राज्य परिवहन उपक्रमाकडून एलपीओ १६१८ बस चेसिसच्या १,२९७ युनिट्सची नवीन ऑर्डर मिळवली
मुंबई, १८ डिसेंबर २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज उत्तरप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (यूपीएसआरटीसी) १,२९७ बस चेसिसची ऑर्डर मिळाल्याची घोषणा केली आहे. एका वर्षात यूपीएसआरटीसीकडून टाटा मोटर्सला मिळालेली ही तिसरी ऑर्डर आहे, जेथे एकूण ऑर्डर आकार ३,५०० हून अधिक युनिट्सपर्यंत पोहोचला आहे. एलपीओ १६१८ चेसिससाठी ऑर्डर स्पर्धात्मक ई-बिडिंग (ई-लिलाव) प्रक्रियेच्या माध्यमातून मिळाली आणि बस चेसिस परस्पर मान्य केलेल्या अटींनुसार टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येतील.
टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस चेसिस विशेषत: आंतरशहरीय व लांब अंतरापर्यंत प्रवास करणाऱ्या वेईकल्सकरिता डिझाइन करण्यात आले आहे. हे चेसिस त्यांची उच्च दर्जाची कार्यक्षमता, प्रवासी आरामदायीपणा आणि टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीपसाठी (टीसीओ) ओळखले जातात.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्सच्या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस. म्हणाले, ”आम्हाला बस चेसिसच्या आधुनिक ताफ्याचा पुरवठा करण्याची संधी देण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकार आणि यूपीएसआरटीसीचे आभार व्यक्त करतो. या ऑर्डरमधून दर्जात्मक गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती आमची प्रबळ कटिबद्धता दिसून येते. आमची सातत्यपूर्ण कामगिरी आणि यूपीएसआरटीसीच्या विकसित होत असलेल्या परिवहन गरजांची पूर्तता करण्याच्या क्षमतेमधून आमची तंत्रज्ञान क्षमता, तसेच सार्वजनिक परिवहन इकोसिस्टमधील विश्वसनीयता निदर्शनास येते. आम्ही यूपीएसआरटीसीच्या मार्गदर्शनानुसार पुरवठा सुरू करण्यास उत्सुक आहोत.”
डिसेंबर २०२३ मध्ये १,३५० युनिट्सची आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये १,००० युनिट्सची यशस्वी ऑर्डर संपादित करण्यासह ही नवीन ऑर्डर विविध एसटीयू आणि ताफा मालकांसाठी पसंतीची गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता म्हणून टाटा मोटर्सचे स्थान अधिक दृढ करते. कंपनीच्या मास-मोबिलिटी ऑफरिंग्ज देशातील सार्वजनिक परिवहन नेटवर्क्सच्या महत्त्वपूर्ण भाग आहेत, जे भारतभरातील शहरी व ग्रामीण क्षेत्रांना कनेक्ट करतात आणि लाखो नागरिकांना विनासायास गतीशीलतेची सुविधा देतात.