मुंबई, ८ नोव्हेंबर २०२४:
ऑस्ट्रेलिया-इंडिया इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड ट्रेड अॅग्रीमेंट (ईसीटीए) आणि भारतीय बाजारपेठेतील वाढत्या वाइन मागणीचा फायदा घेण्यासाठी अनेक ऑस्ट्रेलियन वाईन कंपन्या प्रोवाइन मुंबई 2024 मध्ये सहभागी होत आहेत. येथे ते भारतीय आयातदार आणि ग्राहकांना प्रीमियम ऑस्ट्रेलियन वाईन अनुभवण्याची संधी देतील.
ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेड) ग्लोबल व्हिक्टोरिया, इन्व्हेस्टमेंट एनएसडब्ल्यूसोबत सहयोगाने आणि वाइन ऑस्ट्रेलियाच्या पाठबळासह ११ ऑस्ट्रेलियन वाइनरीजना सादर करत आहेत, जे प्रोवाइन मुंबई २०२४ मध्ये वाइन्सच्या त्यांच्या पोर्टफोलिओला दाखवतील.
ऑस्ट्रेलियन पॅव्हिलियनमध्ये ११ ऑस्ट्रेलियन वाइनरीजमधील वाइन्सचा समावेश आहे, जे ऑस्ट्रेलिया वाइनची विविधता, अद्वितीयता आणि उत्क्रांतीला दाखवतात. यापैकी काही वाइन्स सोमेलियर निखिल अग्रवाल यांनी सादर केलेल्या दोन मास्टरक्लासेसमध्ये (यापैकी एक साऊथ ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडून सादर करण्यात येईल) देखील दाखवण्यात येतील.
ऑस्ट्रेलियन सहभागाबाबत मत व्यक्त करत ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनचे दक्षिण आशियामधील सीनियर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनर श्री. जॉन साऊथवेल म्हणाले, “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढती भागीदारी भारतीय आयातदारांसोबत जवळून काम करण्याचे आणि उत्कृष्ट ऑस्ट्रेलियन वाइन भारतीय बाजारपेठेत आणण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करते.भारत दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देत असून यामध्ये भारतीय वाइन उद्योगाच्या विकासासाठी तांत्रिक सहकार्याचाही समावेश आहे. प्रोवाइन मुंबई येथे ऑस्ट्रेलियन वाईनचे वैविध्य दाखवून हे घनिष्ठ नाते साजरे करताना आम्हाला आनंद होत आहे.”
ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात वैविध्यपूर्ण वाइन क्षेत्रांपैकी एक आहे. ६५ विशिष्ट वाइन प्रदेशांमध्ये १०० हून अधिक द्राक्षाच्या जातींची लागवड होण्यासह ऑस्ट्रेलियन वाइन ऑस्ट्रेलियामधील अद्वितीय हवामान व माती आणि त्यांची लागवड करणाऱ्या उत्कट समुदायांचे प्रतीक आहे. प्रभावित करण्यासाठी किंवा वीकेण्डला कॅज्युअल भेटीगाठीसाठी अत्याधुनिक रेड्सपासून मजेदार, फ्रूटी व्हाइट्स वाइनपर्यंत भारतीय ग्राहक ऑस्ट्रेलियाच्या नाविन्यपूर्ण वाइनमेकर्सनी डिझाइन केलेल्या वाइन्समध्ये परिपूर्ण सोबतीचा आनंद घेऊ शकतात, विशेषत: विविध भारतीय पाककलांसोबत या वाइन्सचा आस्वाद घेऊ शकतात.
वाइन उद्योगामधील जागतिक अग्रणी ऑस्ट्रेलिया जगामध्ये वाइनचा सहावा सर्वात मोठा उत्पादक, तसेच वाइनचा पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, जेथे त्यांच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास ६० टक्के वाइन जगभरात निर्यात केली जाते.
ऑस्ट्रेलिया-इंडिया इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड ट्रेड अॅग्रीमेंट (ईसीटीए) २९ डिसेंबर २०२२ रोजी लागू करण्यात आला. वाइनशी संबंधित प्रमुख ईसीटीए मार्केट अॅक्सेस निष्पत्ती पुढीलप्रमाणे:
- ५ यूएस डॉलर्स ते १५ यूएस डॉलर्सदरम्यान मूल्य असलेल्या बॉटल्ससाठी ९ वर्षांत टेरिफमध्ये १५० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने कपात.
- १५ यूएस डॉलर्स पेक्षा अधिक मूल्य असलेल्या बॉटल्ससाठी ९ वर्षांत टेरिफमध्ये १५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने कपात.