मुंबई, १८ जून, २०२५: भारताच्या शाश्वत गतीशीलता आणि चक्रिय अर्थव्यवस्थेप्रती परिवर्तनाला चालना देण्याच्या आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ करत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज लखनौ (उत्तर प्रदेश) आणि रायपूर (छत्तीसगड) येथे दोन अत्याधुनिक Re.Wi.Re – रिसायकल विथ रिस्पेक्ट – रजिस्टर्ड वेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीजच्या (आरव्हीएसएफ) उद्घाटनाची घोषणा केली. माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन (व्हर्च्युअली) करण्यात आले. या सुविधा एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्सचे सुरक्षितपणे व जबाबदारीने विघटन करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. या सुविधा सर्व ब्रँड्सच्या दुचाकी व तीन-चाकींसह पॅसेंजर आणि कमर्शियल वेईकल्सच्या स्क्रॅपिंगची हाताळणी करण्यासाठी सुसज्ज आहेत.

या संस्मरणीय प्रसंगी मत व्यक्त करत माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, “मला लखनौ आणि रायपूरमध्ये दोन रजिस्टर्ड वेईकल स्कॅपिंग फॅसिलिटीजचे उद्घाटन करण्याचा आनंद होत आहे. ही आधुनिक केंद्रे नॅशनल वेईकल स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत प्रगतीशील पाऊल आहेत, जी नागरिकांना संरचित इन्सेटिव्ह्जच्या माध्यमातून शुद्ध, अधिक इंधन कार्यक्षम वेईकल्सना प्राधान्य देण्यास सक्षम करते. या फॅसिलिटीज अनफिट वेईकल्सचे सुरक्षितपणे विघटन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, तसेच वैज्ञानिक रिसायकलिंगसाठी बहुमूल्य साहित्याला रिकव्हर करतील. मी टाटा मोटर्सचे शाश्वततेप्रती त्यांच्या स्थिर कटिबद्धतेसाठी, तसेच देशभरात आरव्हीएसएफ पायाभूत सुविधा स्थापित करण्यासाठी कौतुक करतो, ज्या जागतिक मानकांशी संलग्न आहेत. यासारखे प्रगतीशील उपक्रम प्रबळ परिसंस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत, जी वेईकल स्क्रॅपेज देशभरात सहजसाध्य, कार्यक्षम आणि प्रभावी करते.”

टाटा मोटर्सची सहयोगी रायपूर ग्रीन एनर्जी प्रा. लि. रायपूर आरव्हीएसएफच्या कार्यसंचालनावर देखरेख ठेवेल आणि या सुविधेची प्रतिवर्ष जवळपास २५,००० वेईकल्स सुरक्षितपणे विघटन करण्याची क्षमता आहे. लखनौमधील सुविधा दरवर्षाला जवळपास १५,००० वेईकल्स स्क्रॅप करू शकते आणि मोटो स्क्रॅपलँड प्रा. लि. या फॅसिलिटीच्या कार्यसंचालनावर देखरेख ठेवते.
Re.Wi.Re – रिसायकल विथ रिस्पेक्ट उपक्रमाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, “शाश्वतता टाटा मोटर्समध्ये फक्त कटिबद्धता नाही तर गतीशीलतेच्या भविष्याला आकार देणारे मुलभूत आधारस्तंभ देखील आहे. चक्रिय अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांद्वारे मार्गदर्शित आम्ही जबाबदार व पर्यावरणपूरक पद्धतींप्रती स्थिरपणे प्रयत्न करतो. देशभरात Re.Wi.Re फॅसिलिटीजच्या व्यापक नेटवर्कसह टाटा मोटर्स आता दरवर्षाला जवळपास १.७५ लाख एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्सचे जबाबदारीने विघटन करण्यास सुसज्ज आहे. आम्ही या दृष्टिकोनाला वास्तविकतेत आणण्यासाठी आमचे सहयोगी, राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांच्या अविरत पाठिंबा व सहयोगासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. मी विशेषत: भारतात शाश्वत गतीशीलता व वेईकल रिसायकलिंगला प्रगत करण्यामध्ये सतत नेतृत्व व प्रोत्साहन देण्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करतो.”
या विस्तारीकरणासह टाटा मोटर्स आता जयपूर, भुवनेश्वर, सुरत, चंदिगड, दिल्ली एनसीआर, पुणे, गुवाहाटी, रायपूर, लखनौ आणि कोलकाता येथे १० वेईकल-स्क्रॅपिंग सेंटर्सचे कार्यसंचालन पाहते. प्रत्येक Re.Wi.Re सुविधा पूर्णत: डिजिटलाइज आहे आणि सर्व कार्यसंचालने विनासायास व पेपरलेस आहेत. या सुविधा कमर्शियल वेईकल्स, दुचाकी व तीन-चाकींसाठी सेल-टाइप डिस्मॅन्टलिंग आणि पॅसेंजर वेईकल्ससाठी लाइन-टाइप डिस्मॅन्टलिंगसह (विघटन) सुसज्ज आहेत. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्टेशन्स आहेत. प्रत्येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्सच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेल्या प्रखर डॉक्यूमेन्टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. यामधून देशातील वेईकल स्क्रॅपेज धोरणानुसार सर्व घटकांचे सुरक्षित विघटन होण्याची खात्री मिळते. Re.Wi.Re. सुविधा ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.