टाटा मोटर्सकडून 17 नेक्‍स्‍ट-जनरेशन ट्रक्‍स लाँच

News Service
  • सुरक्षितता, लाभक्षमता आणि प्रगतीसाठी नवीन मानक स्‍थापित केले
  • अझुरा सिरीज सादर —​​आयएलएमसीव्ही विभागासाठी उत्कृष्टतेची नवीन व्याख्या
  • टाटा Trucks.ev – भारतातील व्‍यापक इलेक्ट्रिक ट्रक श्रेणी लाँच, जी आय-एमओईव्‍ही आर्किटेक्‍चर – इंटेलिजण्‍ट मॉड्युलर लेक्ट्रिक वेईकल आर्किटेक्‍चरवर आधारित आहे
  • टाटा ट्रक्स.ईव्ही लाँच — भारतातील इलेक्ट्रिक ट्रकची सर्वात विस्तृत श्रेणी, ट्रकिंगमधील इलेक्ट्रिक क्रांतीला गती देत​​आहे
  • भारतीय रस्त्यांवर जागतिक दर्जाची सुरक्षा आणत आहे – कठोर युरोपियन सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यासाठी बनवलेले ट्रक
  • उद्योग-सर्वोत्तम पेलोड, इंधन कार्यक्षमता आणि फ्लीट एज डिजिटल सेवांसह ग्राहकांची नफाक्षमता वाढवते

नवी दिल्‍ली२० जानेवारी २०२६: भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक व गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आज आपल्‍या 17 ट्रक्‍सचा नेक्‍स्‍ट-जनरेशन पोर्टफोलिओ लाँच केला. हे ट्रक्‍स ७ टन ते ५५ टन कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहेत. यासह सुरक्षितता, नफा व प्रगतीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केले आहे. या सर्वसमावेशक लाँचमध्‍ये ऑल-न्‍यू अझुरा सिरीज, अत्‍याधुनिक टाटा Trucks.ev श्रेणी आणि प्रस्‍थापित प्राइमा, सिग्‍ना व अल्‍ट्रा प्‍लॅटफॉर्म्‍समधील मोठ्या अपग्रेड्सचा समावेश आहे. जागतिक सुरक्षितता मानकांचे (ECE R29 03) काटेकोरपणे पालन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे ट्रक्‍स उत्‍पन्‍न क्षमता वाढवतात, एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करतात आणि वेईकल अपटाइम वाढवतात, ज्‍यामुळे वाहतूकदारांना मोठे यश मिळते.

Mr. Girish Wagh, MD & CEO, Tata Motors Ltd, along with Mr. Rajesh Kaul, Vice President and Business Head – Trucks, and Mr. Aniruddha Kulkarni, Head-Engineering, launch the all new ‘Azura’ range, the company’s latest offering in the ILMCV segment

नवीन ट्रक्स लाँच करत टाटा मोटर्स लि.चे एमडी व सीईओ श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत आहे, ज्‍याला प्रगतीशील राष्‍ट्रीय धोरणे, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षित, अधिक स्‍वच्‍छ व अधिक कार्यक्षम लॉजिस्टिक्‍ससाठी वाढत्‍या मागणीने गती दिली आहे. टाटा मोटर्स मापदंड स्‍थापित करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी आहे, जे उद्योगाच्‍या भविष्‍याला आकार देतात. लाँच करण्‍यात आलेल्‍या आमच्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन पोर्टफोलिओमध्‍ये ऑल-न्‍यू अझुरा सिरीज, दोन प्रगत उच्‍च-कार्यक्षम पॉवरट्रेन्‍स, आमच्‍या नवीन आय-एमओईव्‍ही आर्किटेक्‍चरवर आधारित भारतातील शून्‍य-उत्‍सर्जन इलेक्ट्रिक ट्रक्‍स व ट्रिपर्सची व्‍यापक श्रेणी, युरोपियन मानक केबिन्‍स व उद्योग-अग्रणी सुरक्षितता वैशिष्‍ट्यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड्स, अधिक पेलोड क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश आहे, जे सर्व फ्लीट एज डिजिटल सेवांसह एकीकृत करण्‍यात आले आहेत. यासह आम्‍ही या वारशाला अधिक पुढे नेत आहोत. ‘बेटर ऑल्‍वेज’ तत्त्वामधून प्रेरित आमची नाविन्‍यतेप्रती अविरत मोहिम, स्‍थानिकीकरणाप्रती दृढ कटिबद्धता आणि ग्राहकांना यशस्‍वी करण्‍यावरील निरंतर फोकस ‘आत्‍मनिर्भर भारत’च्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहेत, ज्‍यामुळे शाश्वत गतीशीलतेमध्‍ये नेतृत्‍व करण्‍याप्रती भारताचा आत्‍मनिर्भरपणा व महत्त्वाकांक्षा अधिक दृढ झाली आहे.”

Mr. Girish Wagh, MD & CEO, Tata Motors Ltd, along with Mr. Rajesh Kaul, Vice President and Business Head – Trucks, and Mr. Aniruddha Kulkarni, Head-Engineering, launch the country’s widest range of electric trucks

सादर आहे अझुरा – आयएलएमसीव्ही (ILMCV) विभागासाठी उत्कृष्टतेची नवीन व्याख्या.

टाटा मोटर्सने ऑल-न्‍यू अझुरा श्रेणीला प्रदर्शित केले. ही श्रेणी इंटरमीजिएट व लाइट कमर्शियल वेईकल विभागात उच्‍च दर्जाची कार्यक्षमता, आरामदायीपणा आणि अपटाइम देण्‍यासाठी उद्देशासह डिझाइन करण्‍यात आली आहे. उत्‍पादकता, सुरक्षितता व आरामदायीपणाला चालना देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या अझुरामध्‍ये आकर्षकतेसह उद्देशपूर्ण वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे ड्रायव्हिंग करताना थकवा न येता उत्‍साहवर्धक अनुभव मिळतो.

दर्जात्‍मक कामगिरी व कार्यक्षमता देणा-या नवीन ३.६-लिटर डिझेल इंजिनची शक्‍ती असलेला अझुरा विश्वसनीयता व अपटाइमसाठी नवीन मापदंड स्‍थापित करतो. अझुरा श्रेणी ७ टन ते १९-टन कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये सादर करण्‍यात येईल, जी ई-कॉमर्स व एफएमसीजी वितरणापासून व्‍हाइट गुड्स डिलिव्‍हरी, बांधकाम साहित्‍याची वाहतूक, कृषी व औद्योगिक सामानांची वाहतूक, तसेच इंटरसिटी, मध्‍यम अंतराच्या व प्रादेशिक लॉजिस्टिक्‍सपर्यंत विविध उपयोजनांसाठी अनुकूल आहे.

भारतातील रस्‍त्‍यावर जागतिक दर्जाची सुरक्षितता आणली

टाटा मोटर्सने रस्‍ता सुरक्षिततेसाठी नवीन मापदंड स्‍थापित केले आहे, जेथे ECE R29 03 जागतिक क्रॅश सेफ्टी मानकांची (युरो क्रॅश नॉर्म्‍स) पूर्तता करण्‍यासाठी आपल्‍या संपूर्ण ट्रक पोर्टफोलिओसह सिग्‍ना, प्राइमा, अल्‍ट्रा आणि ऑल-न्‍यू अझुरा श्रेणीमध्‍ये सर्वसमावेशक अपग्रेड केले आहे. या ट्रक्‍समध्‍ये संपूर्ण पुढील बाजूस, रोलओव्‍हर व साइड-इम्‍पॅक्‍टपासून संरक्षणासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या केबिन्‍स आहेत, तसेच जवळपास भारतातील रस्‍त्‍यांना अनुसरून २३ पर्यंत प्रगत सक्रिय सुरक्षितता तंत्रज्ञान आहेत, जसे अॅडप्टिव्‍ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि कोलिजन मिटीगेशन सिस्‍टम्‍स. नेक्‍स्‍ट-जनरेशन कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजच्‍या माध्‍यमातून ड्रायव्हिंग वर्तणूकीवर रिअल-टाइम देखरेख सुरक्षिततेमध्‍ये अधिक वाढ करते, ज्‍यामुळे टाटा मोटर्स या प्रख्‍यात आंतरराष्‍ट्रीय मानकांची पूर्तता करणा-या आपल्‍या ट्रक्‍समध्‍ये अधिक सुधारणा करणारी भारतातील एकमेव उत्‍पादक कंपनी ठरली आहे.

उद्योगातील सर्वोत्तम पेलोडइंधन कार्यक्षमता आणि फ्लीट व्‍यवस्‍थापनासह नफ्यामध्‍ये वाढ

कमाईची क्षमता वाढवण्यासाठी आणि मालकीचा एकूण खर्च कमी करण्यासाठी डिझाइन केलेले, टाटा मोटर्सच्या ट्रक श्रेणीमध्ये केलेले अपग्रेड्स मूर्त फायदे देतात, जे थेट नफा वाढवतात. स्मार्ट सुधारणांमुळे पेलोड क्षमता १.८ टनांपर्यंत वाढली आहे, तर प्रगत ६.७-लिटर कमिन्स डिझेल इंजिनच्या नेतृत्वाखालील ड्राइव्हट्रेन अपग्रेडमुळे 7% पर्यंत अधिक इंधन कार्यक्षमता मिळते.

या अभियांत्रिकी सुधारणांना पूरक डिजिटली सक्षम सपोर्ट इकोसिस्‍टम आहे, जी फ्लीट दृश्‍यमानता आणि अपटाइम वाढवते. फ्लीट एज प्रोयोरिटीच्‍या लाँचसह ग्राहकांना आता त्‍यांच्‍या फ्लीटबाबत अधिक माहिती मिळू शकते, जसे रिअल-टाइम वेईकल हेल्‍थबाबत माहिती, अंदाजात्‍मक विश्‍लेषण आणि ट्रिप व्‍यवस्‍थापनाला सानुकूल करण्‍यासाठी सल्‍ले.

एकत्रितपणे, हे नावीन्यपूर्ण बदल वाहतूकदारांना प्रत्येक गुंतवणुकीवर अधिक नफा मिळवण्यासाठी उत्कृष्ट पेलोडचा फायदा, लक्षणीय इंधन बचत आणि मालमत्तेचा इष्टतम वापर करून देतात.

टाटा Trucks.ev: ट्रकिंगमधील इलेक्ट्रिक क्रांतीला चालना

भारताच्‍या हरित लॉजिस्टिक्‍सप्रती परिवर्तनाला गती देत टाटा मोटर्सने टाटा Trucks.ev ब्रँडअंतर्गत नवीन आय-एमओईव्‍ही (इंटेलिजण्‍ट मॉड्युलर इलेक्ट्रिक वेईकल) आर्किटेक्‍चरवर आधारित ७ टन ते ५५ टन कन्फिग्‍युरेशन्‍समधील इलेक्ट्रिक ट्रक्‍सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ लाँच केला. हे ट्रक्‍स ई-कॉमर्स, बांधकाम व पोर्ट (बंदर) उपयोजनांमधील शाश्वत कार्यसंचालनांसाठी डिझाइन करयात आले आहेत. या परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी आहे भारतातील ७-टन, ९-टन व १२-टन कन्फिग्‍युरेशन्‍समधील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक लाइट ट्रक्‍स अल्‍ट्रा ईव्‍ही श्रेणी, जी शहरी, प्रादेशिक व क्‍लोज-लूप उपयोजनांमध्‍ये शून्‍य-उत्‍सर्जन कार्यक्षमतेची खात्री देते. अद्वितीय ४७० केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ४५३ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी क्षमता असलेला प्राइमा ई.५५एस प्राइम मूव्‍हर हेवी-ड्युटी कार्यक्षमता आणि कमी ऑपरेटिंग खर्चांसाठी नवीन मापदंड स्‍थापित करतो. प्राइमा ई.२८के ट्रिपर पोर्टफोलिओला अधिक प्रबळ करतो, जेथे खाणकाम व बांधकामसाठी सर्वोच्‍च टॉर्क आणि शक्तिशाली क्षमता देतो, ज्‍यामुळे महत्त्वपूर्ण कार्यसंचालनांसाठी जलद टर्नअराऊंड चक्र आणि परिपूर्ण डिकार्बनायझेशनची खात्री मिळते.

टाटा ट्रक्स.ईव्ही श्रेणी प्रगत ईव्ही आर्किटेक्चर, इंटेलिजेंट बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि स्वदेशी बनावटीचे व उत्पादित महत्त्वाचे घटक वापरून, सखोल स्थानिकीकरणाद्वारे विकसित करण्यात आली आहे. यामुळे ई-ट्रकिंग अधिक सुलभ, विश्वासार्ह आणि भारतीय व्यवसायांच्या विविध गरजा व रस्त्यांच्या परिस्थितीनुसार अचूकपणे तयार होते. विविध प्रकारच्या सानुकूलित वित्तपुरवठा पर्यायांची उपलब्धता, वेगाने वाढणारी चार्जिंग इकोसिस्टम आणि देशभरात स्मार्ट, विश्वासार्ह चार्जिंग सोल्यूशन्सची अंमलबजावणी, हे सर्व अखंड आणि कार्यक्षम ई-ट्रकिंग कार्यान्वित करण्यासाठी उत्पादनाच्या विकासाच्या प्रयत्नांना पूरक ठरते.

टाटा मोटर्स अॅडवाण्‍टेज: परिपूर्ण समाधान

जागतिक दर्जाचे ट्रक्‍स व डिजिटल सोल्‍यूशन्‍स व्‍यतिरिक्‍त ग्राहकांना टाटा मोटर्सच्‍या Sampoorna Seva 2.0 परिसंस्‍था आणि व्यापक सर्विस नेटवर्कमधून फायदा मिळतो, जे २४x७ सपोर्ट, खात्रीदायी पार्ट्सची उपलब्‍धता, कनेक्‍टेड फ्लीट एज सेवा, एएमसीसह ड्राय‍व्‍हर प्रशिक्षण आणि कार्यक्षम ताफा व्‍यवस्‍थापनासाठी सर्वोत्तम फायनान्सिंग सेवा देतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button