व्ही-गार्डने स्‍वत:च्‍या प्‍लांटमध्‍ये उत्पादित केलेले इंडक्शन कूकटॉप ५-स्टार बीईई रेटिंग मिळवणारे भारतातील पहिले कूकटॉप ठरले

News Service

ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्‍सीकडून मिळालेल्‍या या उल्‍लेखनीय ५-स्‍टार मान्‍यतेमधून व्‍ही-गार्डचे इन-हाऊस डिझाइनमधील नेतृत्‍व, उत्‍पादन उत्‍कृष्‍टता आणि ऊर्जा-कार्यक्षम नाविन्‍यता दिसून येते

भारत, 12 जनवरी 2026: व्‍ही-गार्ड इंडस्‍ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने महत्त्वपूर्ण टप्‍पा संपादित केला आहे, जेथे ब्रँडचा इंडक्‍शन कूकटॉप मॉडेल VIC06V1 ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्‍सी (बीईई)कडून ५-स्‍टार (★★★★★) ऊर्जा कार्यक्षमता रेटिंग मिळवणारा भारतातील पहिला इंडक्‍शन कूकटॉप ठरला आहे.
या मान्‍यतेमधून व्‍ही-गार्डची ऊर्जा-कार्यक्षम नाविन्यता, इन-हाऊस उत्‍पादन उत्‍कृष्‍टता आणि अद्वितीय दर्जा मानकांप्रती कटिबद्धता दिसून येते. VIC06V1 इंडक्‍शन कूकटॉप व्‍ही-गार्डच्‍या अत्‍याधुनिक पेरूंदुराई प्‍लांटमध्‍ये डिझाइन व उत्‍पादित करण्‍यात आला आहे, ज्‍यासह ब्रँडचा स्‍वदेशी डिझाइनवरील फोकस अधिक दृढ झाला आहे. तसेच, हे मॉडेल जलद, अधिक स्‍वच्‍छ व अधिक पर्यावरणपूरक कूकिंग देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यासह ग्राहकांना कार्यक्षमता किंवा सोयीसुविधेबाबत तडजोड न करता वीजेचा वापर कमी करण्‍यास मदत होते.

VIC06V1 (५-स्‍टार बीईई प्रमाणित) इंडक्‍शन कूकटॉप १६०० वॅटचे अधिकतम पॉवर आऊटपुट देते. या मॉडेलमध्‍ये आठ पॉवर व टेम्‍परेचर लेव्‍हल्‍ससह आठ प्रीसेट कूकिंग मोड्स आहेत, ज्‍यामधून दररोज वैविध्‍यपूर्ण व कार्यक्षम कूकिंगची खात्री मिळते. सॉफ्ट-टच स्विच कंट्रोल्‍स आणि वाचण्‍यास सोपे असलेल्‍या डिजिटल डिस्‍प्‍लेला पूरक ४-तासांचा टाइमर, २४-तासांची प्रीसेट फंक्‍शन आणि एनर्जी व व्‍होल्‍टेज इंडीकेटर्स आहेत, ज्‍यामुळे सहजपणे देखरेख व कार्यसंचालन मिळते.

सुरक्षितता व विश्वसनीयतेसह डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या कूकटॉपमध्‍ये ३ केव्‍ही सर्ज संरक्षण, हाय-लो व्‍होल्‍टेज कट-ऑफ आणि बीआयएस सर्टिफिकेशन आहे. ग्रेड ए क्रिस्‍टलाइन ग्‍लास पॅनेल टिकाऊपणा व प्रिमियम फिनिशची खात्री देते, तर वजनाने हलकी डिझाइन व व्‍यापक वर्किंग रेंज जलद, कार्यक्षम कूकिंग देते. हे उत्‍पादन १ वर्षाची प्रॉडक्‍ट वॉरंटी आणि इंडक्‍शन कॉईलवर ३ वर्षांच्‍या वॉरंटीसह येते, ज्‍यामधून ग्राहकांना अधिक समाधान मिळते.

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत व्‍ही-गार्ड इंडस्‍ट्रीज लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. मिथुन चित्तिलापल्‍ली म्‍हणाले, “ही मान्‍यता इन-हाऊस डिझाइन, उत्‍पादन उत्‍कृष्‍टता, दर्जा मानक आणि ऊर्जा-कार्यक्षम नाविन्‍यतेवरील आमचा फोकस अधिक दृढ करते. या यशस्‍वी टप्‍प्‍याने नवीन उद्योग मापदंड स्‍थापित केले आहेत, तसेच ऊर्जा-कार्यक्षम होम अप्‍लायन्‍सेसमधील व्‍ही-गार्डचे नेतृत्‍व अधिक दृढ केले आहे.”

या महत्त्वपूर्ण यशासह व्‍ही-गार्डच्‍या VIC06V1 मॉडेलने भारतातील इंडक्‍शन कूकिंग श्रेणीसाठी नवीन मापदंड स्‍थापित केला आहे, तसेच भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी शाश्वत, उच्‍च-कार्यक्षम किचन अप्‍लायन्‍सेस वितरित करण्‍यामधील अग्रणी म्‍हणून कंपनीची भूमिका अधिक प्रबळ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button