बीएमटीसीकडून १४८ स्टारबस इलेक्ट्रिक बसेसची अतिरिक्त ऑर्डर मिळाली
बेंगळुरू, १९ डिसेंबर २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने बेंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) कडून १४८ इलेक्ट्रिक बसेसची अतिरिक्त ऑर्डर मिळवली आहे. टाटा मोटर्सची पूर्णत: मालकीची उपकंपनी टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशन्स लि. १२ वर्षांच्या कालावधीसाठी टाटा स्टारबस ईव्ही १२-मीटर लो-फ्लोअर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, कार्यसंचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी पार पाडेल. ही ऑर्डर पूर्वीच्या ९२१ इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डरनंतर मिळाली आहे, जेथे बहुतांश बसेस डिलिव्हर करण्यात आल्या आहेत आणि बीएमटीसीद्वारे ९५ टक्क्यांहून अधिक अपटाइमसह यशस्वीपणे चालवल्या जात आहेत.
टाटा स्टारबस ईव्हीमध्ये शाश्वत व आरामदायी प्रवास अनुभवासाठी उच्च दर्जाची डिझाइन आणि दर्जात्मक वैशिष्ट्ये आहेत. या शून्य–उत्सर्जन इलेक्ट्रिक बसेस बेंगळुरू शहरामध्ये सुरक्षित, आरामदायी व सोईस्कर आंतर-शहरीय प्रवासासाठी प्रगत बॅटरी सिस्टम्सची शक्ती असलेल्या नेक्स-जनरेशन आर्किटेक्चरवर विकसित करण्यात आल्या आहेत.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत बीएमटीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्रन आर., आयएएस म्हणाले, ”आम्हाला आमच्या ताफ्याच्या आधुनिकीकरणासाठी या अतिरिक्त १४८ इलेक्ट्रिक बसेससह टाटा मोटर्ससोबतचा आमचा सहयोग अधिक दृढ करण्याचा आनंद होत आहे. टाटा इलेक्ट्रिक बसेस अपवादात्मक असण्यासोबत शाश्वत व कार्यक्षम सार्वजनिक परिवहनाप्रती आमच्या कटिबद्धतेशी संलग्न आहेत. मोठा ई-बस ताफा बेंगळुरूच्या नागरिकांना पर्यावरणपूरक, आरामदायी व विश्वसनीय सेवा देण्यासाठी आमच्या क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवेल.”
टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री. आसिम कुमार मुखोपाध्याय म्हणाले, ”आम्हाला आमच्या ई-मोबिलिटी सोल्यूशन्समधील बीएमटीसीच्या सातत्यपूर्ण विश्वासाचा अभिमान वाटतो. १४८ बसेसच्या अतिरिक्त ऑर्डरमधून आमच्या स्टारबस ईव्हींचे प्रमाणित यश आणि बेंगळुरूच्या शहरी वातावरणामध्ये वितरित कार्यरत सर्वोत्तमता दिसून येते. आम्ही नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती कटिबद्ध आहोत, ज्यांचा समुदाय व पर्यावरणाला फायदा होतो.”
आजपर्यंत, टाटा मोटर्सच्या ई-बसेसने बेंगळुरूमध्ये एकूण २.५ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास केला आहे. याचे श्रेय टेलपाइप उत्सर्जनामधील मोठ्या कपातीला जाते, जेथे जवळपास १४,००० टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी झाले. बेंगळुरूमध्ये टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसेसच्या यशामधून कंपनीची नाविन्यता, शाश्वतता आणि प्रगत गतीशीलता सोल्यूशन्सच्या माध्यमातून शहरी जीवन सुधारण्याप्रती समर्पितता दिसून येते.