१५ जानेवारी २०२६: थम्स अप या भारतातील स्वदेशी कोला कंपनीने दिल्ली एअरपोर्ट व अदाणी एअरपोर्ट्ससोबत सहयोगाने उच्च प्रभावी आयसीसी ट्रॉफी व्युइंग एक्स्पीरिअन्सच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना देशातील तीन वर्दळीच्या विमानतळांवर प्रतिष्ठित आयसीसी टी२० मेन्स वर्ल्ड कप ट्रॉफी पाहण्याची सुविधा दिली आहे. आयसीसीसोबत दीर्घकालीन सहयोगासह राबवण्यात येणारा हा उपक्रम भारतीयांच्या क्रिकेटप्रती अतूट व भावनिक नात्याला प्रशंसित करतो, जेथे दररोज प्रवास केल्या जाणाऱ्या विमानतळांवर देशाभिमान व क्रिकेटप्रेमाप्रती क्षणांना सादर केले आहे.

हा उपक्रम एअरपोर्ट ऑपरेटर्ससोबत सहयोगाने राबवला जात आहे. थम्स अपने दिल्ली एअरपोर्टसोबत, तसेच अहमदाबाद व मुंबईमधील अदाणी एअरपोर्ट्ससोबत सहयोग केला आहे, ज्यासह दररोज लाखो भारतीय प्रवास करणऱ्या विमानतळांवर मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा सहभाग असण्याची खात्री घेण्यात आली आहे.
१५ जानेवारी रोजी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवर आयसीसी ट्रॉफी व्युइंग एक्स्पीरिअन्सला सुरूवात झाली, ज्यानंतर १६ जानेवारी रोजी दिल्लीमधील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि १७ जानेवारी रोजी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे सुरूवात झाली. आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत ही ट्रॉफी पाहायला मिळेल. दिल्ली एअरपोर्ट समर्पित आयसीसी ट्रॉफी प्रदर्शन देखील आयोजित करेल, तर अहमदाबाद व मुंबईमध्ये चाहत्यांचा सहभाग वाढवण्ण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला आकर्षक एलईडी म्युरल फोटो झोन असेल.
आयसीसीचा दीर्घकालीन सहयोगी थम्स अपने भारतातील क्रिकेटप्रेमींना क्रिकेटच्या सर्वात मोठ्या इव्हेण्ट्सचा आनंद देण्यामध्ये सतत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा सहयोग देशातील सर्व क्रिक्रेटप्रमींना एकत्र आणणाऱ्या खेळाच्या क्षमतेवरील समान विश्वासावर आधारित आहे, जो स्टेडियमपलीकडे देखील अद्वितीय क्षण निर्माण करतो आणि प्रतिष्ठित क्रिकेट मालमत्तांना ग्राहकांसाठी वास्तविक व उत्साही अनुभवांमध्ये बदलतो.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट आशियाचे चीफ कस्टमर ऑफिसर अभिषेक गुप्ता म्हणाले, ”भारतात क्रिकेट खेळाचा सर्वाधिक आनंद घेतला जातो, तसेच क्रिकेट खेळ सर्वांना एकत्र आणतो. थम्स अपने नेहमी या खेळाप्रती आवड दर्शवली आहे. दिल्ली एअरपोर्ट व अदाणी एअरपोर्ट्स यांच्यासोबत सहयोगाने भारतातील प्रमुख विमानतळांवर आयसीसी ट्रॉफी पाहण्याचा अनुभव देत आम्ही चाहत्यांना त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान अद्वितीय आनंद देत आहोत, तसेच दैनंदिन प्रवास केल्या जाणाऱ्या विमानतळांना खास टचपॉइण्ट्समध्ये बदलत आहोत, ज्यामधून थम्स अपला नव्या उंचीवर घेऊन जाणारे पैलू, आत्मविश्वास आणि धैर्य दिसून येतो.”
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत अदाणी एअरपोर्ट्स होल्डिंग लि.चे सीईओ अरूण बंसल म्हणाले, ”एएएचएलला अहमदाबाद व मुंबईमध्ये आयसीसी ट्रॉफी आणण्यासाठी थम्स अपसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटत आहे, ज्यासह दैनंदिन प्रवास देशाभिमान, चाहत्यांशी संलग्नता आणि नाविन्यपूर्ण प्रवास अनुभवांच्या उत्साहपूर्ण क्षणांमध्ये बदलले आहेत. आम्हाला प्रवाशांसाठी असे संस्मरणीय क्षण घेऊन आनंद होत आहे, याव्यतिरिक्त आम्ही अद्वितीय पायाभूत सेवा उपलब्ध असण्याची खात्री घेत आहोत. सहयोगाने आम्ही भारतीयांच्या क्रीडाप्रती प्रेमाला प्रशंसित करण्यासाठी विमान वाहतूक सेवेला नव्या उंचीवर घेऊन जात आहोत.”
प्रबळ सांस्कृतिक कंपनी म्हणून क्रीडाला प्राधान्य देणाऱ्या थम्स अपने नेहमी चाहत्यांसाठी नवनवीन मार्ग सादर केले आहेत, ज्यामुळे ते स्क्रिनपलीकडे खेळाचा अद्वितीय अनुभव घेऊ शकतात. वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी वर्ल्ड कप २०२४ मधील स्पर्धेच्या विजेत्यांना विमान प्रवासाची सुविधा देण्यापासून क्रिकेटबाबत उच्च-प्रभावी, तंत्रज्ञान-केंद्रित क्षण निर्माण करण्यापर्यंत ब्रँडने प्रमुख क्रीडा इव्हेण्ट्सना वास्तविक, उत्साही प्रसंगांमध्ये बदलले आहे. या अनुभवांमधून थम्स अपचा विश्वास दिसून येतो की, हा खेळ फक्त पाहिला जात नाही तर प्रत्यक्ष मैदानावर उत्साहपूर्ण क्षणांचा आनंद घेत अनुभव घेण्याबाबत आहे.
आयसीसी ट्रॉफी एक्स्पीरिअन्समधून थम्स अपचा क्रिकेटसोबत दीर्घकालीन सहयोग आणि क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण क्षणांचा आनंद देण्याप्रती त्यांचा उद्देश दिसून येतो. प्रमुख विमानतळांवर ट्रॉफी पाहण्याचा आनंद देत ब्रँडचा क्रिकेटप्रेमींचा खेळाप्रती प्रवास सुरू होणाऱ्या ठिकाणांपासून त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याचा, त्यांना आवडणाऱ्या खेळाबाबत संस्मरणीय टचपॉइण्ट्स निर्माण करण्याचा मनसुबा आहे.