टाटा मोटर्स एक्‍सकॉन २०२५ मध्‍ये नाविन्‍यपूर्ण, शाश्वत आणि सर्वोत्तम गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन करत आघाडीवर

News Service

आपला सर्वात शक्तिशाली टिपर ‘प्रिमा 3540.K’ लाँच केला; डीप माइनिंग क्षेत्रात प्रवेशाची नोंद
विश्वसनीय, किफायतशीर व उच्‍च-अपटाइम ऑपरेशन्‍ससाठी डिझाइन केलेल्‍या प्रगत अॅग्रीगेट्सचे प्रदर्शन

बेंगळुरू, ९ डिसेंबर २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने दक्षिण आशियामधील प्रमुख बांधकाम उपकरण प्रदर्शन एक्‍सकॉन २०२५ मध्‍ये प्रगत सोल्‍यूशन्‍सच्‍या वैविध्‍यपूर्ण पोर्टफोलिआचे अनावरण केले, ज्‍यासह कंपनीचा देशातील झपाट्याने विस्‍तारित होत असलेल्‍या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्राला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे. आपली थीम ‘प्रॉडक्टिव्‍हीटी अनलीश’शी बांधील राहत कंपनीने ऑपरेशनल कार्यक्षमता व ताफ्याची लाभक्षमता वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या हेवी-ड्युटी, भविष्‍यासाठी तयार वेईकल्‍सना लाँच केले आहे. या लाँचेसमध्‍ये अग्रस्‍थानी आहे टाटा मोटर्सचा सर्वात शक्तिशाली ट्रिपर प्राइमा ३५४०.के ऑटोशिफ्ट, जो गहरी खाणकामामधील उपयोजनांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. यासोबत ऑल-इलेक्ट्रिक प्राइमा ई.२८के आणि भारतातील पहिला फॅक्‍टरी-फिटेड सीएनजी टिपर Signa 2820.TK सीएनजी देखील लाँच करण्‍यात आले आहेत. यासोबत औद्योगिक इंजिन्‍स, अॅक्‍सल्‍स व जेनसेट्स अशा अॅग्रीगेट्सचे सर्वसमावेशक प्रदर्शन देखील करण्‍यात आले आहे, ज्‍यासह टाटा मोटर्सची नाविन्‍यता व शाश्वततेप्रती कटिबद्धता अधिक प्रबळ झाली आहे.

एक्‍सकॉल २०२५ मध्‍ये व्‍यावसायिक वाहने लाँच करत टाटा मोर्ट्स लिमिटेडच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”एक्‍सकॉन टाटा मोटर्सकरिता प्रगत अभियांत्रिकी व ग्राहक-केंद्रित सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण व्‍यासपीठ आहे. आम्‍ही भारतातील विकसित होत असलेल्‍या बांधकाम व गहरी खाणकाम क्षेत्राला पाठिंबा देण्‍यासाठी हे सोल्‍यूशन्‍स सादर करत आहोत. देशभरात पायाभूत सुविधा विकसित करण्‍याला सक्रियपणे गती मिळाली असताना ग्राहक विश्वसनीय, उच्‍च-उत्‍पादनक्षम ऑफरिंग्‍जचा शोध घेत आहेत, जे ऑपरेशनल कार्यक्षमता आणि लाभक्षमता वाढवतात. प्रमुख प्राइमा ३५४०.के लाँच करत आम्‍हाला सर्वात आव्‍हानात्‍मक स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या उद्देश-केंद्रित सोल्‍यूशनसह गहरी खाणकाम क्षेत्रात प्रवेश करण्‍याचा अभिमान वाटतो. शाश्वत गतीशीलतेप्रती आमची कटिबद्धता अधिक प्रबळ करत आम्‍हाला आमचा पहिला ऑल-इलेक्ट्रिक टिपर प्राइमा ई.२८के लाँच करण्‍याचा आनंद होत आहे, जो शक्‍ती किंवा उत्‍पादकतेबाबत तडजोड न करता शून्‍य-उसर्जनासह कार्यक्षमता देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.”
टाटा मोटर्सने प्रबळ अभियांत्रिकी व प्र कठोर सत्यापन पाठबळ असलेल्‍या अॅग्रीगेट्सच्‍या व्‍यापक श्रेणीचे देखील अनावरण केले. विश्वसनीय, दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे अॅग्रीगेट्स बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील विविध उपयोजनांसाठी साह्य करतात.

अॅग्रीगेट्स पोर्टफोलिओचे अनावरण करत टाटा मोटर्स लिमिटेडच्‍या स्‍पेअर्स अँड नॉन-वेईक्‍युलर बिझनेसचे प्रमुख श्री. विक्रम अग्रवाल म्‍हणाले, ”एक्‍सकॉन २०२५ मध्‍ये आमच्‍या अॅग्रीगेट ऑफरिंग्‍जच्‍या प्रदर्शनामधून शक्तिशाली, विश्वसनीय आणि ग्राहक-केंद्रित सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता दिसून येते. हे सोल्‍यूशन्‍स बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्‍ये विनासायास कार्यसंचालनांसाठी मदत करतात. लाँच करण्‍यात आलेले आमचे नवीन १५ केव्‍हीए व ३५ केव्‍हीए जेनसेट्स आणि CEV BS V औद्योगिक इंजिन्‍सच्‍या विस्‍तारित श्रेणीसह आम्‍ही प्रदर्शन, अपटाइम और परिचालन दक्षता आमचा फोकस अधिक प्रबळ करत आहोत. आम्‍ही ऑफरिंग्‍जसह आमचा पोर्टफोलिओ अधिक वाढवत राहू, जे आमच्‍या ग्राहकांच्‍या कार्यसंचालनांना कार्यक्षम, उत्‍पानदक्षम आणि भविष्‍याकरिता तयार ठेवतील.”

टाटा मोटर्सचे प्रदर्शन
व्‍यावसायिक वाहने
• टाटा प्राइमा ३५४०.के ऑटोशिफ्ट: कमिन्‍स ८.५ लिटर इंजिनची शक्‍ती असलेला हा उच्‍च दर्जाची इंधन कार्यक्षमता आणि विश्वसनीयतेसह खाणकाम कार्यसंचालनांसाठी ३७५ एचपी आणि १८०० एनएम टॉर्क देतो. या मधील १२-स्‍पीड एएमटी सुलभ कार्यक्षमतेची खात्री देते, तसेच आव्‍हानात्‍मक हेवी-हॉलेज उपयोजनांसाठी प्रीमियम केबिन आणि प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत.
• प्राइमा ई.२८के: हा २८-टन बॅटरी-इलेक्ट्रिक टिपर कमी खोल असलेले खाणकाम, खनिजांची वाहतूक, मोठ्या प्रमाणात सामानाची वाहतूक आणि पोर्टमधील उपयोजनामध्‍ये उच्‍च-अपटाइम, शून्‍य-उत्‍सर्जन उपयोगासांठी डिझाइन करण्‍यात आला आहे.
• सिग्‍ना 2820.टीके सीएनजी: भारतातील २८-टन श्रेणीमधील पहिला फॅक्‍टरी-फिटेड सीएनजी टिपर कमी टीसीओ व उच्‍च लाभक्षमता देतो, ज्‍यामुळे शाश्वत बांधकाम कार्यसंचालनांसाठी उपयुक्‍त आहे.
• सिग्‍ना ४८३२.टीके: देशातील पहिला ४८-टन, ५-अॅक्‍सल टिपर 32m³ लोड बॉडीसह सुसज्‍ज आहे, जो कोळशाच्‍या वाहतूकीसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यासह प्रतिट्रिप उच्‍च पेलोडची खात्री मिळते.
• प्राइमा ३५३२.टीके: विभागातील 26m³ सर्वाधिक आकारमानाची लोड बॉडी असलेला प्राइमा ३५३२.टीके बांधकामामधील अॅग्रीगेट्स सरफेस वाहतूकीसाठी उपयुक्‍त आहे.
• प्राइमा ई.५५एस: बॅटरी-इलेक्ट्रिक प्राइम मूव्‍हर लॉजिस्टिक्‍स कार्यसंचालनांना डिकार्बनाइज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. जवळपास ३५० किमी रेंज देणाऱ्या या प्राइम मूव्‍हरमध्‍ये ३-स्‍पीड ई-अॅक्‍सलसह ट्रॅक्‍शन मोटर आहे, जी दर्जात्‍मक ग्रेड-अॅबिलिटी आणि कार्यक्षमता देते.

अॅग्रीगेट्स आणि जेनसेट्स
• टाटा मोटर्स जेनसेट्स: नवीन सादर करण्‍यात आलेले १५ केव्‍हीए आणि ३५ केव्‍हीए जेनसेट्स आहेत, जे कार्यक्षम इंजिन्‍सवर डिझाइन करण्‍यात आले आहेत, तसेच विविध उपयोजनांसाठी प्रमाणित १२५ केव्‍हीए आहे.
• टाटा मोटर्स औद्योगिक इंजिन्‍स: CEV BS V -प्रमाणित इंजिन बॅकहो लोडर्स, सेल्फ-लोडिंग कॉंक्रिट मिक्‍सर्स आणि इतर बांधकाम उपकरणासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ‍
• टाटा मोटर्स लाइव्‍ह अॅक्‍सल्‍स: आव्‍हानात्‍मक ड्युटी सायकल्‍समध्‍ये टिकाऊप्‍णा, उच्‍च लोड-बेअरिंग क्षमता आणि विश्वसनीय कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.
• टाटा मोटर्स ट्रेलर अॅक्‍सल्‍स व कम्‍पोनण्‍ट्स: प्राइम मूव्‍हर्ससोबत सहजपणे एकीकरणासाठी प्रबळ श्रेणीमध्‍ये ट्रेलर अॅक्‍सल्‍स, आफ्टर-ट्रीटमेंट व युरिया सिस्‍टम्‍स आहेत.
टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहनांना Sampoorna Seva 2.0 उपक्रमांतर्गत मूल्‍य-वर्धित सेवांच्‍या प्रबळ श्रेणीचे पाठबळ आहे, जेथे ग्राहक अपटाइम व कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी सर्वसमावेशक जीवनचक्र व्‍यवस्‍थापन दिले जाते. या सेवेला टाटा मोटर्सचे नेक्‍स्‍ट-जनरेशन डिजिटल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजसह प्रबळ करण्‍यात आले आहे, जे स्‍मार्ट ताफा व्‍ववस्‍थापन, सुधारित अपटाइम आणि मालकीहक्‍काचा एकूण कमी खर्च देते, जेथे भारतातील व्‍यापक सेवा नेटवर्कच्‍या माध्‍यमातून २४x७ सहाय्यता दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button