- अव्वल चार विजेत्या टीम्सना आयआयटी दिल्ली येथे इन्क्यूबेशन सपोर्टसाठी १ कोटी रूपये अनुदान मिळाले.
- अव्वल २० टीम्सना देखील प्रत्येकी १ लाख रूपये आणि सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप स्मार्टफोन्स मिळाले.
- या उपक्रमामध्ये स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप हब आणि अटल इनोव्हेशन मिशनसोबत बहुवार्षिक सहयोग करण्यात आला.
भारत – ऑक्टोबर २९, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज त्यांचा राष्ट्रीय शिक्षण उपक्रम ‘सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्यांची घोषणा केली. हा उपक्रम तरूण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक समुदायांमधील प्रचलित आव्हानांसाठी तंत्रज्ञज्ञानाचा वापर करत वास्तविक विश्वातील सोल्यूशन्स निर्माण करण्याचे चॅलेंज देतो.

पर्सिविया (बेंगळुरू), नेक्स्टप्ले एआय (औरंगाबाद), पॅरास्पीक (गुरूग्राम) आणि पृथ्वी रक्षक (पलामू) या अव्वल चार विजेत्या टीम्सना इन्क्यूबेशन अनुदानामध्ये १ कोटी रूपये मिळाले, तसेच ते आयआयटी दिल्लीच्या एफआयटीटी लॅब्समध्ये मार्गदर्शनासह त्यांच्या प्रोटोटाइप्सना विकासात्मक वास्तविक विश्वातील सोल्यूशन्समध्ये विकसित करत राहतील.
ज्यूरी पॅनेलमध्ये सॅमसंग नेतृत्व आणि शैक्षणिक संस्था, सरकार व उद्योगामधील तज्ञांचा समावेश होता, ज्यांनी सुरक्षित, स्मार्ट व सर्वसमावेशक भारतासाठी एआय; भारतात आरोग्य, स्वच्छता व स्वास्थ्याचे भविष्य; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणीय स्थिरता आणि क्रीडा व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन या चार थीमॅटिक ट्रॅक्समध्ये अंतिम स्पर्धकांच्या सोल्यूशन्सचे मूल्यांकन केले.
यंदा सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोमध्ये भारतभरातून हजारो सहभागी दिसण्यात आले, ज्यांनी साहसी, मानव-केंद्रित संकल्पनांना सादर केले, ज्यामध्ये नाविन्यता व उद्देशाचे संयोजन होते. पहिल्यांदाच, अंतिम स्पर्धकांना एफआयटीटीच्या प्रगत आरअँडडी पायाभूत सुविधेचा प्रत्यक्ष अनुभव देखील मिळाला, ज्यामुळे ग्रँड फिनालेपूर्वी त्यांच्या संकल्पना अधिक दृढ झाल्या.
शक्यतेला नव्या उंचीवर घेऊन गेलेले विजयी इनोव्हेशन्स
पर्सिविया (बेंगळुरू): वस्तूंना ओळखणारी एआय-समर्थित वीअरेबल ग्लासेस सिस्टम ३३-ग्रिड आवाज व कंपनाच्या माध्यमातून त्यांच्या स्थानाबाबत सांगते, ज्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना वस्तू कुठे आहेत हे समजते.
नेक्स्टप्ले एआय (औरंगाबाद): क्रीडासाठी मोबाइल-केंद्रित एआय प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये एआय व्हर्च्युअल कोच, एआय रेफरी आणि न्यूरो-इन्क्लुसिव्ह ट्रॅकरचा समावेश आहे, ज्यामुळे खेळाडूंना कधीही, कुठेही निष्पक्षपणा, उपलब्धता आणि सर्वसमावेशकतेची खात्री मिळते.
पॅरास्पीक (गुरूग्राम): रिअल-टाइम, स्पीकर-स्वतंत्र संभाषण वाढवणारे डिवाईस, जे डीप-लर्निंग अल्गोरिदम वापरून अस्पष्ट संभाषण (डिसार्थरिया) स्पष्ट संप्रेषणात रूपांतरित करते, व्यक्तींना आत्मविश्वासाने संवाद साधण्यास मदत करते.
पृथ्वी रक्षक (पलामू): समुदाय-संचालित हरित अॅप, जे वृक्ष दत्तक घेणे, पुनर्वापर आणि गेमिफाइड इको-अॅक्शनद्वारे शाश्वत जीवन जगण्यास प्रेरित करते, ज्यामुळे संपूर्ण भारतात पर्यावरणाबाबत जागरूकेतचा प्रसार होण्यास मदत होते.
भारतातील तरूण नवप्रवर्तकांचे सक्षमीकरण
नवी दिल्लीमधील ग्रँड फिनालेमध्ये प्रखर सहा महिन्यांच्या प्रवासानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये विविध मार्गदर्शन फेऱ्या, प्रोटोटाइम विकास व बूटकॅम्प्सचा समावेश होता. अव्वल २० अंतिम टीम्सना देखील त्यांची सर्जनशीलता व उज्ज्वल विश्व घडवण्याप्रती कटिबद्धतेसाठी प्रत्येकी १ लाख रूपये आणि नवीन सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप स्मार्टफोन्स मिळाले.
याव्यतिरिक्त, इव्हेण्टमध्ये पाच विशेष पुरस्कार देण्यात आले:
• गुडविल अवॉर्डस् (२) – प्रत्येकी १,००,००० रूपये
• यंग इनोव्हेटर अवॉर्डस् (२) – प्रत्येकी १, ००, ००० रूपये
• सोशल मीडिया चॅम्पियन अवॉर्ड – ५०,००० रूपये
भारताच्या नाविन्यता परिसंस्थेची निर्मिती
स्टार्टअप इंडिया (डीपीआयआयटी), एमईआयटीवाय स्टार्टअप हब आणि अटल इनोव्हेशन मिशन (नीति आयोग) यांच्यासोबत बहुवार्षिक सहयोगांच्या माध्यमातून सॅमसंग भारतातील युवा अभिनव समूहाला मजबूत करत आहे, तसेच भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामधील तरूण परिवर्तनकर्त्यांसाठी संधी निर्माण करत आहे.
”गेल्या काही वर्षांमध्ये सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोने नाविन्यता संकल्पना निर्माण केली आहे, जी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करते आणि भारताच्या प्रत्येक भागामधील सर्जनशीलतेला प्रशंसित करते. यंदा देखील आम्हाला लहान नगरे व ग्रामीण समुदायांकडून उदयास येत असलेल्या असाधारण संकल्पना पाहायला मिळाल्या, ज्यामधून पुष्टी मिळते की प्रतिभावान व्यक्तींसाठी कोणत्याच सीमा नाहीत. आमचा उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत राहण्याचा मनसुबा आहे, तसेच आम्ही डिजिटल इंडिया व स्टार्टअप इंडिया अशा सरकारच्या उल्लेखनीय उपक्रमांशी बांधील राहत अधिक सर्वसमावेशक व भविष्याकरिता सुसज्ज भारत घडवण्यासाठी या तरूणांना मार्गदर्शन करत आहोत, संसधानांचा पुरवठा करत आहोत आणि सक्षम करत आहोत,” असे सॅमसंग साऊथवेस्ट आशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जेबी पर्क म्हणाले.
ज्युरीमध्ये सॅमसंग नेतृत्व, शैक्षणिक संस्था आणि सरकार यांच्यामधील तज्ञांचा समावेश होता, जसे श्री. मोहन राव गोली (एमडी, एसआरआय-बी), श्री. पंकज मिश्रा (सीटीओ, एसआरआय-डी), श्री. युरान किम (एमडी, एसडीडी), श्री. केवाय रू (एमडी, एसआरआय-एन).
इतर ज्युरी सदस्यांनी मूल्यांकन प्रक्रियेमध्ये क्रॉस-डोमेन कौशल्य आणि विविध दृष्टिकोन आणले. पॅनेलमध्ये एमईआयटीवाय स्टार्टअप हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.एस. मदनगोपाल; आयआयटी दिल्ली येथील डिझाइनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीनिवासन वेंकटराम; भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयातील शास्त्रज्ञ ‘जी’ डॉ. राकेश कौर, स्टार्टअप इंडियाच्या प्रमुख ममता वेंकटेश आणि नीति आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक हिमांशू जोशी यांचा समावेश होता. या प्रत्येक मान्यवरांनी चारही थीममधील नोंदींचे मूल्यांकन केले. यांच्यासोबत अमेरिकन एम्बेसी स्कूलचे संचालक डॉ. रँड हॅरिंग्टन होते, ज्यांनी ‘क्रीडा व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन: शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी’ या थीमकरिता ज्युरीमध्ये काम केले आणि त्यांच्यासोबत डीपीआयआयटीचे संचालक डॉ. सुमीत के. जरंगल होते.
पुरस्कार वितरण समारंभातील प्रमुख पाहुण्यांमध्ये भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय के. सूद, भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प, आयआयटी दिल्लीच्या एफआयटीटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखिल अग्रवाल आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या युवा प्रमुख प्रज्ञा मोहन यांचा समावेश होता.
”भारताला याच तरूण नवप्रवर्तकांच्या पिढीची गरज आहे. त्यांच्यामध्ये जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या गोष्टींचे अनुकरण न करता उद्देशासह डिझाइन करण्याची क्षमता आहे. तळागाळापासून, स्थानिक आव्हानांशी संबंधित संकल्पना उदयास येतात तेव्हा त्यांच्यामध्ये उत्पादन देश म्हणून आपला मार्ग बदलण्याची ताकद असते,” असे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रो. अजय के. सूद म्हणाले.
भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नाविन्यतेला चालना
यंदाच्या पर्वामध्ये भारतातील प्रत्येक राज्यामधून सहभाग दिसण्यात आला, ज्यामध्ये द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील प्रबळ प्रतिनिधीत्वाचा समावेश होता. यासह नाविन्यतेला सर्वसमावेशक व सहजसाध्य करण्याप्रती सॅमसंगची मिशन अधिक दृढ झाली आहे. एआय-समर्थित सहजसाध्य साधने ते शाश्वतता अॅप्सपर्यंत या प्रकल्पांमधून समुदायांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये तरूण-केंद्रित तंत्रज्ञानाची क्षमता दिसून येते.
शाश्वत मार्गदर्शन, सॅमसंगच्या आरअँडडी कौशल्याची उपलब्धता आणि आयआयटी दिल्ली येथे इन्क्यूबेशनच्या माध्यमातून सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५ भारतातील नवप्रवर्तकांच्या भावी पिढीला निपुण करत आहे, तसेच भारतासाठी व भारताबाहेरील देशांसाठी तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देत आहे.