गार्डला लक्‍सक्‍यूब वॉटर हीटरसाठी जर्मन डिझाइन अवॉर्ड २०२६ मध्‍ये जागतिक मान्‍यतेसह सन्‍मानित करण्‍यात आले

News Service

गुरूग्राम, मार्च २०२६: व्‍ही-गार्ड इंडस्‍ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडला त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण लक्‍सक्‍यूब वॉटर हीटरसाठी जर्मन डिझाइन अवॉर्ड २०२६ सह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. जर्मन डिझाइन कौन्सिलच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात येणारा हा पुरस्‍कार उत्‍पादन डिझाइनमधील उल्‍लेखनीय उपलब्‍धींना प्रशंसित करतो. फ्रँकफर्ट येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या पुरस्‍कार सोहळ्यामध्‍ये १७ देशांतधील आघाडीचे डिझाइनर्स व उद्योग तज्ञ उपस्थित होते.

२०२६ एडिशनला ५७ देशांमधील ३,९०० हून अधिक प्रवेशिका लाभल्‍या, ज्‍यासह हा सर्वात स्‍पर्धात्‍मक जागतिक डिझाइन प्‍लॅटफॉर्म ठरला आहे. अशा वैविध्‍यपूर्ण व उच्‍च क्षमतेच्‍या क्षेत्रामध्‍ये विजेते ठरण्‍यामधून व्‍ही-गार्डचा विश्वास दिसून येतो की अर्थपूर्ण डिझाइनमध्‍ये कार्यक्षमता, आकर्षकता आणि दैनंदिन प्रासंगिकतेचे सुरेख संयोजन असते. हा जर्मन डिझाइन अवॉर्ड्समध्‍ये कंपनीचा सलग दुसरा विजय आहे, जेथे गेल्‍या वर्षी कंपनीला त्‍यांच्‍या बीएलडीसी फॅन्‍ससाठी सन्‍मानित करण्‍यात आले होते, ज्‍यासह कंपनीची वाढती जागतिक डिझाइन क्षमता अधिक दृढ झाली आहे.

पुरस्‍कार-प्राप्‍त लक्‍सक्‍यूब वॉटर हीटरमधून आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या विचारशील अभियांत्रिकी व प्रीमियम डिझाइन शैलीच्‍या माध्‍यमातून दैनंदिन वापर श्रेणीला अधिक उत्‍साहित करण्‍यावर व्‍ही-गार्डचा भर दिसून येतो. या वॉटर हीटरमध्‍ये अॅडवान्‍स्‍ड थर्मोक्‍लाइन टेक्‍नॉलॉजी आहे, जी ३८ टक्‍के अधिक गरम पाणी देते, तसेच अधिक टिकाऊपणासाठी टायटॅनियम-इन्‍फ्यूज एनामेल-कोटेड टँक आणि उच्‍च दबाव व जड पाणी स्थितींमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले शक्तिशाली इनकॉली ८०० हीटिंग एलीमेंट आहे. १० लिटर, १५ लिटर व २५ लिटर क्षमतांमध्‍ये उपलब्‍ध आणि बीईई ५-स्‍टार प्रमाणित लक्‍सक्‍यूब वॉटर हीटरच्‍या सुसंगत घनाकृती आकारामध्‍ये कार्यक्षमता, ऊर्जा कार्यक्षमता व लक्षवेधक आकर्षकता आहे.

या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत व्‍ही-गार्ड इंडस्‍ट्रीज लि.चे मॅनेजिंग डायरेक्‍टर श्री. मिथुन चित्तीलाप्पिली म्‍हणाले, ”सलग दुसऱ्या वर्षी जर्मन डिझाइन अवॉर्ड जिंकणे व्‍ही-गार्डच्‍या जागतिक डिझाइन प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. यासह आमचा विश्वास दृढ झाला आहे की, अर्थपूर्ण नाविन्‍यता तंत्रज्ञान, आकर्षकता व सर्वोत्तम युजर अनुभवाच्‍या संयोजनामध्‍ये आहे. व्‍ही-गार्डमध्‍ये प्रकारापेक्षा डिझाइनला महत्त्व दिले जाते, तसेच ग्राहकांच्‍या वास्‍तविक गरजांची पूर्तता करण्‍याला व दैनंदिन राहणीमान उत्‍साहित करण्‍याला प्राधान्‍य दिले जाते. या मान्‍यतेसह भविष्याकरिता सुसज्‍ज घरगुती सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे, जेथे या सोल्‍यूशन्‍समधून ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षा दिसून येतात, तसेच नाविन्‍यता-केंद्रित डिझाइनमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करतात.”

जर्मन डिझाइन अवॉर्ड २०२६ मधील यशासह भारतातील नाविन्‍यता व डिझाइन उत्‍कृष्‍टतेला जागतिक स्तरावर घेऊन जाणारा ब्रँड म्‍हणून व्‍ही-गार्डचे स्‍थान अधिक दृढ झाले आहे. चार दशकांहून अधिक काळापर्यंत वारसासह व्‍ही-गार्डने भविष्‍याकरिता सुसज्‍ज, विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात येणारे सोल्‍यूशन्‍स निर्माण करणे सुरू ठेवले आहे, जे भारतातील व भारताबाहेरील कुटुंबांसाठी दैनंदिन राहणीमान अधिक सुलभ व उत्‍साहित करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button