- स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल EC-06 १६९ किलोमीटरच्या प्रमाणित रेंजसह येते आणि कंपनीच्या ब्ल्यू स्क्वेअर शोरूम्सच्या माध्यमातून सुरूवातीला निवडक शहरांमध्ये विक्री करण्यात येईल
चेन्नई, तामिळनाडू – २ फेब्रुवारी २०२६: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 च्या किमतीची घोषणा केली, जी INR 1,67,600 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ब्ल्यूईश व्हाइट रंगामध्ये उपलब्ध असलेल्या या मॉडेलची यामाहाच्या प्रीमियम ब्ल्यू स्क्वेअर शोरूम्सच्या माध्यमातून निवडक शहरांमध्ये विक्री करण्यात येईल. EC-06 सह यामाहाने इलेक्ट्रिक गतीशीलता विभागामध्ये धोरणात्मक प्रवेश केला आहे, ज्यासह पर्यावरणीय स्थिरतेप्रती त्यांची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. हे लाँच भारत सरकारच्या ‘नॅशनल मिशन ऑन ट्रान्सफॉर्मेटिव्ह मोबिलिटी’मध्ये प्रत्यक्ष योगदान देते, तसेच २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन संपादित करण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाशी संलग्न आहे. EC-06 लाँच करत यामाहाने भारतीय उत्सर्जन मानक आणि देशाच्या हरित, आत्मनिर्भर भविष्याप्रती दृष्टिकोनाशी संलग्न राहत आपल्या व्यापक कार्बन-न्यूट्रॅलिटी ध्येयांना अधिक दृढ केले आहे.

आधुनिक, स्टायलिश व कार्यक्षम प्रवास पर्यायाचा शोध घेत असलेल्या राइडर्सना लक्ष्य करत डिझाइन करण्यात आलेली EC-06 प्रमाणित १६९ किमी रेंज देते, ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी योग्य पर्याय आहे. डिझाइनमध्ये यामाहाचे मुलभूत डीएनएसह आधुनिक डिझाइन शैलींचे संयोजन आहे. या वेईकलचा स्थिर पवित्रा व सुधारित डिझाइन सर्वांचे लक्ष वेधून घेते, तसेच वाहतूकीमध्ये सहजपणे नेव्हिगेट होण्याची खात्री देते. होरिझोण्टल कोअर डिझाइन संतुलन व अचूकता देते. सुस्पष्ट व आकर्षक बॉडी लाइन्स व्यावहारिक, पण विशिष्ट राइडिंग अनुभवाचा शोध घेत असलेल्या तरूणांच्या गरजांची पूर्तता करतात.
जागतिक दृष्टिकोनासह भारतात डिझाइन करण्यात आलेल्या EC-06 मध्ये शक्तिशाली आयपीएमएसएम (इंटीरिअर परमनण्ट मॅग्नेट सिन्क्रोनॉस मोटर)ची शक्ती आहे, तसेच ४ केडब्ल्यूएच फिक्स बॅटरी आहे. ही स्कूटर ७९ किमी/तास अव्वल गती, २६ एनएम अधिकतम टॉर्क आणि ६.७ केडब्ल्यू सर्वोच्च शक्ती देते, ज्यामधून दैनंदिन वापरासाठी शाश्वत कार्यक्षमतेची खात्री मिळते. बॅटरी ३-वर्ष किंवा ३०,००० किमी वॉरंटीसह येते आणि प्रमाणित होम प्लग-इन क्षमतेसह स्कूटर सहजपणे चार्ज करता येते. स्कूटर जवळपास आठ तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते, ज्यासह डाऊनटाइम कमी होतो आणि दैनंदिन राइडसाठी स्कूटर सुसज्ज राहते. अतिरिक्त समाधानासाठी ही स्कूटर मोटर व बॅटरीकरिता आयपी६७ प्रमाणित आणि इतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी आयपी६५ प्रमाणित आहे, ज्यामधून उच्च दर्जाचे जलरोधक व धूळरोधक वैशिष्ट्य मिळते.

विविध राइडिंग पसंतीनुसार EC-06 मध्ये इको, स्टँडर्ड व पॉवर हे तीन राइडिंग मोड्स आहेत, ज्यामुळे राइडर्स गरजेनुसार कार्यक्षमता, कामगिरी किंवा अॅक्सेलरेशन ऑप्टिमाइज करू शकतात. सोईस्कर रिव्हर्स मोड अरूंद जागेमध्ये स्कूटर नेव्हिगेट करणे सोपे करतो, तर टेलिस्कोपिक फ्रण्ट सस्पेंशनसह हायड्रॉलिक डॅम्पर्स आणि रिअर कॉईल स्प्रिंग सस्पेंशन शहरातील वाहतूकीमध्ये सहजपणे राइड करण्याची खात्री देतात.
२०० मिमी फ्रण्ट व रिअर डिस्क ब्रेक्स आणि कॉम्बी ब्रेक सिस्टम (सीबीएस) असलेली EC-06 अचूक ब्रेकिंग व सुधारित स्थिरता देते. आकर्षक कलर एलसीडी डिस्प्ले स्पीड, बॅटरीची स्थिती, राइडिंग मोड्स आणि कनेक्टीव्हीटी वैशिष्ट्ये याबाबत रिअल-टाइम माहिती देतो, ज्यामुळे प्रत्येक राइड उत्साहपूर्ण व माहितीपूर्ण बनते. याला पूरक एलईडी हेडलाइट्स व टेललाइट्स आहेत, जे रात्री राइड करताना व कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी अधिक दृश्यमानता देतात, तसेच स्कूटरच्या डिझाइनमध्ये स्लीक, समकालीन आकर्षकतेची भर देखील करतात.
कनेक्टीव्हीटीला नव्या उंचीवर घेऊन जात नवीन ईव्ही स्कूटरमध्ये ‘यामाहा मोटर कनेक्ट आर’ अॅप आहे, जे कनेक्टेड राइडिंग अनुभवासाठी रिअल-टाइम डेटा व स्मार्ट वैशिष्ट्ये देते. सीटखाली २४.५ लिटर प्रभावी स्टोरेजसह राइडर्सना हेल्मेट्स, बॅग्ज किंवा दैनंदिन आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी एैसपैस जागा मिळते, ज्यामुळे EC-06 शहरी जीवनशैलीसाठी परिपूर्ण सोबती आहे.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष श्री. हाजीम ओटा म्हणाले, “EC-06 यामाहाच्या शाश्वत शहरी गतीशीलतेप्रती प्रवासामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वांतर्गत कार्बन-न्यूट्रल भविष्याच्या दिशेने भारत झपाट्याने वाटचाल करत असताना यामाहाला उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिक नाविन्यतेच्या माध्यमातून या राष्ट्रीय अजेंडाला पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो. दैनंदिन प्रवासासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या स्कूटरमध्ये कार्यक्षमतेसह कामगिरीचे उत्तम संतुलन आहे, जी प्रभावी रेंज आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये देते. यामाहाच्या या अद्वितीय मॉडेलमधून निदर्शनास येते की शाश्वतता आणि राइडिंग उत्साह एकत्र मिळू शकतात, जे आमच्या ब्रँडचे तत्त्व असण्यासोबत भारताच्या हरित अर्थव्यवस्थेच्या भविष्याच्या दिशेने आमची जबाबदारी आहे.”
यामाहाची कटिबद्धता उत्पादन वितरणापलीकडे जाते. भारतातील सर्वसमावेशक ईव्ही परिसंस्थेशी पूरक राहत अगदी योग्य वेळी EC-06 लाँच करण्यात आली आहे, जेथे प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना आणि चार्जिंग पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण अशा उपक्रमांचे पाठबळ आहे. विकासाचे स्थानिकीकरण करत आणि ‘मेक इन इंडिया’ भावनेशी संलग्न होत यामाहाचा देशाचे जीवाश्म इंधनांवरील अवलंबन कमी करण्यामध्ये, तसेच दुचाकी उद्योगाचे कार्बन प्रमाण कमी करण्यामध्ये प्रमुख कंपनी असण्याचा मनसुबा आहे.
आजच्या तरूण, तंत्रज्ञान-प्रेमी ट्रेण्डसेटर्सच्या गरजांची पूर्तता करत EC-06 नाविन्यता, स्टाइल व शाश्वततेचा अवलंब करणाऱ्या राइडर्सचे लक्ष वेधून घेते. ते स्मार्ट, विश्वसनीय व विशिष्ट गतीशीलता सोल्यूशन्स देणाऱ्या वेईकलचा शोध घेत आहेत, ज्यामधून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि पर्यावरणाप्रती जागरूक मानसिकता दिसून येते.