सप्टेंबर २२, २०२५: थम्स अप हा भारतातील कोका-कोला कंपनी अंतर्गत असलेला आघाडीचा सॉफ्ट ड्रिंक ब्रँड आणि हिरो मोटोकॉर्प ही जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सची सर्वात मोठी उत्पादक कंपनी यांनी पुन्हा एकदा सहयोग करत थंडरव्हील्स २.० लाँच केले आहे. गेल्या वर्षीच्या सहयोगाला मिळालेल्या भव्य यशानंतर या प्रतिष्ठित कंपन्या पुन्हा एकदा नव्या सहयोगासह परतल्या आहेत, जेथे तरूण ग्राहकांना कार्यक्षमता व रोमांचपूर्ण राइडसाठी डिझाइन करण्यात आलेली प्रीमियम २५०सीसी स्ट्रीटफायटर नवीन हिरो एक्स्ट्रीम २५०आर जिंकण्याची संधी आहे.

या विशेष सहयोगामध्ये थम्स अपचा प्रसिद्ध स्वाद व धाडसी परसोना आणि हिरोची अभियांत्रिकी उत्कृष्टता व प्रगत तंत्रज्ञान यांचे संयोजन आहे, जे साहसी जीवनाचा आनंद घेणाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला पॉवर-पॅक अनुभव देते. एक्स्ट्रीम २५०आर व्यक्तिमत्त्व व रोमांचची साहसी प्रतीक आहे आणि थम्स अपचे तत्त्व ‘तूफानी’ उत्साहाशी परिपूर्ण संलग्न आहे.
मोहिम ‘दम है तो स्कॅन कर’ ग्राहकांना स्पेशल एडिशन थम्स अप पॅक्सवरील क्यूआर कोड स्कॅन करण्याचे आणि एक्स्ट्रीम २५०आरचे मालक बनण्याची संधी मिळवण्याचे आवाहन करते. हे पॅक्स संपूर्ण भारतात ऑगस्ट २०२५ पासून बाजारपेठांमध्ये उपलब्ध असतील.
हिरो मोटोकॉर्पचे इंडिया बीयूचे विपणन प्रमुख आशिष मिधा म्हणाले, ”गेल्या वर्षी थंडरव्हील्सला मिळालेल्या अद्भुत प्रतिसादामधून निदर्शनास आले की, हा उपक्रम राइडर्सच्या नवीन पिढीशी दृढपणे संलग्न आहे. आजच्या तरूणांची त्यांचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास व आवड दिसून येणारी बाइक असण्याची महत्त्वाकांक्षा आहे. एक्स्ट्रीम २५०आरसह हिरो मोटोकॉर्प गतीशीलता, शक्ती व स्टाइलसाठी निर्माण करण्यात आलेली मोटरसायकल देत आहे, जी उद्देशासह राइड करणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. थम्स अपसोबतचा आमचा सहयोग या उत्साहाला नव्या उंचीवर घेऊन जातो, साहस, स्वावलंबीत्व आणि रस्त्यावर न थांबणाऱ्या ऊर्जेची समान संस्कृती तयार करतो.”
कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, ”थम्स अपसह प्रत्येक अनुभव साहसीपणाला चालना देण्यासाठी आणि मर्यादा दूर करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हिरो मोटोकॉर्पच्या एक्स्ट्रीम २५० आरसोबत सहयोगाने थम्स अप थंडरव्हील्स २.० राइडर्स व रोमांचचा शोध घेणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे, ज्यांची मर्यादांना दूर करण्याची आणि न थांबता स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. आमच्यासाठी हा सहयोग तरूण ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेत्रात त्यांच्यासोबत संलग्न होण्याबाबत आहे. थंडरचा आस्वाद घ्या आणि पॅक स्कॅन करत सर्वोत्तम, वास्तविक व उत्साहपूर्ण अनुभवाच्या अॅक्शन पॅक थराराचा आनंद घ्या.”
हा सहयोग सर्वांगीण मोहिमेच्या माध्यमातून वाढवण्यात येईल, जी टीव्ही, डिजिटल जाहिराती, प्रभावक-नेतृत्वित क्रियाकलाप आणि आर्टिस्ट्ससोबतच्या सहयोगांच्या माध्यमातून राबवण्यात येईल, जे मुक्त स्वयं-अभिव्यक्तीच्या उत्साहाला साजरे करतात. एकत्रित, हिरो मोटोकॉर्प आणि थम्स अप साहसी व धाडसी राइडिंग संस्कृतीला चालना देत राहिल, तसेच भारतातील नीडर तरूणांना राइडचा आनंद घेण्यासोबत थंडरचा अनुभव घेण्यास प्रेरित करेल.