ग्राहक सॅमसंगच्या निओ क्यूएलईडी, ओएलईडी आणि क्रिस्टल ४के यूएचडी टेलिव्हिजन्सच्या प्रीमियम श्रेणीवर आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात, जसे जवळपास २० टक्के कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट आणि जवळपास ३० महिन्यांपर्यंत लाँग टेन्युअर ईएमआय
· या कालावधीदरम्यान कोणताही सॅमसंग टीव्ही खरेदी करणारे ग्राहक निवडक खरेदींवर अतिरिक्त फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, जसे जवळपास २,०४,९९० रूपये किमतीचा टीव्ही मोफत किंवा जवळपास ९०,९९० रूपये किमतीचा साऊंडबार मोफत
· फेस्टिव्ह कॅम्पेन ५ मार्च ते ३१ मार्च २०२५ पर्यंत राबवण्यात येईल, जेथे विशेष डिल्स Samsung.com वर आणि भारतभरातील निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील
गुरूग्राम, भारत – मार्च, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने गुढीपाडवा आणि उगादी साजरा करण्यासाठी आपल्या विशेश फेस्टिव्ह कॅम्पेनची घोषणा केली आहे, जेथे निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के, ओएलईडी आणि क्रिस्टल ४के यूएचडी टीव्ही मॉडेल्स अशा त्यांच्या प्रीमियम एआय मोठ्या स्क्रिन आकाराच्या टेलिव्हिजन्सवर अविश्वसनीय डिल्स उपलब्ध आहेत. ५ मार्च ते ३१ मार्च २०२५ पर्यंत राबवण्यात येणारी ही कॅम्पेन ग्राहकांना त्यांचा होम एंटरटेन्मेंट अनुभव अपग्रेड करण्यासाठी अद्वितीय ऑफर्स देते.

होम एंटरटेन्मेंटला नव्या उंचीवर घेऊन जात सॅमसंगच्या टेलिव्हिजन्सची प्रीमियम श्रेणी एआय-पॉवर्ड पिक्चर क्वॉलिटी, सर्वोत्तम साऊंड आणि स्लीक डिझाइन्ससह येते. ग्राहक निवडक खरेदीवर जवळपास २,०४,९९० रूपये किमतीचा टीव्ही मोफत किंवा जवळपास ९०,९९० रूपये किमतीचा साऊंडबार मोफत या डिल्सचा आनंद घेऊ शकतात. या इनोव्हेशन्सना अधिक खास बनवण्यासाठी सॅमसंग जवळपास २० टक्के कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट आणि जवळपास ३० महिन्यांसाठी फक्त २९९० रूपयांपासून सुरू होणारे सुलभ ईएमआय पर्याय देत आहे. तसेच, ग्राहक कोणत्याही सॅमसंग टीव्हीच्या खरेदीसह सॅमसंग साऊंडबार्सवर जवळपास ४५ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे सिनेमॅटिक व्युइंग अनुभवामध्ये अपग्रेड करण्याची ही परिपूर्ण संधी आहे. या ऑफर्स Samsung.com, आघाडीच्या ऑनलाइन पोर्टल्सवर आणि भारतभरातील निवडक सॅमसंग रिटेल आऊटलेट्समध्ये उपलब्ध असतील.
”सॅमसंगमध्ये आम्ही आकर्षक डिल्ससह अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्र करत, ग्राहकांच्या घरांमध्ये दर्जात्मक तंत्रज्ञान आणत त्यांचा व्युइंग अनुभव अधिक उत्साहित करण्याचा सतत प्रयत्न करतो. आमचे प्रीमियम एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्स मनोरंजनाला नव्या उंचीवर नेतात, अद्वितीय पिक्चर क्वॉलिटी, सर्वोत्तम साऊंड आणि विनासायास कनेक्टीव्हीटी देतात. आम्ही ऑसम इंडियासह सणासुदीचा काळ साजरा करत असताना सॅमसंगच्या एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्सच्या श्रेणीवर आकर्षक डिल्स देण्याचा आनंद होत आहे. या आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्सच्या माध्यमातून आमचा प्रीमियम होम एंटरटेन्मेंट अधिक सहजसाध्य करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचा व्युइंग अनुभव अधिक उत्साहित करता येईल आणि सर्वोत्तम पद्धतीने प्रियजनांसोबत सण साजरा करता येईल,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ संचालक विप्लेश दांग म्हणाले.
संपूर्ण मार्च महिना देण्यात येणाऱ्या सॅमसंगच्या नवीन फेस्टिव्ह ऑफर्स एआय-पॉवर्ड होम एंटरटेन्मेंट अधिक सहजसाध्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. प्रीमियम टीव्ही श्रेणी ग्राहक प्रगत एआय अपस्केलिंग, वास्तविक रंगसंगती अचूकता आणि उच्च दर्जाच्या साऊंड क्वॉलिटीसह सर्वोत्तम व्हिज्युअल्सचा आनंद घेऊ
शकण्याची खात्री देते. डॉल्बी अॅटमॉस व क्यू-सिम्फोनी असलेले सॅमसंग टेलिव्हिजन्स बहुआयामी ऑडिओ देतात, ज्यामुळे प्रत्येक सीन लक्षवेधक वाटतो. तसेच, सॅमसंग नॉक्स सिक्युरिटीसह वापकरर्ते सुरक्षित आणि विनाव्यत्यय स्मार्ट टीव्ही अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. एआयची शक्ती आणि क्वॉन्टम मॅट्रिक्स टेक्नॉलॉजीसह हे टेलिव्हिजन्स उच्च दर्जाचे कॉन्ट्रास्ट, क्लेरिटी व ब्राइटनेस देतात, ज्यामुळे कोणतीही लिव्हिंग रूम होम थिएटरमध्ये बदलून जाते.
सॅमसंगच्या फेस्टिव्ह कॅम्पेनमधून नाविन्यता आणि ग्राहक आनंदाप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते. ही कॅम्पेन तंत्रज्ञान, डिझाइन आणि मूल्याचे परिपूर्ण संयोजन देते. या ऑफर्स निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के, ओएलईडी टीव्ही आणि क्रिस्टल ४के यूएचडी टीव्ही श्रेणीमधील ५५ इंच व त्यावरील टीव्ही आकारांवर उपलब्ध आहेत.