शून्य उत्सर्जन ताफा १.४ लाख टनहून अधिक कार्बन डायऑक्साईड टेलपाइप उत्सर्जनाची बचत करते
मुंबई, ९ जानेवारी २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादन कंपनीने आज घोषणा केली की, त्यांचा ३,१०० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा १० शहरांमध्ये सुरक्षित, आरामदायी व सुखकर सार्वजनिक परिवहन सेवा देत आहे. या ताफ्याने एकत्रित २५ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे, जे पृथ्वीभोवती ६२०० वेळा परिभ्रमण करण्याइतके आहे!
प्रतिदिन सरासरी २०० किमी अंतर पार करत ई-बसेसनी वायू प्रदूषण कमी करण्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये हरित मास मोबिलिटी देण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. एकत्रित, टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्याने २५ कोटी किमी अंतर पार करण्यासह जवळपास १.४ लाख टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाची बचत करण्यामध्ये मदत केली आहे.
या उपलब्धीची घोषणा करत टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री. आसिम कुमार मुखोपाध्याय म्हणाले, ”आम्हाला उत्सर्जन-मुक्त इलेक्ट्रिक बसेसच्या आधुनिक ताफ्याच्या माध्यमातून २५ कोटी किमी अंतर पार करण्याचा हा टप्पा संपादित करताना आनंद होत आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये प्रभावी १५ कोटी किमी अंतर पार करण्यात आले, ज्यामधून प्रवाशी व राज्य परिवहन उपक्रमाकडून शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्ससाठी वाढती पसंती दिसून येते. आम्ही त्यांनी दाखवलेला विश्वास व पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना मास मोबिलिटी सुरक्षित, स्मार्टर व हरित बनवण्याप्रती आमच्या कटिबद्धतेची खात्री देतो.”
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेस समकालीन परिवहनासाठी शाश्वत, पर्यावरणपूरक व कार्यक्षम पर्याय देतात. डेटा-संचालित कार्यसंचालने व मेन्टेनन्ससह ताफा ९५ टक्क्यांहून अधिक अपटाइम देते, ज्यामधून टाटा मोटर्सच्या ई-बस मोबिलिटी सोल्यूशनची विश्वसनीयता आणि मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, जम्मू, श्रीनगर, लखनौ, गुवाहाटी व इंदौर येथील लाखो प्रवाशांना दररोज सुखकर, सुरक्षित व आरामदायी प्रवास देण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.
प्रत्येक टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसमध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जसे आरामदायी प्रवासासाठी सुलभ एअर सस्पेंशन, विकलांग प्रवाशांसाठी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या हायड्रॉलिक लिफ्ट्स आणि एर्गोनॉमिक सीटिंग. ९-मीटर व १२-मीटर कन्फिग्युरेशन्समध्ये उपलब्ध या इलेक्ट्रिक बसेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रबळ कार्यक्षमतेचे विनासायास एकत्रिकरण आहे.