हर्टेलोसोबतचा हा सहयोग त्‍या प्रवासाच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे, जो आमच्‍या प्रगत इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्‍स मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून देतो. अशा सहयोगांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍सच्‍या अवलंबनाला गती देत आहोत, तसेच भारतात प्रबळ ईव्‍ही इकोसिस्‍टमच्‍या विकासाप्रती योगदान देखील देत आहोत.”

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत व्‍हर्टेलोचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप गंभीर म्‍हणाले, “आम्‍हाला बसेस्, ट्रक्‍स आणि मि‍नी-ट्रक्‍स अशा इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीमध्‍ये ईव्‍ही अवलंबनाला गती देण्‍यासाठी टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. हा सहयोग बीस्‍पोक लीजिंग सोल्‍यूशन्‍स देईल आणि शाश्‍वत इकोसिस्‍टमची निर्मिती सोपी करेल, ज्‍यामुळे व्‍यावसायिक ताफा ऑपरेटर्ससाठी इलेक्ट्रिक गतीशीलता स्‍वाभाविक निवड बनेल. हा सहयोग टाटा मोटर्स आणि व्‍हर्टेलो यांना इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्‍सच्‍या अवलंबनाला गती देण्‍यास, तसेच मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक गतीशीलता सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यास सक्षम करेल.”

टाटा मोटर्स लास्‍ट-माइल मोबलिटीमध्‍ये टाटा एस ईव्‍ही आणि मास-मोबिलिटी सोल्‍यूशन्‍समध्‍ये टाटा अल्‍ट्रा व टाटा स्‍टारबस रेंज देते. कंपनीने टाटा प्राइमा ई.५५५, टाटा अल्‍ट्रा ई.१२, टाटा मॅग्‍ना ईव्‍ही बस, टाटा अल्‍ट्रा ईव्‍ही ९ बस, टाटा इंटरसिटी ईव्‍ही २.० बस, टाटा एस प्रो ईव्‍ही आणि टाटा इण्‍ट्रा ईव्‍ही देखील दाखवल्‍या आहेत, ज्‍या प्रॉडक्‍ट लाइन्‍समध्‍ये व्‍यापक उपयोजन आणि ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करत आहेत. नाविन्‍यता व शाश्‍वततेवरील प्रबळ फोकससह टाटा मोटर्स ट्रक्‍स, बसेस् व स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍समधील आपला इलेक्ट्रिक सीव्‍ही पोर्टफोलिओ विस्‍तारित करत आहे. वाढत्‍या चार्जिंग पायाभूत सुविधा, प्रबळ सर्विस नेटवर्क आणि फ्लीट अपटाइम व खर्च ऑप्टिमाइज करण्यासाठी कनेक्‍टेड प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजच्‍या पाठिंब्‍यासह टाटा मोटर्स भारतातील शाश्‍वत परिवहन क्रांतीचे नेतृत्‍व करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button