मुंबई, 09 नोव्हेंबर 2024: युनायटेड ब्रेव्हरिज लिमिटेड (UBL) ने आपली प्रतिष्ठित प्रीमियम बिअर ब्रँड ॲमस्टेल भारतात लॉन्च केली. मुंबईत झालेल्या या भव्य आयोजन सोहळ्याने संपूर्ण उपस्थितांना ॲमस्टरडॅमची सफर घडवून आणली. या लाँचसह युनायटेड ब्रेव्हरिजने भारताला प्रीमियम बिअरच्या नवीन युगाची ओळख करून दिली आहे. ॲमस्टरडॅमच्या या नामांकित बिअर ब्रांडला 150 वर्षांपेक्षा अधिक काळाचा एतिहासिक वारसा लाभलेला आहे. या कार्यक्रमात आदित्य रॉय कपूर, रणविजय सिंघा, वरुण सूद, रघु आणि राजीव, कुशा कपिला, जिम सरभ, बर्खा सिंग आणि अहसास चन्ना यांसारख्या प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती होती।
भारतीय ग्राहकांना उत्कृष्ठतेची हमी देणारी ॲमस्टेल ग्रँड ही बिअर प्रेमींना अभूतपूर्व, अतुलनीय अनुभव देण्यास सक्षम आहे. गुप्त घटक, संथपणे तयार केली जाणारी ही बिअर जास्त काळ परिपक्व राहते. ज्यामुळे तिची चव पूर्णपणे विकसित होऊन ती ग्राहकाला समृद्ध आणि समाधानी करते. उत्कृष्ट दर्जाचे बार्ली, अनोखे डच यीस्ट आणि काळजीपूर्वक निवडलेल्या हॉप्सचा वापर करून तयार केलेल्या या ॲमस्टेल ग्रँड बिअरचा प्रत्येक घोट हा ब्रँडच्या गुणवत्तेबद्दल अटूट बांधिलकीचा पुरावा देणारा आहे.
लाँचबद्दल बोलताना, युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी विक्रम बहल म्हणाले, “भारतीय ग्राहकांच्या अभिरुचीसाठी खास तयार करण्यात आलेल्या ॲमस्टेल या प्रीमियम स्ट्राँग बिअरचे अनावरण करताना आम्हाला आनंद होत आहे. अत्यंत सावधगिरीने मंद ब्रूइंग प्रक्रियेद्वारे आणि उच्च-स्तरीय दर्जेदार घटकासह ॲमस्टेल ग्रँड भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेला अनोखा बिअर अनुभव देते. प्रीमियम सेगमेंटमधील ही बिअर भारतीय बिअर चाहत्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. प्रिमियम पोर्टफोलिओमध्ये ती अग्रेसर ठरेल याची आम्हाला खात्री आहे.