यामाहाकडून महाराष्‍ट्रासाठी विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा

News Service
  • Yamaha 125cc Hybrid स्‍कूटर श्रेणीवर विशेष किमतीचे फायदे
  • स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍सवर आकर्षक कमी डाऊन पेमेंट योजना

संपूर्ण महाराष्‍ट्र गणेशोत्‍सव जल्‍लोषात साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना इंडिया यामाहा मोटर राज्‍यातील ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्ससह या सणाला साजरा करत आहे. यामाहाच्‍या विशेष उत्‍सवी डिल्‍स देत आहेत, जेथे त्‍यांच्‍या लोकप्रिय हायब्रिड स्‍कूटर श्रेणी व मोटरसायकल्‍सवर आकर्षक किंमत फायदे, विस्‍तारित वॉरंटी आणि सुलभ आर्थिक योजना देत आहे. ज्‍यामुळे तुमची स्‍वप्‍नवत यामाहा स्‍कूटर किंवा मोटरसायकल खरेदी करण्‍याची ही परिपूर्ण वेळ आहे.

यामाहाच्‍या महाराष्‍ट्रातील गणेश चतुर्थी विशेष उत्‍सवी ऑफर्स:
• RayZR 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid Street Rally स्‍कूटर्सवर १०,०१० रूपये किमतीचा फायदा.
• हायब्रिड स्‍कूटर श्रेणीवर आकर्षक व्‍याजदरासह कमी डाऊन पेमेंट, ज्‍याची सुरूवात ४,९९९ रूपयांपासून होते.
• FZ मोटरासयकल श्रेणीवर आकर्षक व्‍याजदरासह कमी डाऊन पेमेंट, ज्‍याची सुरूवात ७,९९९ रूपयांपासून होते.
• मोटरसायसकल्‍सची स्‍पोर्टी R15 श्रेणी आता आकर्षक व्‍याजदरासह १९,९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या कमी डाऊन पेमेंटमध्‍ये उपलब्‍ध आहे.
• MT-15 आता आकर्षक व्‍याजदरासह १४,९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या कमी डाऊन पेमेंटमध्‍ये उपलब्‍ध आहे.

तसेच, यामाहा आपल्‍या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या संपूर्ण मेड-इन-इंडिया श्रेणीवर १०-वर्ष टोटल वॉरंटी देत आहे. नवीन १०-वर्ष टोटल वॉरंटीमध्‍ये २-वर्ष स्‍टॅण्‍डर्ड वॉरंटी आणि अतिरिक्‍त ८-वर्ष एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटीचा समावेश आहे. यासह, यामाहा दुचाकी आता त्‍यांची हायब्रिड स्‍कूटर श्रेणी (Ray ZR Fi, Fascino 125 Fi) आणि मॅक्‍सी-स्‍पोर्ट्स स्‍कूटर Aerox 155 Version S साठी जवळपास १,००,००० किमीच्‍या उद्योग-अग्रणी वॉरंटी कव्‍हरेजसह येतील. या टोटल वॉरंटी उपक्रमांतर्गत संपूर्ण मेड-इन-इंडिया मोटरसायकल श्रेणी (FZ Series, R15, and MT-15) जवळपास १,२५,००० किमीपर्यंत कव्‍हर केली जाईल.

यामाहाच्‍या स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍सच्‍या स्‍टायलिश व कार्यक्षमता-संचालित श्रेणीसह गणेश चतुर्थी साजरी करा. आजच महाराष्‍ट्रातील तुमच्‍या जवळच्‍या यामाहा डिलरशिपला भेट द्या आणि या उत्‍सवी ऑफर्सचा फायदा घ्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button