मुंबई, १३ मार्च २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीला देशभरातील विविध राज्य परिवहन उपक्रमांकडून (एसटीयू) ५,००० हून अधिक बसेस व बस चेसिसच्या एकूण ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनीने या देशव्यापी ऑर्डर्सचा मोठा हिस्सा संपादित केला आहे, ज्यासह भारतातील सार्वजनिक परिवहन सोल्यूशन्समधील सर्वात पसंतीची सहयोगी म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. सरकारच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत स्पर्धात्मक ई-बोली प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक निविदा मिळाली. संबंधित एसयटीयूंसह करण्यात आलेल्या करारानुसार टप्प्याटप्प्याने या निविदांची अंमलबजावणी करण्यात येईल.
दशकांपासून टाटा मोटर्स भारतातील सार्वजनिक परिवहन क्षेत्रात आघाडीवर आहे, जेथे व्यक्तींना कनेक्ट करत आहे, उदरनिर्वाह सादर करत आहे आणि प्रादेशिक गतीशीलता वाढवत आहे. एमएसआरटीसी (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ), जीएसआरटीसी (गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळ), एनडब्ल्यूकेआरटीसी (वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ), टीजीएसआरटीसी (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ), बीएसआरटीसी (बिहार राज्य मार्ग परिवहन महामंडळ), आरएसआरटीसी (राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळ), केएसआरटीसी (केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ), रस्ते परिवहन विभाग (हरियाणा रोडवेज) आणि सीटीयू (चंदीगड परिवहन उपक्रम) यांच्याकडून मिळालेल्या या नवीन ऑर्डर्समधून भारताच्या सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील परिवर्तनाच्या पुढील टप्प्याला गती देण्यामध्ये कंपनीची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते.
मिळालेल्या या सहयोगात्मक ऑर्डरबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स लि.च्या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस. म्हणाले, ”विविध राज्य परिवहन उपक्रमांकडून मिळालेल्या या ऑर्डर्समधून टाटा मोटर्सच्या गतीशीलता सोल्यूशन्सवर असलेला दृढ विश्वास दिसून येतो. आमच्या बसेस् विविध प्रदेशांमध्ये व ड्युटी सायकल्समध्ये आरामदायीपणा, सुरक्षितता व दीर्घकालीन विश्वसनीयता देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. उत्पादन अभियांत्रिकी आणि ग्राहक अपटाइमसंदर्भात उत्तम डिझाइन करण्यात आलेल्या लाइफसायकल सपोर्ट परिसंस्थेसह आम्ही एसटीयूंना दररोज लाखो प्रवाशांना सेवा देण्यास सक्षम करत आहोत. या एकूण ऑर्डर्ससह देशातील पसंतीची गतीशीलता सहयोगी म्हणून आमचे स्थान अधिक दृढ झाले आहे, तसेच भारतातील सार्वजनिक परिवहनाच्या भविष्याला आकार देण्याप्रती आमची कटिबद्धता देखील दर्शवली आहे.”
एकूण ऑर्डर्समध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी गतीशीलता सोल्यूशन्सची व्यापक श्रेणी समाविष्ट आहे, ज्यामध्ये टाटा मॅग्ना, टाटा सिटीराइड, टाटा स्टारबस, टाटा स्टारबस प्राइम, टाटा एलपीओ १६१८, एलपीओ १६२२ आणि एलपीओ १८२२ व्हेरिएण्ट्सचा समावेश आहे. या बसेस् व बस चेसिस इंटरसिटी, लांब पल्ल्याचे अंतर आणि इंट्रासिटी कार्यसंचालनांसाठी कॉन्फिग्युअर करण्यात आले आहेत. ते विविध ड्युटी सायकल्समध्ये विश्वसनीय कार्यक्षमता, प्रवाशांना आरामदायीपणा आणि कार्यक्षम ऑपरेटिंग फायदा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
टाटा मोटर्स भारतभरातील राज्य परिवहन उपक्रम, खाजगी ताफा ऑपरेटर्स आणि संस्थात्मक ग्राहकांसाठी दीर्घकाळापासून गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता आहे. कंपनीच्या व्यावसायिक प्रवासी वाहन पोर्टफोलिओमध्ये विविध पॉवरट्रेन्समधील ९-सीटर्स ते ५५-सीटर्सचा समावेश आहे, जे देशभरातील सार्वजनिक परिवहन गरजांची पूर्तता करतात. याला पूरक Sampoorna Seva २.० हा सर्वसमावेशक वेईकल लाइफसायकल मॅनेजमेंट प्रोग्राम आहे, ज्यामध्ये देखभालीसंदर्भात साह्य, निश्चित वेळेत दुरूस्तीचे आश्वासन, अस्सल स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि ब्रेकडाऊन असिस्टण्सचा समावेश आहे. ४,५०० हून अधिक सेल्स व सर्विस टचपॉइण्ट्सच्या नेटवर्कचे पाठबळ असलेली टाटा मोटर्स भारतातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वसनीय सार्वजनिक परिवहन सक्षम करत आहे.