थम्‍स अपने आधुनिक काळातील भारतीयांसाठी आपल्‍या प्रख्‍यात लोगोला नवीन रूपात सादर केले

News Service

जानेवारी , २०२६: थम्‍स अप या भारतातील स्‍वदेशी कोला कंपनीचा प्रतिष्ठित लोगो आहे. आज, ब्रँडने नवीन ओळखीचे अनावरण केले, ज्‍यामधून धोरणात्‍मक बदल दिसून येण्‍यासोबत आधुनिक काळातील भारतीयांच्‍या महत्त्वाकांक्षा, आत्‍मविश्वास आणि प्रत्‍येक क्षणाचा उत्‍साहात आनंद घेण्‍याची जिद्द निदर्शनास येते.

थम्‍स अपच्‍या इन-हाऊस डिझाइन टीमने डिझाइन एजन्‍सी सुपरअल्‍ट्रोरअर® सोबत सहयोगाने हा रिब्रँड विकसित केला आहे. या नवीन ओळखीसह गेल्‍या २ दशकांमध्‍ये थम्‍स अपने पहिल्‍यांदाच लोगोच्‍या लुकमध्‍ये बदल केला आहे. भविष्‍यासाठी प्रबळ वारसावर डिझाइन करण्‍यात आलेला नवीन लुक अधिक डायनॅमिक व लक्षवेधक व्हिज्‍युअल देतो. ब्रँडचा ट्रेडमार्क लोगो खास आठवणींना पुढे घेऊन जातो आणि स्‍थापनेपासून केवळ तीन वेळा लुकमध्‍ये बदल करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक लुकमधून युवा संस्‍कृतीचे बदलते स्‍वरूप आणि भारतातील तरूणांचा उत्‍साह दिसून येतो.

नवीन ब्रँड लुकमध्‍ये थम्‍स अपच्‍या विशिष्‍ट प्रॉपर्टीचा प्रभाव व ताकद कायम ठेवण्‍यात आली आहे, ज्‍यामध्‍ये प्रगतीशील व समकालीन उत्‍साहाची भर करण्‍यात आली आहे. टाइपोग्राफी आकर्षक व लक्षवेधक आहे. तीन रंग स्‍पाइस रेड, आइस ब्‍ल्‍यू आणि स्‍टॉर्म ब्‍ल्‍यू ब्रँडच्‍या संपन्‍न वारसामधून प्रेरित आहेत, तसेच स्‍वाद, थंडरस रिफ्रेशमेंट आणि साहसी व्‍यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत. या लुकमध्‍ये मानवी अंगठ्याचे चिन्‍ह कायम ठेवण्‍यात आले आहे, ज्‍यासह ब्रँडचा अतूट उत्‍साह अधिक दृढ करण्‍यात आला आहे. नवीन व्हिज्‍युअल ओळखीमधून आजच्‍या तरूणांचा आत्‍मविश्वास, ‘साधारण’ गोष्‍टींना आव्‍हान करण्‍याची क्षमता आणि दररोज साहसी नवीन अनुभव घेण्‍याचे धाडस दिसून येते. हा लोगो भविष्‍यासाठी सानुकूल करण्‍यात आला आहे, जो रिटेल दुकानांमध्‍ये सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या वरिष्‍ठ संचालिका सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, ”जवळपास पाच दशकांपासून थम्‍स अप तरूण संस्‍कृतीमधील महत्वपूर्ण प्रेरक राहिले आहे, जे साहसी व निरंतर आत्‍मविश्वासासह अद्वितीय ‘तूफानी’ उत्‍साहाला सादर करते. त्‍यांची प्रख्‍यात ‘टेस्‍ट द थंडर’ लाइन, अद्वितीय स्‍वाद आणि साहसी संवादाने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे, ज्‍यामुळे भारतातील तरूणांचे आवडते पेय बनले आहे. नवीन थम्‍स अप व्हिज्‍युअल ओळख धोरणात्‍मक पाऊल आहे, जे आमच्‍या सांस्‍कृतिक पैलूंना अधिक दृढ करते. आम्‍ही विकासाचा पुढील टप्‍पा गाठण्‍यासोबत ब्रँडला भविष्याकरिता अधिक गतीशील, विशिष्‍ट आणि उत्‍साहवर्धक करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत.”

सुपरअल्‍ट्रारेअर®चे संस्‍थापक मॅथ्‍यू केन्‍योन म्‍हणाले, ”आम्‍ही थम्‍स अप सादर करणाऱ्या मुलभूत पैलूंना अधिक दृढ करत आहोत, ज्‍यामधून प्रबळ, स्थिर व प्रख्‍यात लोगो उदयास आला आहे, जो लक्षवेधक आहे. यासह आम्‍ही ग्राहकांना आवडणाऱ्या बाबी कायम ठेवत या ओळखीला अधिक प्रबळ केले आहे. यासोबत आजच्‍या भारतीय तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली साहसी, सुस्‍पष्‍ट अभिव्‍यक्‍ती सादर करत आहोत.”

१९७७ मध्‍ये भारतातील पहिला स्‍वदेशी कोला म्‍हणून लॉंच करण्‍यात आलेल्‍या थम्‍स अपने स्‍पाइसी स्‍वाद आणि भारतातील साहसी तरूणांमधील लोकप्रियतेसह श्रेणीला नवीन आकार दिला आहे. थम्‍स अप फक्‍त पाहिले जात नाही तर प्रत्‍यक्ष आस्‍वाद घेत साहसी क्षणांचा अनुभव घेतला जातो. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये त्‍यांचा तूफानी उत्‍साह #TasteTheThunder व #AajKuchToofaniKarteHain ते #PalatDe आणि #SoftNahinToofan अशा प्रख्‍यात मोहिमांच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍यात आला आहे, जो सतत पिढ्यानपिढ्या तरूणांना प्रेरित करत आहे. गेल्‍या वर्षी, ब्रँडने ऑल थंडर, नो शुगर ऑफरिंग म्‍हणून थम्‍स अप एक्‍सफोर्स लॉंच केले, जे साखरेविना थम्‍स अपचा तोच स्‍वाद देते. थम्‍स अप एक्‍सफोर्सने लॉंच झाल्‍यापासून अवघ्‍या सहा महिन्‍यांमध्‍ये सर्वात मोठे नो-शुगर पेय म्‍हणून स्‍वत:चा दर्जा स्‍थापित केला आहे.

थम्‍स अप भविष्याकडे वाटचाल करत असताना नवीन व्हिज्‍युअल ओळख काळासह निपुण झालेल्‍या ब्रँडला अधिक लक्षवेधक करते, ज्‍यासह पुढील अध्‍यायासाठी मंच स्‍थापित झाला आहे आणि ब्रँडचे तूफानी तत्त्व कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button