मॅजेंटा मोबिलिटीचा ताफा ३५० एस ईव्हींपर्यंत वाढवला; अतिरिक्त २० युनिट्सची डिलिव्हरी
मॅजेंटा मोबिलिटीचा एस ईव्ही ताफा आता १० शहरांमध्ये कार्यरत आहे, जवळपास ५० लाख किलोमीटरपर्यंत प्रवास केला आहे
मुंबई, १९ मे, २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज अतिरिक्त २० युनिट्सची डिलिव्हरी करत मॅजेंटा मोबिलिटीची एस ईव्ही ताफा ३५० वेईकल्सपर्यंत वाढवला. ही डिलिव्हरी २०२३ मध्ये टाटा मोटर्स आणि मॅजेंटा मोबिलिटी यांच्यामध्ये एस ईव्हींचे ५०० ईव्ही तैनात करण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा भाग आहे. १० शहरांमध्ये तैनात करण्यात आलेल्या आणि मॅजेंटा मोबिलिटीद्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या टाटा एस ईव्हींनी एकत्रित जवळपास ५० लाख किलोमीटर अंतर प्रवास केला आहे, ज्यामुळे जवळपास २,५०० टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी झाले आहे. देशातील सर्वात प्रगत, शून्य-उत्सर्जन कमर्शियल वेईकल ई-कॉमर्स, पार्सल व कूरियर, एफएमसीजी, एफएमसीडी व डेअरी अशा विभागांमध्ये सक्रियपणे तैनात करण्यात आली आहे.

या घोषणेबाबत मत व्यक्त करत मॅजेंटा मोबिलिटीची संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मॅक्सन लुईस म्हणाले, “टाटा एस ईव्हीने सातत्याने ऑपरेशनल सर्वोत्तमता, उच्च अपटाइम, प्रबळ रेंज आणि ड्राव्हर-अनुकूल परफॉर्मन्स दिले आहे. आमच्या ताफ्यामध्ये ३५० वेईकल्स समाविष्ट करण्यासह १५० आणखी वेईकल्स समाविष्ट होण्याच्या मार्गावर असताना आम्ही भारतभरातील आमची ग्रीन लॉजिस्टिक्स फूटप्रिंट दृढ करत आहोत. टाटा मोटर्सची विश्वसनीय सर्विस इकोसिस्टम आणि प्रमाणित तंत्रज्ञान त्यांना १६ शहरांमध्ये उपस्थिती वाढवण्याच्या आणि गतीशीलतेचे डिकार्बनायझेशन करण्याच्या आमच्या प्रवासामधील प्रमुख सहयोगी बनवतात.”
टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या एससीव्हीपूयीचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. पिनाकी हल्दर म्हणाले, “आम्हाला नाविन्यपूर्ण, व्यावहारिक आणि शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करत भारतातील ई-कार्गो परिवर्तनाचे नेतृत्व करण्याचा अभिमान वाटतो. एस ईव्हीमध्ये मॅजेंटा मोबिलिटीने सातत्याने दाखवलेल्या विश्वासामधून वेईकलची कार्यक्षमता, विश्वसनीयता आणि आमच्या वाढत्या सहयोगाची क्षमता दिसून येते. आम्ही इलेक्ट्रिक वेईकल्स तैनात करण्यासोबत भारतातील शहरी भागामध्ये शुद्ध, स्मार्टर लॉजिस्टिक्स इकोसिस्टमसाठी पाया देखील निर्माण करत आहोत. डिलिव्हर करण्यात आलेली प्रत्येक एस ईव्ही शून्य-उत्सर्जन कार्गो परिवहनाचे लोकशाहीकरण करण्याच्या, तसेच देशातील हरित गतीशीलता चळवळीला गती देण्याच्या दिशेने पाऊल आहे.”
शक्तिशाली प्लॅटफॉर्मचे पाठबळ आणि प्रबळ अॅग्रीगेट्ससह सुसज्ज टाटा एस १६१ किलोमीटरची प्रमाणित रेंज देते आणि १००० किग्रॅची उच्च पेलोड क्षमता आहे. इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल वेईकलला टाटा मोटर्सच्या फ्लीट एज कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्मचे पाठबळ आहे, जो वेईकल आणि ड्रायव्हर परफॉर्मन्सबाबत रिअल-टाइम माहिती देतो. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि प्रगत बॅटरी कूलिंग सिस्टम सातत्यपूर्ण, विनाव्यत्यय ऑपरेशन्सची खात्री देतात. २०० हून अधिक विशेषीकृत ईव्ही सर्विस सेंटर्सच्या वाढत्या नेटवर्कचे पाठबळ असलेली एस ईव्ही ताफा मालकांना अद्वितीय खात्री देते. भारतभरात ८,००० हून अधिक युनिट्सची विक्री आणि ६ कोटी किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत प्रवास करण्यासह एस ईव्ही भारताच्या मोबिलिटी लँडस्केपमध्ये अग्रस्थानी आहे.