राष्ट्रीय, २४ डिसेंबर २०२५: कोका-कोला उल्लेखनीय सांस्कृतिक क्षणांचा अनुभव देण्यास सज्ज आहे, जेथे नववर्षात जानेवारीमध्ये पहिल्यांदाच सर्वांसमोर कोक स्टुडिओ भारत लाइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा जानेवारीमध्ये दिल्ली व गुवाहाटीमधील कोक स्टुडिओ भारतच्या चाहत्यांना नवीन फॉर्मेटचा अभूतपूर्व अनुभव मिळणार आहे, ज्यामध्ये संगीत, फूड आणि सांस्कृतिक वारसाचे संयोजन पाहायला मिळेल.

पहिल्यांदाच प्रेक्षकांना कोक स्टुडिओ भारत स्क्रिनवर नाही तर लाइव्ह पाहायला मिळणार आहे. खास संगीतप्रेमींसाठी या लाइव्ह शोचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील तरूणांसाठी डिझाइन करण्यात आलेली ही कॉन्सर्ट प्रेक्षकांना कोक स्टुडिओ भारतच्या पैलूंचा अनुभव देईल, जेथे त्यांना ते दीर्घकाळापासून संलग्न असलेला साऊंड आणि उत्साहवर्धक वातावरणाचा आनंद मिळण्यासोबत एकाच छताखाली विविध आर्टिस्ट्सचे लाइव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळतील.
कोका-कोला आयएनएसडब्ल्यूएच्या आयएमएक्स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्स्पीरिअन्स)चे प्रमुख शंतनू गंगाणे म्हणाले, ”कोक स्टुडिओ भारत प्रबळ सांस्कृतिक प्लॅटफॉर्म बनला आहे, जेथे ग्राहक व आर्टिस्ट्स कोका-कोलासह संगीत व कथानकाप्रती समान आवडीसह एकत्र येतात. मागील सीझन्सपासून या समुदायामध्ये झालेली वाढ अत्यंत प्रेरणादायी आहे, ज्यामुळे आम्ही स्क्रिनवर घेतल्या जाणाऱ्या मनोरंजनपूर्ण अनुभवाला प्रत्यक्ष लाइव्ह शोच्या माध्यमातून सादर करण्याचे ठरवले आहे. कोक स्टुडिओ भारत लाइव्हच्या लाँचसह आमची संस्कृतीला आकार देणारे, उच्च प्रभावी फॅन मोमेण्ट्स निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा आहे, जे भारतातील संपन्न सांस्कृतिक वारसाला प्रतिष्ठित कोका-कोला पद्धतीने प्रशंसित करतील.”
भारताचा सांस्कृतिक वारसा स्थानिक संगीतामध्ये सामावलेला आहे, या विश्वासावर आधारित कोक स्टुडिओ भारतची निर्मिती करण्यात आली आहे, जेथे लोककला प्रकार, प्रादेशिक भाषा, पारंपारिक संगीत वाद्ये आणि संगीतबद्ध संयोजनांमधील आधुनिक शैलींना प्राधान्य दिले जाते आणि स्थानिक संगीताला नव्या उंचीवर नेले जाते. सीएसबी लाइव्हसह प्लॅटफॉर्मचा पिढ्यानपिढ्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे जनरेशन झेडला समकालीन सादरीकरणांच्या माध्यमातून भारतातील संगीत संस्कृतीची ओळख होईल, जे नवीन, संबंधित वाटण्यासह संगीतमय वारसाशी दृढपणे संलग्न करतात.
दिल्लीमध्ये श्रेया घोषाल, आदित्य रिखारी, रश्मीत कौर, दिव्यम आणि ख्वाब मंचावर उपस्थित असतील, जे मधुरमय संगीत, भारतीय संस्कृती आणि संगीतबद्ध संयोजन सादर करतील, जे कोक स्टुडिओ भारतला नव्या उंचीवर घेऊन जातात.
श्रेया घोषाल म्हणाल्या, ”मी अनेक वर्षांपासून कोका-कोलाशी संलग्न आहे आणि कोक स्टुडिओ भारतचा भाग असल्याने खूप आनंद होत आहे. सीएसबीने भारतातील व्यक्तींच्या संगीताचे मनोरंजन घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणला आहे. पहिल्यांदाच कोक स्टुडिओ भारत लाइव्ह शोसाठी मंचावर उपस्थित राहणे विशेषाधिकार आहे. मी चाहत्यांसोबत या क्षणाचा आनंद घेण्यास खूप उत्सुक आहे.”
आदित्य रिखारी म्हणाले, ”पहिल्याच कोक स्टुडिओ भारत लाइव्हचा भाग असणे संगीताचे साजरीकरण आहे, जे दृढ संबंध, संस्कृती आणि सर्जनशील बाबींचा अनुभव देईल. मी माझ्या गाण्यांमधून नेहमी भावना व कथानकाला सादर केले आहे आणि कोक स्टुडिओचा प्रामाणिकपणा व प्रयोग करण्याचे पैलू माझ्याशी संलग्न आहेत. मी दिल्लीमधील प्रेक्षकांसमोर या उल्लेखनीय सांस्कृतिक क्षणामध्ये माझे संगीतकौशल्य सादर करण्यास उत्सुक आहे आणि माझ्या स्वत:च्या कला प्रवासाला पुढे घेऊन जाईन, जो प्रेक्षकांना प्रेरित करण्यासोबत एकत्र आणेल.”
रश्मीत कौर म्हणाल्या, ”कोक स्टुडिओ भारत लाइव्हसह प्रेक्षकांना स्टुडिओबाहेर संगीताचा आनंद मिळणार आहे, जेथे अद्वितीय क्षणांचा अनुभव मिळेल. प्रेक्षकांसमोर लाइव्ह परफॉर्मन्स सादर करणे अनोखा अनुभव असेल आणि मी दिल्लीमध्ये त्या अनुभवासाठी उत्सुक आहे.”
गुवाहाटीमध्ये अनुव जैन, शंकुराज कोनावर, रिटो रिबा व अनुष्का मस्की मंचावर पाहायला मिळतील, जे विशिष्ट संगीत व सांस्कृतिक ओळख सादर करतील.
अनुव जैन म्हणाले, ”कोक स्टुडिओ भारत लाइव्ह आम्हाला रेकॉर्डिंग व स्क्रिनपलीकडे प्रेक्षकांशी प्रत्यक्ष कनेक्ट होण्याची संधी देतो. या पहिल्याच लाइव्ह शोचा भाग असणे आणि मंचावर माझे संगीतकौशल्य सादर करणे अत्यंत विशेष अनुभव असेल. ‘अर्ज किया है’साठी अमाप प्रेमाचा वर्षाव झाल्यानंतर हा क्षण अधिक खास असणार आहे.”
शंकुराज कोनावर म्हणाले, ”कोक स्टुडिओ भारतने प्रादेशिक कलाकारांना अभिमानाने आपले संगीतकौशल्य सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म डिझाइन केला आहे. पहिल्याच लाइव्ह शोचा भाग असणे मोठा सन्मान आहे, ज्यामुळे आम्हाला राष्ट्रीय स्तरावर चाहत्यांसमोर ईशान्येकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्याची संधी मिळाली आहे आणि आमच्या संस्कृतीला सादर करण्यासाठी उत्सुक आहोत. हा क्षण आम्हा सर्वांच्या मनात सदैव स्मरणात राहिल.”
रिटो रिबा म्हणाले, ”कोक स्टुडिओ भारत लाइव्ह कलाकारांना स्क्रिनपलीकडे प्रेक्षकांशी प्रत्यक्ष कनेक्ट होण्याची संधी आहे. गुवाहाटीमध्ये परफॉर्म करण्याचा अनुभव अत्यंत खास आहे, जेथे आम्ही आमच्या कहाण्या समजून घेणाऱ्या प्रेक्षकांसमोर लाइव्ह सादर करणार आहोत.”
प्रत्येक सहयोगामध्ये स्थानिक संस्कृतीच्या पैलूंचे जतन करण्यात आले आहे, जेथे भारतभरातील कलाकार एकत्र येत अद्वितीय परफॉर्मन्स सादर करतील. लाइव्ह फॉर्मेटमधून या मिशनचे ध्येय दिसून येते, जी संगीतला स्क्रिनपलीकडे घेऊन जात अद्वितीय संगीतमय वारसाचा अनुभव देते.
कॉन्सर्ट सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर कार्यक्रमाबाबत अधिक माहिती, आर्टिस्ट्सचे कन्टेन्ट आणि प्रत्यक्ष परफॉर्मन्सबाबत सांगण्यात येईल. अधिक अपडेट्ससाठी चाहते कोक स्टुडिओ भारत चॅनेल्सशी संलग्न राहू शकतात.