माझा® ची ५० वर्षे: बाटलीमधील फ्लेवरच्‍या माध्यमातून भारतातील व्‍यक्तींच्या आंब्यावरील अतूट प्रेमाचा सन्‍मान

News Service

राष्ट्रीय, मे २०, २०२६: कोका-कोला इंडिया भारतातील व्‍यक्तींना आंब्याची अस्सल चव देणाऱ्या माझा® च्या ५० वर्षांचा उत्सव साजरा करत आहे. १९७६ मधील लाँचपासून माझाने उत्कृष्ट चव, बालपणीच्या आठवणी आणि अगदी अस्सल भारतीय वाटणाऱ्या क्षणांचा प्रबळ वारसा पुढे नेत स्वतःला आंब्यावरील भारताच्या प्रेमाशी घट्ट जोडून घेतले आहे.

पाच दशकांपासून, उन्हाळ्याच्या दुपार आणि कौटुंबिक गेट-टूगेदरपासून ते छोट्या-छोट्या दैनंदिन सेलिब्रेशन्सपर्यंत माझा®ची उपस्थिती पिढ्यानपिढ्या ओळखीची राहिली आहे. काळानुरूप, हा ब्रँड फक्त एक पेय न राहता घरातील आंब्याचा आनंद घेण्याचा एक असा पर्याय बनला आहे, जो मनाला दिलासा देणारा आणि संस्मरणीय वाटतो.

माझा® हे महत्त्‍वपूर्ण वर्ष साजरे करत असताना हा उत्सव फक्त ब्रँडच्या प्रवासापुरता मर्यादित नाही. हा ५० वर्षांचा वारसा त्या संपूर्ण व्यवस्थेला दिलेली एक मानवंदना देखील आहे, ज्याने या वर्षांमध्ये माझा®ला आकार दिला आहे. यामध्ये भारतातील ज्या शेतातून हा आंबा येतो त्या शेतांपासून ते हा ब्रँड आपल्या आयुष्याचा भाग बनवणाऱ्या ग्राहकांपर्यंत आणि प्रत्येक सिपच्या मागे असलेल्या अनेक हातांचा समावेश आहे.

कोका-कोला इंडिया आणि नैऋत्य आशियाच्या न्यूट्रिशन मार्केटिंग विभागाच्या सिनियर डायरेक्टर सुनैनिका सिंग म्हणाल्या, “माझा®ने भारतातील व्‍यक्तींच्‍या आयुष्यात, शेल्फ्सवर आणि आठवणींमध्ये आपले स्थान मिळवण्यात अर्धे शतक पूर्ण केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि कौटुंबिक मेळाव्यांमध्ये, रविवारच्या दुपारच्या जेवणानंतरच्या गोड पदार्थांमध्ये आणि सणासुदीच्या जेवणात, तसेच फोटो काढण्यासाठी खूप छोट्या पण विसरता येणार नाही अशा सुंदर क्षणांमध्ये माझा® नेहमी सोबत राहिला आहे. माझा®ला जे खास बनवते ते म्हणजे, प्रत्येक दशकात त्याने स्वतःचे मूळ अस्तित्व पूर्णपणे टिकवून ठेवले आहे: प्रामाणिक, आनंद देणारा आणि आंबा खाण्याचा सर्वात जवळचा अनुभव देणारा असा आपला दर्जा कायम ठेवला आहे. हा विश्वास ५० वर्षांच्या प्रवासातून निर्माण झाला आहे आणि पुढील ५० वर्षांसाठी आपल्याला हवी असलेली हीच एकमेव भक्कम पायाभरणी आहे.”

बदलत्या काळासोबत माझा®ने स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवून आणले आहेत, पण तरीही घराघरांमध्ये आवडते बनवणाऱ्या चवीशी आणि अनुभवाशी हा ब्रँड नेहमीच जोडलेला राहिला आहे. ‘ताझा मॅंगो, माझा® मॅंगो’ सारख्या ऐतिहासिक मोहिमेपासून ते ‘माझा® हो जाये’ सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी मोहिमांपर्यंत या ब्रँडने आंब्यावरील ग्राहकांचे अतूट प्रेम आणि दैनंदिन जीवनाला आकार देणारे छोटे, अत्यंत वैयक्तिक क्षण सातत्याने साजरे केले आहेत. यामुळे व्‍यक्तींचे आंब्याशी आणि माझा®शी असलेले भावनिक नाते अधिक दृढ झाले आहे.

ओगिल्वी इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, “माझा®ने नेहमी आंब्याच्या आनंदाचे प्रतिनिधीत्व केले आहे, फक्त एक फ्रूट ड्रिंक म्हणून नव्हे तर एक अशी भावना म्हणून ज्याच्यासोबत व्‍यक्ती मोठे होतात. आम्ही ५० वर्षे साजरी करत असताना हा उत्सव त्याच भावनेचा आणि प्रत्येक सिपसोबत ती भावना जिवंत करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा गौरव करण्याचा आहे.”

फक्त मोहिमांपुरते मर्यादित न राहता, माझा®चे आंब्यासोबतचे नाते प्रत्येक बाटलीच्या मागे असलेल्या अमराई आणि शेतकरी वर्गापासून सुरू होते. कोका-कोला इंडियाच्या प्रोजेक्ट उन्नतीच्या माध्यमातून कंपनीने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत भागीदारी केली आहे. याद्वारे अल्ट्रा-हाय-डेंसिटी प्लांटेशन (अति-घनता लागवड) आणि ठिबक सिंचन पद्धतींसह शाश्वत कृषी पद्धती सुरू करण्यात आल्या आहेत. या दीर्घकालीन ग्रोव्ह-टू-ग्लास (बागेपासून पेल्यापर्यंतच्या) दृष्टिकोनामुळे फळांची गुणवत्ता सुधारण्यास, उत्पादन वाढवण्यास आणि भारतातील आंबा लागवड परिसंस्थेला दृढ करण्यास मदत झाली आहे.

माझा® आता आपल्या पुढील अर्धशतकात प्रवेश करत असताना हा ब्रँड तोच आनंद, आपुलकी आणि समाधान साजरे करण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्याने गेल्या पाच दशकांतील त्याच्या प्रवासाला परिभाषित केले आहे. या संपूर्ण वर्षात, माझा® ब्रँडच्या मूळ ओळखीशी प्रामाणिक राहून संस्कृती आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या कथा, अनुभव आणि क्षणांच्या माध्यमातून आंब्याचा हा अनोखा उत्सव साजरा करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button