शाश्वत मॉडेलच्या माध्यमातून वंचित समुदायांशी संलग्न झाले
Mumbai, September 16, 2025 : टाटा मोटर्सने आज त्यांचा ११वा वार्षिक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अहवाल जारी केला, ज्याचे शीर्षक आहे ‘काळजी घेणाऱ्या मंडळांचा विस्तार: सखोल संबंध, दीर्घकालीन परिणाम’. हा अहवाल कंपनीच्या सर्वसमावेशक विकासासाठी धोरणात्मक, समुदाय-नेतृत्वाच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकतो, जो एकत्रीकरण तत्त्वावर आधारित आहे, जेथे व्यक्ती, धोरण आणि उद्देश मोठ्या प्रमाणात व शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी एकत्रित येतात. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टाटा मोटर्सच्या सीएसआर उपक्रमांचा देशभरातील १.४७ दशलक्षहून अधिक व्यक्तींना सकारात्मक फायदा झाला, ज्यामध्ये ५६ टक्के लाभार्थी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती समुदायामधील होते.

हवामान अस्थिरता आणि सामाजिक-आर्थिक विषमतेने भरलेल्या या वर्षात टाटा मोटर्सने वंचित समुदायांसोबतचा आपला संबंध अधिक दृढ केला, उपक्रम राबवण्यापासून पद्धतशीर परिवर्तन घडवून आणले. १०९ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये उपस्थितीसह कंपनीच्या सीएसआर धोरणामधून राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि तळागाळातील समुदायांच्या गरजांची पूर्तता करणारे व्यापक, अनुकरणीय मॉडेल्स दिसून येतात.
सीएसआर दृष्टिकोनाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्समधील सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, ”आमच्या काळजी घेणाऱ्या मंडळांचा विस्तार म्हणजे वंचितांना प्रमुख स्तरावर आणण्याचा प्रयत्न आहे. प्रतिष्ठित उदरनिर्वाह सक्षम करण्यापासून परिसंस्थांना नवसंजीवनी देण्यापर्यंत आम्ही सहयोगाने सोल्यूशन्स सादर करत आहोत, जे समानतेमध्ये रूजलेले आहेत आणि दीर्घकालीन प्रभावासाठी निर्माण करण्यात आले आहेत. आमच्या ‘मोअर फॉर लेस फॉर मोअर’ तत्त्वाशी बांधील राहत आम्ही कार्यक्षमपणे प्रभाव वाढवण्यावर आणि सरकारी योजनांचा फायदा घेत सर्वात वंचित समुदायांना अर्थपूर्ण फायदे विस्तारित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”
वार्षिक सीएसआर अहवाल आर्थिक वर्ष २४-२५ ची ठळक वैशिष्ट्ये:
मोठ्या प्रमाणात जल संवर्धन
महाराष्ट्रातील ६६ टक्के ग्रामीण भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत असताना टाटा मोटर्सच्या जल व्यवस्थापन उपक्रमाने १० जिल्ह्यांमधील ३५६ जलसाठ्यांचे संवर्धन केले, ज्यामुळे ७०० कोटी लीटर अतिरिक्त पाणी क्षमता निर्माण झाली. याचा ७,००० शेतकरी आणि २.९ लाख गावकऱ्यांना फायदा झाला, ज्यामधून सरकारी एकीकरण, सामुदायिक मालकी आणि डिजिटल देखरेखीवर आधारित मोठ्या प्रमाणातील मॉडेल दिसून येते. आर्थिक वर्ष २६ मध्ये कंपनीचा २५ हून अधिक जिल्ह्यांमधील १,००० जलसाठ्यांचे संवर्धन करण्याचा मनसुबा आहे.
वंचित प्रांतांमध्ये ग्रामीण विकास
२०१८ मध्ये पहिल्यांदा सुरू झालेला इंटीग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम (आयव्हीडीपी) (एकात्मिक ग्रामीण विकास उपक्रम) आता महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील १६-ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नीती आयोगाच्या बहु-गरिबी निर्देशांकानुसार भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांपैकी दोन उत्तर प्रदेशातील श्रावस्ती आणि बलरामपूरमध्ये आयव्हीडीपीचा विस्तार झाला.
१३ शाश्वत विकास उद्दिष्टे, ग्रामपंचायत स्तरावर नऊ थीमॅटिक क्षेत्रे आणि ४८ सरकारी योजनांनुसार आयव्हीडीपीने महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये राहणाऱ्या १८,००० हून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.
प्रतिष्ठित उपजीविकेकडे वाटचाल
पुण्यात, टाटा मोटर्सने कष्टकरी पंचायतीसोबत सहयोग करून ८,००० कचरा उचलणाऱ्या कुटुंबांना मदत केली, १,८१४ महिलांची आरोग्य योजनांमध्ये नोंदणी केली आणि त्यांच्या मुलांसाठी शिक्षण व कौशल्य विकासाची सुविधा दिली. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (एनएपीएस) अंतर्गत चार तरुण टाटा मोटर्समध्ये सामील झाले.
महाराष्ट्रात, कंपनीने निर्माण एनजीओसोबत सहयोग करून ४७ बंधुआ कामगारांची सुटका केली आणि भोसरीमध्ये कामगार सन्मान व सुविधा केंद्राची स्थापना केली, ज्याने १२,००० हून अधिक स्थलांतरित कामगारांना कायदेशीर मदत आणि अधिकार मिळवून दिले.
कामाच्या ठिकाणी समावेश वाढवणे
आर्थिक वर्ष २५ मध्ये टाटा मोटर्सने त्यांच्या प्लांट्समध्ये १४१ विकलांग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) आणि १७ ट्रान्सजेंडर व्यक्तींना सामील केले, ज्यांना सर्वसमावेशक धोरणे, संवेदनशीलता उपक्रम व संरचित प्रशिक्षणाद्वारे पाठिंबा देण्यात आला, ज्यासह कामाच्या ठिकाणी समानतेसाठी मापदंड स्थापित केले.
शैक्षणिक यशाला चालना
एनेबल उपक्रमांतर्गत १९,००० हून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी ८,००० विद्यार्थ्यांनी जेईई मेन्ससाठी प्रवेश परीक्षा दिली, ज्यापैकी २८ टक्के विद्यार्थी पात्र ठरले. मुंबईत, ६९ बीएमसी शाळांमध्ये उपचारात्मक प्रशिक्षणामुळे एसएससी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६ टक्के झाले, जे शहराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.
शहरातील कुपोषणाचे निराकरण
प्रोजेक्ट आरोग्यसंपन्नच्या माध्यमातून ट्रॉम्बे, मुंबई येथील झोपडपट्ट्यांमध्ये १,००० हून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली, ज्यामुळे गंभीर व मध्यम कुपोषणात ९० टक्के घट झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना पोषणाबाबत माहिती देत सक्षम करण्यात आले आणि सामुदायिक आरोग्य ग्रंथालये स्थापन करण्यात आली.
विक्रमी स्वयंसेवक सहभाग
१९,००० हून अधिक टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यासाठी २ लाखांहून अधिक तास समर्पित केले. आरोग्य जागरूकता मोहीम राबवणे, पर्यावरणीय कारणांना चालना देणे, आपत्ती व्यवस्थापन प्रयत्नांना पाठिंबा देणे यांसारख्या
उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कृतींमधून कंपनीची करूणामय व जबाबदार नागरिकत्वाची सखोल संस्कृती दिसून येते.
टाटा मोटर्स सर्वसमावेशक विकास, पद्धतशीर सुधारणा आणि सामुदायिक स्थिरतेच्या माध्यमातून आपले सीएसआर धोरण प्रबळ करण्याप्रती कटिबद्ध आहे. डेटा-संचालित, सहयोग-नेतृत्वित दृष्टिकोनासह कंपनी शाश्वत सोल्यूशन्समध्ये वाढ करत राहिल, जे भारताच्या विकास ध्येयांमध्ये अर्थपूर्ण योगदान देतील. यामुळे प्रगती समान व शाश्वत असण्याची खात्री मिळेल.