मुंबई, ऑक्टोबर 7, 2025: व्हिसा ही डिजिटल पेमेंट्समधील जागतिक अग्रणी कंपनी ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) २०२५ मध्ये प्रमुख सहभागी असणार आहे, जेथे ते स्मार्ट व अधिक सर्वसमावेशक आर्थिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी पेमेंट्समध्ये तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा कशाप्रकारे फायदा घेतात हे दाखवणार आहे. हा इव्हेण्ट मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे ७ ते ९ ऑक्टोबरपर्यत आयोजित करण्यात आला आहे. अभ्यागत बूथ एल२ व एम२ येथे व्हिसासोबत संलग्न होत भावी पेमेंट नाविन्यतांचा अनुभव घेऊ शकतात.
जीएफएफमध्ये व्हिसा आपले जागतिक कौशल्य व स्थानिक सहयोगांना एकत्र करत कशाप्रकारे वाणिज्याच्या भविष्याला आकार देत आहे हे दाखवेल, तसेच आघाडीच्या बँका व फिनटेकसोबत नवीन उत्पादने व सोल्यूशन्सच्या मालिकेची देखील घोषणा करेल. एजेंटिक एआय, व्यवहार सक्षम करणारी तंत्रज्ञाने आणि पेमेंट सुरक्षिततेसाठी प्रगत एआयच्या माध्यमातून सर्वोत्तम वाणिज्यामधील सर्वोत्तम नाविन्यतांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. उपस्थित अभ्यागत विनासायास संक्रमण सोल्यूशन्सच्या लाइव्ह प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष या बाबींचा अनुभव घेऊ शकतात, तसेच नवीन श्वेतपत्रिका ‘ऑटोमेशन टू ऑटोनॉमी: हाऊ एजेंटिक एआय इज रिवॉल्यूशनिंग पेमेंट्स’ लाँच करण्यात येईल, जी वैयक्तिकृत, सुरक्षित रिटेलचे भविष्य सादर करते.
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारित होण्यासह, तसेच गेल्या आर्थिक वर्षात डिजिटल व्यवहारांमध्ये ४२ टक्क्यांनी वाढ होण्यासह विश्वसनीय व सर्वोत्तम पेमेंट सोल्यूशन्ससाठीची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे. व्हिसा या परिवर्तनामध्ये अग्रस्थानी आहे, नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स विकसित करत आहे, जे भारतातील ग्राहकांच्या व व्यवसायांच्या विविध गरजांची पूर्तता करतात.
”भारत फिनटेक नाविन्यतेमध्ये जागतिक आघाडीवर आहे आणि एजेंटिक एआय डिजिटल पेमेंट्समधील विकासाचा पुढील टप्पा संपादित करण्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे व्हिसा इंडिया व साऊथ एशियाच्या उत्पादन विभागाचे प्रमुख रामकृष्णन गोपालन म्हणाले. ”ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये आम्हाला व्हिसा एजेंटिक एआयच्या क्षमतांचा वापर करत अधिक वैयक्तिकृत, सर्वोत्तम व सुरक्षित पेमेंट अनुभव कशाप्रकारे निर्माण करत आहे, हे दाखवण्याचा आनंद होत आहे. आम्ही डिजिटल परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जी ग्राहकांना व व्यवसायांना सक्षम करते, तसेच सर्वांसाठी अधिक सर्वसमावेशक व सर्वोत्तम आर्थिक भविष्याला चालना देते.”
कंपनी पेमेंट्सच्या भविष्याला कशाप्रकारे आकार देत आहे, तसेच स्मार्ट, अधिक सर्वसमावेशक डिजिटल भारताप्रती कशाप्रकारे योगदान देत आहे हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये व्हिसासह सामील व्हा.