व्‍हॉट्सअॅपकडून भारतात दुसऱ्या बिझनेस समिटचे आयोजन; व्‍यक्‍ती व व्‍यवसायांना कनेक्‍ट होण्‍यासोबत व्‍यवसाय करण्‍यासाठी मदत करणाऱ्या वैशिष्‍ट्यांचे प्रदर्शन

News Service
  • नवीन टूल्‍स व्‍यवसायांना कटिबद्धता, ग्राहक पाठिंबा आणि शोधक्षमतेला चालना देण्‍यास मदत करतील

मुंबई, सप्‍टेंबर १६, २०२५ – सर्व आकाराच्‍या व्‍यवसायांना त्‍यांची उपस्थिती दर्शवण्‍यास, सर्वोत्तम व आनंददायी ग्राहक अनुभव निर्माण करण्‍यास आणि त्‍यांचा व्‍यवसाय वाढवण्‍यास सक्षम करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत व्‍हॉट्सअॅपने मुंबईत आयोजित करण्‍यात आलेल्‍या दुसऱ्या वार्षिक बिझनेस समिटमध्‍ये अनेक टूल्‍स आणि सुधारित वैशिष्‍ट्ये दाखवली. हे व्‍यवसाय समिट ग्राहकांमध्ये दृढ संबंधाला चालना देण्‍यासाठी, कायर्ससंचालने सुव्‍यवस्थित करण्‍यासाठी आणि व्‍हॉट्सअॅप बिझनेसचा फायदा घेत असलेल्‍या सर्व आकाराच्‍या व्‍यवसायांकरिता कार्यक्षमतेला गती देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

व्‍हॉट्सअॅप बिझनेस अॅपवर पेमेंट्स
आपल्‍या विद्यमान क्षमता अधिक दृढ करत व्‍हॉट्सअॅपने आता लहान व्‍यवसायांसाठी क्षमता सादर केल्‍या आहेत, जेथे त्‍यांना व्‍हॉट्सअॅप बिझनेस अॅपमध्‍ये प्रत्‍यक्ष सुरक्षित व सोईस्‍कर पेमेंट पर्याय दिला आहे. अॅपवर हा पर्याय उपलब्‍ध असल्‍याने लहान व्‍यवसाय आता जलद व कार्यक्षम विक्री व्‍यवहारांसाठी एका टॅपमध्‍ये त्‍वरित क्‍यूआर कोड शेअर करू शकतात, ज्‍यामुळे ग्राहक व्‍हॉट्सअॅपवर त्‍यांच्‍या निवडीने पेमेंट पद्धतीचा वापर करत प्रत्‍यक्ष पेमेंट करू शकतात.
अधिक ग्राहक पाठिंब्‍यासाठी अॅपमध्‍ये कॉलिंग + बिझनेस एआय*
व्‍हॉट्सअॅपने नवीन वैशिष्‍ट्य सादर केले आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते प्रत्‍यक्ष अॅपमधून एका टॅपमध्‍ये मोठ्या व्‍यवसायांशी संपर्क साधू शकतात किंवा त्‍यांनी विनंती केलेल्‍या व्‍यवसायांचे कॉल्‍स स्‍वीकारू शकतात. ही कॉलिंग क्षमता विशेषत: व्‍यक्‍ती चौकशी करत असताना आणि ग्राहक समर्थन कार्यकारीची संवाद साधण्‍याची गरज असताना लाभदायी आहे. हे वैशिष्‍ट्य भारतात व्‍हॉट्सअॅप बिझनेस प्‍लॅटफॉर्मवर सर्व व्‍यवसायांसाठी उपलब्‍ध आहे आणि लवकरच, व्‍हॉट्सअॅप अतिरिक्‍त पाठिंब्‍यासाठी वॉईस मेसेजेस् पाठवण्‍याची व स्‍वीकारण्‍याची किंवा व्हिडिओ कॉल करण्‍याची सुविधा सुरू करणार आहे, जे टेलिहेल्‍थ अपॉइण्‍टमेंट सारख्‍या गोष्‍टींसाठी उपयुक्‍त ठरू शकते.

व्‍हॉट्सअॅप बिझनेस प्‍लॅटफॉर्मवर हे अपडेट्स आल्‍याने व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍यासाठी सर्वोत्तम असलेल्‍या पद्धतीने संवाद साधण्‍यास मदत होईल. व्‍यवसाय अधिक ग्राहक पाठिंबा* वाढवण्‍यासाठी देखील बिझनेस एआयची अंमलबजावणी करत आहेत, जेथे ग्राहक वॉईस कॉलिंग वैशिष्‍ट्याचा वापर करत एआय असिस्‍टण्‍टशी बोलताना त्‍यांच्‍या शंकांचे निराकरण करू शकतात.
अॅड्स मॅनेजरमध्‍ये केंद्रीकृत मोहिमा
भारतातील व्‍यवसाय आता व्‍हॉट्सअॅप, फेसबुक व इन्‍स्‍टाग्रामवर त्‍यांचे विपणन धोरण तयार करू शकतात आणि व्‍यवस्‍थापन करू शकतात, जे सर्व अॅड्स मॅनेजरमध्‍ये आहे. यामुळे व्‍यवसायांना एका केंद्रीकृत ठिकाणी समान क्रिएटिव्‍ह, सेटअप फ्लो व बजेट वापरता येतील. ऑनबोर्ड झाल्‍यानंतर व्‍यवसाय त्‍यांची सबस्‍क्रायबर यादी अपलोड करू शकतात आणि अतिरिक्‍त प्‍लेसमेंट म्‍हणून मॅन्‍युअली मार्केटिंग मेसेज निवडू शकतात किंवा अॅडवाण्‍टेज+ (Advantage+) वापरू शकतात, त्‍यानंतर मेटाच्‍या एआय सिस्‍टम कामगिरी वाढवण्यासाठी प्लेसमेंटमध्ये बजेट ऑप्टिमाइझ करतील.

व्‍यक्‍तींना स्‍टेटस टॅबवर अधिक व्‍यवसाय व चॅनेल्‍स शोधण्‍यास मदत
व्‍हॉट्सअॅप अपडेट्स टॅब दररोज जगभरात १.५ बिलियन व्‍यक्‍ती वापरतात आणि व्‍हॉट्सअॅप अॅड्स इन स्‍टेटस, प्रमोटेड चॅनेल्‍स आणि चॅनेल्‍स सबस्क्रिप्‍शन्‍सच्‍या माध्‍यमातून येथे व्‍यवसाय व क्रिएटर्ससाठी विकसित होण्‍याचे मार्ग निर्माण करत आहे (creating ways for businesses and creators to grow here). मारूती सुझुकी, एअर इंडिया व फ्लिपकार्ट यांसारखे ब्रँड्स अॅड्स इन स्‍टेटस वैशिष्‍ट्याचा वापर करत आहेत आणि भारतातील अपडेट्सचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींना लवकर हे वैशिष्‍ट्य पाहायला मिळेल. जिओ हॉटस्‍टार सारख्‍या लोकप्रिय चॅनेल्‍सनी देखील प्रमोटेड चॅनेल्‍सचा वापर करायला सुरूवात केली आहे. पुढील काही महिन्‍यांमध्‍ये ही वैशिष्‍ट्ये हळूहळू सुरू होतील आणि तुमच्‍या व्‍हॉट्सअॅप चॅट्स व इनबॉक्‍सपासून दूर असतील.

व्‍हॉट्सअॅपने दाखवले की मारूती सुझुकी ब्रँड व त्‍यांच्‍या उत्‍पादनांच्‍या शोधाला चालना देण्‍यासाठी अॅड्स इन स्‍टेटसचा वापर करत आहे. एमएसआयएलच्‍या मार्केटिंगचे कार्यकारी संचालक भुवन धीर म्‍हणाले, ”आम्‍ही व्‍यवसाय विकासाला गती देण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात व्‍हॉट्सअॅपचा वापर करत आहोत. अॅड्स ऑन व्‍हॉट्सअॅप स्‍टेटस आम्‍हाला आमची उत्‍पादने व सेवांचा शोध आणि विक्रीला चालना देण्‍यास अधिक मदत करेल.”

”व्‍हॉट्सअॅपचे नवीन अॅड्स इन स्‍टेटस वैशिष्‍ट्य एअर इंडियाच्‍या डिजिटल-केंद्रित परिवर्तन दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे, जेथे जाहिरात फक्‍त दिसण्‍याबाबत नाही तर रिअल-टाइम संबंधांना चालना देण्‍याबाबत आणि सर्वोत्तम, तंत्रज्ञान-केंद्रित टचपॉइण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांचा प्रवास उत्‍साहित करण्‍याबाबत आहे. या वैशिष्‍ट्यामध्‍ये त्‍वरित ग्राहक सहभाग, बुकिंग्‍ज व पाठिंब्‍यासाठी विनासायास पाथवे तयार करण्‍याची क्षमता आहे. यामुळे आम्‍हाला प्रत्‍यक्ष ग्राहकांच्‍या दैनंदिन परस्‍परसंवादांमध्‍ये सर्वोत्तम प्रवास अनुभव देता येईल,” असे एअर इंडिया लिमिटेडचे मुख्‍य विपणन अधिकारी सुनिल सुरेश म्‍हणाले.
एकाच वेळी लहान व्‍यवसायांसाठी व्‍हॉट्सअॅप बिझनेस अॅप आणि व्‍हॉट्सअॅप बिझनेस प्‍लॅटफॉर्मचा वापर
लहान व्‍यवसाय आता एकाच वेळी व्‍हॉट्सअॅप बिझनेस अॅप आणि व्‍हॉट्सअॅप बिझनेस प्‍लॅटफॉर्मचा वापर करू शकतात, ज्‍यासाठी त्‍यांना त्‍यांचा फोन नंबर बदलण्‍याची गरज नाही. व्‍यवसायांना विपणन मोहिमांमधून (जसे सीटीडब्‍ल्‍यूए) व्‍हॉट्सअॅपवर ग्राहकांच्‍या मेसेजमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा असेल किंवा त्‍यांची व्‍हॉट्सअॅप बिझनेस प्‍लॅटफॉर्मवर (एपीआय) ऑटोमेशन वापरण्‍याची इच्‍छा असेल तर ते ग्रुप चॅट्स, कॉल्‍स आणि स्‍टेटस अपडेट्स अशा दैनंदिन परस्‍परसंवादांसाठी व्‍हॉट्सअॅप बिझनेस अॅपचा वापर करू शकतात. यामुळे झपाट्याने विकसित होत असलेल्‍या व्‍यवसायांना मोठ्या प्रमाणात स्थिरता आणि अधिक विकास करण्‍याची संधी मिळेल.

व्‍यक्‍तींसाठी नागरी सेवांची सहज उपलब्‍धता
भारतात व्‍यक्‍ती आणि व्‍यवसाय करत असलेल्‍या परस्‍परसंवादामध्‍ये मेसेजिंग महत्त्वाचे बनले आहे, जेथे भारतातील ९१ टक्‍के ऑनलाइन प्रौढ व्‍यक्‍ती आठवड्याला व्‍यवसायांसोबत चॅटिंग करतात (कंतार २०२५ अहवाल). व्‍हॉट्सअॅपची सुलभता व सहजतेमुळे हे अॅप व्‍यक्‍ती व व्‍यवसायांसाठी, तसेच राज्‍यभरातील सरकारी एजन्‍सी आणि संस्‍थांसाठी पसंतीचा पर्याय बनले आहे.

मेटाचे भारतातील व्‍यवस्‍थापकीय संचालक व कंट्री हेड अरूण श्रीनिवास म्‍हणाले, ”दररोज सर्व आकाराचे व्‍यवसाय जलद आणि अधिक प्रभावी ग्राहक अनुभव देण्‍यासाठी व्‍हॉट्सअॅपचा फायदा घेत आहेत. आमचे नवीन टूल्‍स व वैशिष्‍ट्यांसह आम्‍हाला विश्वास आहे की व्‍यवसाय प्रबळ आरओआय संपादित करतील, ग्राहकांसोबत दृढ व अधिक वैयक्तिक संबंध निर्माण करतील आणि यशस्‍वीरित्‍या विकास करतील.

भारतात व्‍हॉट्सअॅप आपल्‍या दैनंदिन जीवनाचा आवश्‍यक भाग बनले आहे, व्‍यक्‍तींना कनेक्‍टेड राहण्‍यास, शॉपिंग करण्‍यास, शिक्षण घेण्‍यास आणि आवश्‍यक सेवा उपलब्‍ध करून देण्‍यास मदत करत आहे. भारतातील लाखो व्‍यक्‍ती तिकिटे खरेदी करण्‍यासाठी, त्‍यांचे मेट्रो पासेस रिचार्ज करण्‍यासाठी आणि युटिलिटी बिलांचे पेमेंट करण्‍यासाठी व्‍हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. पण, परिसंस्‍था निर्माण करण्‍याची गरज आहे, जेथे प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या सोयीनुसार आवश्‍यक सेवा उपलब्‍ध होतील. आम्‍हाला आनंद होत आहे की, भारतातील अधिकाधिक राज्‍य सरकार व्‍यक्‍तींना आवश्‍यक सार्वजनिक सेवा उपलब्‍ध करून देण्‍याकरिता आमच्‍यासोबत सहयोग करत आहेत.”

आज, अनेक राज्‍य सरकार आवश्‍यक सार्वजनिक सेवा सहजपणे आणि डिजिटली उपलब्‍ध करून देण्‍यासाठी व्‍हॉट्सअॅपच्‍या पोहोचचा फायदा घेत आहेत. व्‍हॉट्सअॅप अधिकृत नागरी सेवा चॅटबोट लाँच करण्‍यासाठी ओडिशा, महाराष्‍ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू यांसारख्‍या राज्‍य सरकारसोबत काम करत आहे. या वर्षाच्‍या सुरूवातीला लाँच करण्‍यात आलेली आंध्रप्रदेश सरकारची ‘मन मित्र’ चॅटबोट आता ७०० हून अधिक नागरी सेवा देते आणि त्‍वरित, सुरक्षितपणे व विविध प्रादेशिक भाषांमध्‍ये आवश्‍यक सरकारी सेवा उपलब्‍ध होण्‍यासाठी ४ दशलक्ष नागरिकांनी या चॅटबोटचा वापर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button