२५० पेटंट सादरीकरणे आणि १४८ डिझाइन एप्लिकेशन्ससोबत ऑटोमोटिव्ह सर्वोत्तमतेला चालना
राष्ट्रीय, 17 एप्रिल २०२५: भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २५० पेटंट आणि १४८ डिझाइन अर्ज दाखल करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे – ही एका वर्षातील आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. या अर्जांमध्ये कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिफिकेशन, सस्टेनेबिलिटी आणि सेफ्टी (सेस) सारखे प्रमुख ऑटोमोटिव्ह मेगाट्रेंड्स तसेच हायड्रोजन-आधारित वाहने आणि इंधन सेल्स सारख्या नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेले उत्पादन आणि प्रक्रिया उपक्रमांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ते बॅटरी, पॉवरट्रेन, बॉडी आणि ट्रिम, सस्पेंशन, ब्रेक, एचव्हीएसी आणि उत्सर्जन नियंत्रण यांसह विविध वाहन प्रणालींचा समावेश करतात. कंपनीने वर्षभरात ८१ कॉपीराइट अर्ज दाखल केले आणि ६८ पेटंट अनुदाने मिळवली. त्यामुळे कंपनीचे एकूण मंजूर पेटंट ९१८ झाले.
गतिशीलतेच्या भविष्याचा पाया रचत टाटा मोटर्स त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांसह ऑटोमोटिव्ह क्षेत्रांत बेंचमार्क स्थापित करत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये दाखल झालेल्या पेटंट आणि डिझाइन अर्जांची विक्रमी संख्या वाहन कामगिरी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कंपनीच्या अढळ वचनबद्धतेला अधोरेखित करते. हा सक्रिय दृष्टिकोन केवळ भविष्यातील गतिशीलता आव्हानांना तोंड देत नाही तर एक स्मार्ट, हरित आणि अधिक कनेक्टेड जग निर्माण करण्याच्या टाटा मोटर्सच्या दृष्टिकोनाशी देखील सुसंगत आहे. या प्रयत्नांमुळे ऑटोमोटिव्ह इनोव्हेशनमध्ये जागतिक स्तरावरील आघाडीचे म्हणून टाटा मोटर्सचे स्थान मजबूत झाले आहे. बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर)मधील उत्कृष्टतेची दखल घेत, टाटा मोटर्सला आर्थिक वर्ष 25 मध्ये भारतात आणि परदेशात पाच प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान मिळाले.
या कामगिरीबद्दल बोलताना टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राजेंद्र पेटकर म्हणाले, “आमची नाविन्यपूर्ण रणनीती उद्योगातील बदलांमध्ये आघाडीवर राहून ग्राहकांना शाश्वत मूल्य देण्यावर केंद्रित आहे. हा टप्पा ऑटोमोटिव्ह उत्कृष्टतेचा आमचा सततचा पाठपुरावा प्रतिबिंबित करतो आणि अधिक पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहने तयार करण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला दृढता देतो. अग्रगण्य तंत्रज्ञानाच्या वाढत्या पोर्टफोलिओसह आम्ही अत्याधुनिक उपायांद्वारे राष्ट्र उभारणीला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे प्रयत्न आमच्या ग्राहकांच्या आणि समुदायांच्या विकसित होत असलेल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, गतिशीलतेच्या भविष्याला आकार देण्यावर आधारित असतील.”