फायनान्सिंग, रिसेलबाबत वाढता विश्वास आणि उपलब्ध मॉडेल्सच्या विस्तृत पर्यायांमुळे पहिल्या कारच्या श्रेणीचा चेहरामोहरा बदलत असताना तरुण खरेदीदार कार बाजारपेठेत लवकर प्रवेश करत आहेत, अधिक खर्च करत आहेत आणि अधिक सुसज्ज वेईकल्सची निवड करत आहेत.
भारतातील तरुण पहिल्या कारचा अर्थ बदलून टाकत आहे. पूर्वीच्या पिढ्यांसाठी पहिली कार म्हणजे बजेटचा काटेकोर विचार करून प्रामुख्याने परवडण्यायोग्यतेनुसार केलेली खरेदी असायची. पण, आजच्या अनेक तरुण खरेदीदारांसाठी हा अधिक विचारपूर्वक घेतलेला जीवनशैली आणि मूल्याशी संबंधित निर्णय ठरत आहे. ते कार बाजारपेठेत कमी वयात प्रवेश करत आहेत, जास्त खर्च करत आहेत आणि पहिल्याच दिवसापासून एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करू शकणाऱ्या वेईकलचा शोध घेत आहेत.
कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेड (कोटक प्राईम)च्या मते, वयाच्या विशीच्या मध्यावर आणि तिशीच्या सुरुवातीला असणारे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे ग्राहक पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत आता पहिल्या कारवर जवळपास दुप्पट खर्च करत आहेत. एका दशकापूर्वी एन्ट्री-लेव्हल कारसाठी पहिली कार साधारणपणे १.५ लाख रुपये ते २.५ लाख रुपयांच्या मर्यादेत असायची. आज अनेक तरुण खरेदीदार ५ लाख रुपये ते ८ लाख रुपयांच्या मर्यादेतून सुरुवात करत आहेत, तर अनेकजण अधिक सुसज्ज व्हेरियंट्स, कॉम्पॅक्ट एसयूव्ही किंवा मिड-सेगमेंटच्या पर्यायांसाठी आपले बजेट आणखी वाढवत आहेत. सुरक्षा, आरामदायीपणा, तंत्रज्ञान, रस्त्यावरील लक्षवेधक उपस्थिती आणि दीर्घकालीन उपयुक्ततेबाबत वाढलेल्या अपेक्षांमुळे हा बदल घडून येत आहे.
पहिल्या कारची श्रेणी विकसित झाली आहे आणि हा बदल व्यापक ऑटो (वाहन) बाजारपेठेला नवीन आकार देत आहे,” असे कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेडचे एमडी आणि सीईओ सूरज राजप्पन म्हणाले. “आम्ही पहिल्या कारच्या खरेदीदारांच्या प्रोफाईलमध्ये स्पष्ट बदल पाहत आहोत. तरुण ग्राहक बाजारपेठेत लवकर प्रवेश करत आहेत आणि त्यांची पहिली कार आता केवळ वाहनाची मालकी मिळवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. सोयीस्कर ईएमआयच्या मर्यादेत सर्वोत्तम मूल्य मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे. ते कमी वयात बाजारपेठेत येत आहेत, अधिक खर्च करत आहेत, मोठ्या आणि अधिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज वेईकल्स निवडत आहेत, तसेच आपल्या आकांक्षा आणि परवडण्यायोग्यतेचा मेळ घालण्यासाठी फायनान्सिंगचा हुशारीने वापर करत आहेत.
गेल्या काही वर्षांत, वाहन उत्पादकांनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही, वैशिष्ट्यांनी समृद्ध मॉडेल्स आणि अधिक सुसज्ज व्हेरियंट्सच्या माध्यमातून तरुण खरेदीदारांसाठी पर्यायांची व्याप्ती वाढवली आहे. सुरक्षा, इन्फोटेन्मेंट, कनेक्टिव्हिटी आणि सोयीसुविधा अशी वैशिष्ट्ये एकेकाळी केवळ उच्च श्रेणीतील वेईकल्समध्ये पाहायला मिळत होती, पण आता कार मालकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात खरेदीच्या चर्चेचा महत्त्वाचा भाग बनत आहेत. तरुण खरेदीदारांसाठी, पहिल्या कारकडून ऑफिसचा दैनंदिन प्रवास, वीकेंड ट्रॅव्हल, कौटुंबिक वापर, रोड ट्रिप्स आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या सर्व गरजा पूर्ण करण्याची अपेक्षा असते, ज्यामुळे ते स्वाभाविकपणे अधिक सक्षम वेईकल्सकडे आकर्षित होत आहेत.
“पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण मूल्य श्रेणीत वाढले आहे,” असे सूरज म्हणाले. “तरुण ग्राहक आता केवळ सर्वात कमी किमतीचा पर्याय निवडत नाहीत. निर्णय घेण्यापूर्वी ते वेईकलमधील एैसपैस जागा, सुरक्षा, तंत्रज्ञान, रिसेल व्हॅल्यू आणि सोयीस्कर ईएमआय या सर्व बाबींची तुलना करत आहेत. आम्ही पूर्वी पाहिलेल्या खरेदी वर्तनापेक्षा हे अत्यंत वेगळे वर्तन आहे.
या बदलाचे महत्त्वाचे कारण म्हणजे संघटित पूर्व-मालकीच्या वेईकल्सच्या प्लॅटफॉर्मचा उदय आणि वापरलेल्या वेईकल्सबद्दल ग्राहकांचा वाढता विश्वास आहे. चांगल्या प्रकारे देखभाल केलेली जुनी एसयूव्ही किंवा मध्यम आकाराची कार अनेकदा नवीन एन्ट्री-लेव्हल कारच्या ईएमआयपर्यंत खरेदी करता येऊ शकते, ज्यामुळे मासिक खर्च फारसा न वाढवता उच्च श्रेणीतील कार घेणे आवाक्यात येते. प्रमाणित तपासणी, वॉरंटी, डिजिटल शोध आणि पारदर्शक किमती यामुळे जुन्या वेईकल्सशी संबंधित असलेला पारंपारिक संकोच देखील आता कमी झाला आहे.
फायनान्सिंग या परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोटक प्राईमने पहिल्या कारच्या कर्जाच्या रकमेत (तिकीट साइज) वाढ, ५ ते ७ वर्षांच्या दीर्घ कालावधीबाबत अधिक पसंती आणि तरुण कर्जदारांमध्ये परतफेडीची उत्तम शिस्त पाहिली आहे. पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या अनेकांसाठी ईएमआय परवडणारा बनला आहे. मासिक परतफेडीची रक्कम सोयीस्कर मर्यादेत असेल, तर ते दीर्घकाळासाठी अधिक चांगली सेवा देईल असे वाटणाऱ्या वेईकलसाठी एक किंवा अगदी दोन सेगमेंट्सवर जाण्यासही तयार आहेत.
या परिवर्तनामधून भारतातील व्यापक सामाजिक-आर्थिक बदल दिसून येते. तरुण व्यावसायिक कमी वयात कमावू लागले आहेत, कुटुंबांमध्ये दुहेरी उत्पन्नाचे प्रमाण वाढले आहे, शहरी प्रवासाच्या गरजा विस्तारल्या आहेत, तसेच प्रवास, आरामदायीपणा आणि सुरक्षेबाबत आकांक्षा अधिक प्रबळ झाल्या आहेत. या पिढीसाठी, पहिली कार म्हणजे केवळ प्रवासाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल नाही, तर बहुधा त्यांच्या आर्थिक आत्मविश्वासाची आणि वैयक्तिक प्रगतीची पहिली मोठी अभिव्यक्ती आहे.