टाटा एस प्रो सह कंपनीच्या स्मॉल कमर्शियल वेईकल्स व पिक-अप्ससाठी वित्तपुरवठा सेवा अधिक प्रबळ केली
मुंबई, 11 मार्च 2026: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने त्यांच्या व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओमध्ये वित्तरपुरवठा सेवा प्रबळ करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत (एमजीबी) सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याची घोषणा केली, जेथे एस प्रो सह त्यांच्या स्मॉल कमर्शियल वेईकल्स व पिक-अप्स (एससीव्हीपीयू) श्रेणीवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा सहयोग ग्राहकांसाठी वेईकल खरेदी करणे सोपे करेल, जेथे कमी व्याजदर, सोपी कागदपत्रव्यवहार प्रक्रिया आणि त्वरित कर्ज वितरण अशा सेवा देईल. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 748 शाखांचे व्यापक नेटवर्क महत्त्वाकांक्षाी उद्योजक, ट्रान्सपोर्टर्स आणि पहिल्यांदा वेईकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किफायतशीर ईएमआय उपलब्ध करून देईल, ज्यासह त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करून विकसित करण्यास मदत होईल.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये टाटा मोटर्सच्या स्मॉल कमर्शियल वेईकल्स व पिक-अप्सने दीर्घकाळापासून साह्य केले आहे, महाराष्ट्रातील पर्यटन, कृषी व फलोत्पादन क्षेत्रांना सेवा देत आहे. एससीव्हीपीयू पोर्टफोलिओ राज्यभरातील विविध व आव्हानात्मक प्रदेशांमधील विविध गरजांची पूर्तता करतो, प्रमुख कृषी भागांमधून कृषी उत्पादनांची वाहतूक करण्याची सुविधा देतो, शहरी व ग्रामीण भागामधील पर्यटनाला साह्य करतो. कंपनीचे प्रगत कार्गो सोल्यूशन्स ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाला अनुकूल विविध इंधन पर्याय व कॉन्फिग्युरेशन्समधून निवड करण्याची स्थिरता देतात.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या एससीव्हीपीयू विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. पिनाकी हेल्दर म्हणाले, ”टाटा मोटर्समध्ये आम्ही उद्योजकतेला सक्षम करण्याप्रती आणि विश्वासार्ह व किफायतशीर गतीशीलता सोल्यूशन्सच्या माध्यमातून उदरनिर्वाह शक्य करण्याप्रती कटिबद्ध आहोत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आमचा सहयोग आमच्या एससीव्हीपीयू श्रेणीला सुलभ व आकर्षक वित्तपुरवठा पर्यायांच्या माध्यमातून अधिक सहजसाध्य करण्याप्रती धोरणात्मक पाऊल आहे. त्वरित मंजूरी व सोईस्कर परतावा संरचनांसह हा सहयोग महाराष्ट्रातील पहिल्यांदा वेईकल खरेदी करणारे ग्राहक, ट्रान्सपोर्टर्स आणि लहान व्यवसायांच्या मालकांना आत्मविश्वासाने त्यांचा व्यवसाय सुरू व प्रगत करण्यास सक्षम करेल. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रबळ प्रादेशिक नेटवर्कचे पाठबळ आणि स्थानिक बाजारपेठेबाबत असलेल्या सखोल माहितीसह आमचा राज्यभरात अधिक आर्थिक संधींना चालना देण्याचा मनसुबा आहे.”
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घराड आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक व टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
टाटा मोटर्स 750 किग्रॅ ते 2 टनपर्यंतची पेलोड क्षमता आणि डिझेल, पेट्रोल, सीएनजी, बाय-फ्यूएल व इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध असलेल्या स्मॉल कमर्शियल वेईकल्स व पिक-अप्सची व्यापक श्रेणी देते. पोर्टफोलिओमध्ये भारतातील सर्वात यशस्वी कमर्शियल वेईकल टाटा एसचा समावेश आहे, जी 25 लाखांहून अधिक उद्योजकांना सक्षम करत आहे. इण्ट्रा पिक-अप सुधारित ड्रायव्हिंगक्षमता व उच्च पेलोड क्षमतेसह श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाते, तर शक्तिशाली योधा खडतर प्रदेशांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामधून दुर्गम प्रांतांपर्यंत सहजपणे सामानांच्या वाहतूकीची खात्री मिळते.
या पोर्टफोलिओला शक्तिशाली ट्रक्सनी अधिक मजबूत केले आहे, जसे भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी-ट्रक एस प्रो, जो विविध ऑपरेटिंग गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेला एस गोल्ड+ डिझेल मिनी-ट्रक, जो ऑपरेशन्सचा खर्च कमी करतो. टाटा मोटर्सची एससीव्हीपीयू श्रेणी टिकाऊपणा, विश्वसनीयता आणि उत्तम मूल्य देते, जेथे या श्रेणीला व्यापक विक्री व सेवा नेटवर्क आणि स्टार गुरू नेटवर्कचे पाठबळ आहे.