मुंबई, ऑक्टोबर २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने देशातील लांब पल्ल्याच्या व हेवी-ड्युटी ट्रकिंगकरिता एलएनजी (लिक्विफाइड नॅच्युरल गॅस) रिफ्यूएलिंग परिसंस्था मजबूत करण्यासाठी भारतातील आघाडीची सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनी थिंक गॅससोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सहयोगाचा पायाभूत सुविधा सुसज्जता वाढवण्याचा, इंधन दर्जाबाबत अधिक जागरूकतेचा प्रसार करण्याचा आणि एलएनजी-समर्थित व्यावसायिक वाहनांच्या व्यापक अवलंबनाला सक्षम करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे शुद्ध व अधिक डिकार्बनाइज्ड मालवाहतूक कार्यसंचालनांच्या दिशेने परिवर्तनाला गती मिळेल.

या सहयोगाचा भाग म्हणून टाटा मोटर्स थिंक गॅससोबत कसून काम करत एलएनजी पायाभूत सुविधा विस्तारीकरणासाठी संभाव्य मालवाहतूक मार्ग व लॉजिस्टिक्स क्लस्टर्सना ओळखेल. थिंक गॅस इंधन दर्जा व पुरवठा विश्वसनीयतेचे उच्च मानक राखण्यावर लक्ष केंद्रित करेल, तसेच सानुकूल वाहन कामगिरी व कार्यक्षमतेची खात्री घेईल. टाटा मोटर्स ग्राहकांना विशेष फायद्यांसह प्राधान्य किमती देखील देण्यात येतील.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, ”भारत शाश्वत व कार्यक्षम मालवाहतूक हालचालीच्या दिशेने वाटचाल करत असताना एलएनजी लांब पल्ल्याच्या व हेवी-ड्युटी ट्रकिंगसाठी लक्षवेधक सोल्यूशन सादर करते. एलएनजीची क्षमता लवकर ओळखत आम्ही प्रबळ सोल्यूशन्स विकसित केले आहेत, जे उच्च इंधन कार्यक्षमता, कमी उत्सर्जन आणि उच्च दर्जाची कामगिरी देतात. थिंक गॅससोबत या सहयोगाच्या माध्यमातून आमचे परिसंस्थेची सुसज्जता मजबूत करण्याचे ध्येय आहे, ज्यामधून विश्वसनीयपणे रिफ्यूएलिंग पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याची खात्री मिळेल आणि ताफा ऑपरेटर्स आत्मविश्वासाने एलएनजीचा अवलंब करण्यास सक्षम होतील. हा सहयोग भारतातील व्यावसायिक वाहन उद्योगासाठी शुद्ध, भविष्याकरिता सुसज्ज गतीशीलता सोल्यूशन्स प्रगत करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेमधील आणखी एक पाऊल आहे.”
थिंक गॅसचे प्रतिनिधीत्व करत वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख (एलएनजी फ्यूएल) श्री. सोमिल गर्ग म्हणाले, ”थिंक गॅसमध्ये आमचा संपूर्ण भारतात शुद्ध इंधन सहजसाध्य व किफायतशीर करण्याचा मनसुबा आहे. पर्यायी-इंधन गतीशीलता प्रगत करण्यामध्ये अग्रणी टाटा मोटर्ससोबत सहयोग आम्हाला धोरणात्मकरित्या आमचे विस्तारीकरण वाढवण्यास मदत करेल. आमचे जागतिक गुंतवणूकदार आय-स्क्वेअर्ड कॅपिटल, ओसाका गॅस, सूमिटोमो कॉर्पोरेशन, Konoike ट्रान्सपोर्ट, जॉइन यांच्या पाठबळासह आम्ही देशभरात प्रबळ, सुरक्षित आणि शाश्वत एलएनजी नेटवर्क निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
टाटा मोटर्स बॅटरी इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन इंटर्नल कम्बशन आणि हायड्रोजन फ्यूएल सेल अशा पर्यायी इंधन तंत्रज्ञानांद्वारे समर्थित नाविन्यपूर्ण गतीशीलता सोल्यूशन्स विकसित करण्यामध्ये अग्रस्थानी आहे. कंपनीचा स्मॉल कमर्शियल वेईकल्स, ट्रक्स, बसेस व व्हॅन्स अशा विविध श्रेणींमध्ये पर्यायी-इंधनाची शक्ती असलेल्या व्यावसायिक वाहनांचा प्रबळ पोर्टफोलिओ आहे.
थिंक गॅस सध्या १८ लिक्विफाइड व कम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस (एलसीएनजी) स्टेशन्सचे कार्यसंचालन पाहते, तसेच विविध अतिरिक्त स्टेशन्सचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्यांचा प्रस्तावित एलसीएनजी कॉरिडर देशभरातील प्रमुख औद्योगिक केंद्रे, कृषी प्रांत आणि लॉजिस्टिक्स केंद्रांना कनेक्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा कॉरिडर महत्त्वपूर्ण परिवहन मार्गांची पूर्तता करेल, ज्यामुळे उत्पादन, वेअरहाऊसिंग, निर्यात आणि कृषी पुरवठा साखळी यामध्ये कार्यरत असलेल्या ताफ्यांसाठी कार्यक्षम व विश्वसनीय LNG फ्यूएलिंग उपलब्ध होईल.