टाटा मोटर्सकडून नवीन एलपीटी ८१२ लाँच, नफ्यामध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केले

News Service

भारतातील पहिला ५-टन पेलोडसह ४-टायर असलेला ट्रक शहरी मालवाहतूकीला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल

मुंबई, ३ सप्‍टेंबर २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज इंटरमीजीएट, लाइट अँड मेडियम कमर्शियल वेईकल्‍स (ILMCV) श्रेणीमधील नवीन टाटा एलपीटी ८१२च्‍या लाँचची घोषणा केली. ऑपरेशनल कार्यक्षमता आणि एकूण मालकीहक्‍क खर्चामध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करत टाटा एलपीटी ८१२ ची उच्‍च पेलोड क्षमता आहे. हा ट्रक ताफा मालकांना अधिक नफा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

फॅक्‍टरीमध्‍ये बसवण्‍यात आलेल्‍या एअर-कंडिशनिंगसह सुसज्‍ज LPT 812 भारतातील पहिला ५-टन प्रमाणित पेलोडसह ४ टायर असलेला ट्रक आहे, जो शहरामध्‍ये सुलभ कार्यसंचालनासह अद्वितीय पेलोड क्षमता देतो. टाटा मोटर्सच्‍या प्रमाणित एलपीटी प्‍लॅटफॉर्मवर डिझाइन करण्‍यात आलेला हा ट्रक ६ टायर असलेल्‍या वेईकलच्‍या मजबूतीसह ४ टायर ट्रकची कार्यक्षमता, गतीशीलता आणि कमी देखभाल देतो. विविध लोड बॉडी पर्यायांसह ऑफर करण्‍यात आलेला हा ट्रक औद्योगिक सामान, बाजारपेठेतील सामान, एफअँडव्‍ही, कूरिअर अशा विविध उपयोजनांसाठी वापरता येऊ शकतो.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, “टाटा एलपीटी ८१२ चे लाँच श्रेणीमध्‍ये ग्राहकांच्‍या नफ्यात नवीन मापदंड स्‍थापित करतो. हा श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणारा ट्रक सुधारित उत्‍पादकतेसाठी वाढत्‍या गरजेची पूर्तता करतो, तसेच उच्‍च दर्जाची इंधन कार्यक्षमता, सहज कार्यसंचालन आणि अधिकतम अपटाइम देतो. यामधून बाजारपेठेतील बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍याप्रती आणि ग्राहकांसाठी दीर्घकालीन व्‍यवसाय वाढीला चालना देणारे प्रगत सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

विश्वसनीय 4SPCR डिझेल इंजिनची शक्‍ती असलेला टाटा LPT 812, 125hp आणि 360Nm टॉर्क देतो, ज्‍यामधून उच्‍च दर्जाच्‍या कामगिरीसह उच्‍च इंधन कार्यक्षमतेची खात्री मिळते. या ट्रकमध्‍ये सहजपणे गिअरशिफ्टसाठी ५-स्‍पीड गिअरबॉक्‍स आणि बूस्‍टर-सहाय्यक क्‍लच आहे, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर ड्रायव्हिंग करताना थकवा येत नाही. प्रभावी लोड वाहून नेण्‍यासाठी सुधारित ब्रेकिंग आणि हेवी-ड्युअी रॅडियल टायर्सच्‍या माध्‍यमातून सुरक्षितता व टिकाऊपणा वाढवण्‍यात आला आहे. अधिक आरामदायीपणा व हाताळणीसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या ट्रकमध्‍ये पॅराबोलिक फ्रण्‍ट सस्‍पेंशनसह अॅण्‍टी-रोल बार, फुल एस-कॅम एअर ब्रेक्‍स आणि टिल्‍ट व टेलिस्‍कोपिक पॉवर स्‍टीअरिंग आहे. ३-वर्ष / ३ लाख किमी वॉरंटीच्‍या पाठबळासह एलपीटी ८१२ ताफा मालकांना दीर्घकालीन विश्वसनीयता, समाधान आणि प्रबळ मूल्‍याची खात्री देतो.

टाटा मोटर्स ४ ते १९ टन GVW आयएलएमसीव्‍ही श्रेणीमध्‍ये उत्‍पादनांची व्‍यापक रेंज देते. वेईकल्‍स प्रबळपणे डिझाइन करण्‍यात येतात आणि ग्राहकांच्‍या विविध उपयोजनांमध्‍ये गरजांची पूर्तता करण्‍यासाठी प्रखरपणे चाचणी करण्‍यात येतात. पोर्टफोलिओला पूरक कंपनीच्‍या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सर्वसमावेशक वेईकल जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासाठी मूल्‍यवर्धित सेवांची श्रेणी आहे. टाटा मोटर्सचे सानुकूल ताफा व्‍यवस्‍थापनासाठी नेक्‍स्‍ट जनरेशन डिजिटल सोल्‍यूशन फ्लीट एजचा फायदा घेत ऑपरेटर्स वेईकल अपटाइम वाढवू शकतात आणि एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करू शकतात. भारतातील ३२०० हून अधिक टचपॉइण्‍ट्सच्‍या सर्वात मोठ्या सर्विस नेटवर्ककडून २४x७ तास पाठिंब्‍यासह टाटा मोटर्स आपल्‍या वेईकल्‍ससाठी सर्वोच्‍च अपटाइम देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button