सूचना- या मजकुरातील सर्व माहिती १ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०२४ या काळातील आहे.
फ्लिपकार्टने यावर्षीच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद अनुभवला. एकूण ७२ लाख लोकांनी फ्लिपकार्टच्या साइटला भेट दिली. तसंच सणासुदीच्या काळात २८ कोटी युनिक व्हिझिटर्सने भेट दिली. यावरून ग्राहकांनी खरेदीसाठी डिजिटल माध्यमांचा स्वीकार केल्याचे दिसून येते. महानगरं आणि टीयर २+ शहरांसाठी वैयक्तिक प्राधान्यक्रम आणि आणि प्रीमियनाझेशनमुळे यश मिळालं असून त्यामुळे इ-कॉमर्सच्या क्षेत्रात नवे आयाम प्रस्थापित झाले आहेत.
विविध प्रकारच्या खरेदीसाठी भारतभरातील ग्राहक इ-कॉमर्सवर अवलंबून होते. मात्र पूर्व विभागातून गेल्या वर्षीच्या तुलनेत युनिक व्हिझिटर्समध्ये १४.८६% ची वाढ झाली तर ग्राहकांमध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. महानगर आणि इतर शहरातूनही असीच वाढ बघायला मिळाली असून त्यामुळे ब्रँडला मागणी वाढल्याचं दिसून आलं आहे.
काही विक्रेत्यांना या काळात विक्रीत ४०-५० टक्के वाढ बघायला मिळाली, तर एकूणच या प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांना ग्राहकांचा वाढलेला सहभाग, चांगल्या ऑफर्स, आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगली विक्री पहायला मिळाली.
या काळातल्या टॉप शॉपिंग ट्रेंड्सवर नजर टाकली असता असं लक्षात येतं की ग्राहक कसे फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स (विशेषत: लॅपटॉप आणि टॅबलेट), घरगुती उपयोगाच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधनं आणि इतर उपयुक्त वस्तूंकडे वळत आहेत. अनेक ग्राहकांनी सर्वोच्च ब्रँड्सची निवड केली आहे. यावरून ग्राहक प्रीमियमनायझेशन कडे वळत आहेत हे इथे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. या ब्रँड्सच्या विक्रीत वार्षिक १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. एआयचे फीचर्स असलेले प्रीमियम आणि मिड प्रीमियम स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. थर्ड पार्टी पार्टनर्स, बँका यामुळे ग्राहकांना खरेदी करणं सुलभ झालं आहे. या सर्व बाबींचा फ्लिपकार्टच्या यशात मोठा वाटा आहे.
सणासुदीच्या काळात समर्थचा क्राफ्टेड बाय भारत हा उपक्रमही पार पडला. ही या कार्यक्रमाची आठवं वर्षं होतं. त्यात २५००० उत्पादनं विक्रीसाठी ठेवली होती. त्यात हजारो सरकारी कारागिरांनी, विणकरांनी, एनजीओ, एलजीबीटीक्यू+ समुदाय. ग्रामीण भागातील उद्योजक यांचा सक्रिय सहभाग होता. समर्थ च्या विक्रेत्यांना १.६ पट वाढ बघायला मिळाली. या सेलच्या काळात त्यांच्या विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ झाली. समर्थमुळे १८ लाख लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात इ-कॉमर्सच्या क्षेत्रात प्रगती तर दिसतेच पण आर्थिक विकासालाही चालना मिळते.
या सणासुदीच्या काळात झालेल्या प्रगतीबद्दल बोलताना फ्लिपकार्टचे हेड ऑफ ग्रोथ आणि उपाध्यक्ष हर्ष चौधरी म्हणाले, “प्रत्येक वर्षी सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट ग्राहकांच्या गरजांनुसार वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असतं. यावर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे इ-कॉमर्सची व्याख्या नव्याने करण्याची आणि देशातील अगदी दुर्गम भागात ते पोचवण्याची गरज अधोरेखित होते. तंत्रज्ञान आणि आमचा रीच वाढल्यामुळे लाखो ग्राहकांना उत्तम शॉपिंगचा अनुभव आलाच पण त्याचबरोबर विक्रेत्यांच्या नेटवर्कचा विकास झाला. ग्राहकांना आनंद दिल्यामुळे तसंच आर्थिक विकासाला हातभार लावून आणि भारतातील विविध समुदायासाठी संधी निर्माण केल्यामुळे भारतातील रिटेल विश्वासाठी हा मोसम महत्त्वाचा ठरला.”
या सणावाराच्या दिवसात ग्राहकांना, विक्रेत्यांना आणि विविध ब्रँड्सना जास्तीत जास्त मूल्य मिळावं यावर फ्लिपकार्टने भर दिला. त्यामुळे लाखो लघू आणि मध्यम उद्योग, कलाकार, किराणा पार्टनर्सना त्याचा फायदा झाला. तसंच एक लाखापेक्षा अधिक नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. त्यामुळे गिग कामगारांचा चांगलाच फायदा झाला आणि परिसंस्थेचा व्यापक विकास झाला.