या यादीमध्ये वित्त, उत्पादन आणि मनोरंजन या क्षेत्रांमधील कंपन्यांचा समावेश आहे, ज्यामधून या शहराचे वैविध्यपूर्ण प्रोफेशनल स्वरूप दिसून येते
भारत, मे १९, २०२६: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज मुंबईसाठी आपली २०२६ टॉप कंपनीज यादी जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील १० कंपन्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, जिथे प्रोफेशनल्स आपले करिअर घडवू शकतात आणि प्रगती करू शकतात. प्लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्सच्या ॲक्टिव्हिटीमधून मिळालेल्या संकेतांवर आधारित ही यादी भारतातील सर्वात गतिमान करिअर बाजारपेठ मुंबईत प्रतिभेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांना प्रकाशझोतात आणते.
राष्ट्रीय स्तरावरील टॉप कंपनीज यादीचे हे आता १०वे वर्ष आहे. ही यादी बदलणारे उद्योग, उदयास येणाऱ्या भूमिका आणि नवीन कौशल्यांची मागणी या दृष्टीकोनातून व्यावसायिक जगताच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतिनिधीत्व करते. प्रगती करण्याची क्षमता, कौशल्यांची वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी असलेले नाते यांसारख्या आठ प्रमुख स्तंभांवरील लिंक्डइनच्या डेटावरून ही यादी तयार करण्यात आली आहे., करिअरच्या कोणत्याही टप्प्यावर असलेल्या प्रोफेशनल्ससाठी ही यादी उपयुक्त साधन ठरते.
लिंक्डइनच्या करिअर एक्स्पर्ट आणि इंडिया सिनियर मॅनेजिंग एडिटर निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्हणाल्या, “मुंबईतील टॉप कंपन्यांवरून दिसून येते की, हे एक असे शहर आहे जिथे वित्त, उत्पादन आणि मनोरंजन उद्योग एकत्र भरभराटीस येत आहेत. येथे तेच प्रोफेशनल्स यशस्वी होतील, जे स्प्रेडशीट्स, शॉप फ्लोअर्स आणि स्टोरीबोर्ड्स या तिन्ही आघाड्यांवर तितक्याच सक्षमतेने काम करू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांसाठी प्रश्न हा नाही की कोणत्या क्षेत्राची निवड करावी, तर प्रश्न हा आहे की त्यांची हस्तांतरणीय कौशल्ये विविध भूमिका आणि क्षेत्रांमध्ये प्रोफेशनल्ससाठी कशी मूल्य निर्माण करू शकतात.”
मुंबईत नोकरभरतीमध्ये वित्तीय कंपन्यांचे वर्चस्व
मुंबईच्या टॉप कंपनीज २०२६ च्या यादीत वित्त आणि उत्पादन कंपन्यांचे वर्चस्व आहे., पहिल्या १० पैकी ८ स्थानांवर याच कंपन्या आहेत. यामधून देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचे असलेले सामर्थ्य दिसून येते. बीएफएसआय क्षेत्रातून जेपी मॉर्गन चेस (#१), मॉर्गन स्टॅनली (#२) आणि सिटी (#३) अव्वल स्थानी आहेत, तर गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप (#९) आणि युनिलिव्हर (#१०) हे शहरातील उत्पादन क्षेत्राची ताकद दाखवून देतात. मुंबई ही देशाची मनोरंजनाची राजधानी देखील आहे, म्हणूनच जिओस्टार (#५) च्या रूपाने या यादीत मनोरंजन क्षेत्रातील कंपनी असणारे हे एकमेव शहर ठरले आहे.
मुंबईतील नियोक्त्यांचे राष्ट्रीय पातळीवर प्रबळ प्रतिनिधीत्व
मुंबईची ही यादी राष्ट्रीय यादीशी मोठ्या प्रमाणावर सुसंगत असल्याचे दिसते, कारण मुंबईतील टॉप १० पैकी ४ कंपन्यांचा समावेश लिंक्डइनच्या भारतातील २५ मोठ्या टॉप कंपन्यांच्या यादीत झाला आहे. जेपी मॉर्गन चेस कंपनी मुंबईच्या यादीत पहिल्या क्रमांकावर, तर राष्ट्रीय पातळीवर #४ क्रमांकावर आहे; मॉर्गन स्टॅनली मुंबईत #२ क्रमांकावर, तर राष्ट्रीय पातळीवर #१७ क्रमांकावर आहे आणि ईवाय मुंबईत #४ क्रमांकावर, तर राष्ट्रीय पातळीवर #९ क्रमांकावर आहे. या कंपन्या भारतातील सर्वात लोकप्रिय नियोक्त्यांसाठी असलेले मुंबई शहराचे आकर्षण अधोरेखित करतात. याशिवाय मुंबईच्या यादीतील सिटी (#३), जिओस्टार (#५) आणि डॉइश बँक (#६) सारख्या कंपन्या मुंबईतील प्रोफेशनेल्ससाठी विविध उद्योगांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यापक संधींकडे लक्ष वेधतात.
टॉप कंपनीमध्ये नोकरीच्या संधी शोधण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी निरजिता यांनी दिलेल्या काही खास टिप्स खालीलप्रमाणे आहेत:
● तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलला तुमचे प्रतिनिधीत्व करू द्या: टॉप कंपन्यांमधील रिक्रूटर्स सतत चांगल्या टॅलेंटच्या शोधात असतात. त्यामुळे तुमच्या प्रोफाइलवर तुमची टेक्निकल आणि मानवी दोन्ही कौशल्ये ठळकपणे दिसतील यावर लक्ष केंद्रित करा आणि सातत्याने विकसित करत राहा. बाजारपेठ नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, यामध्ये स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी लिंक्डइन लर्निंग तुम्हाला मदत करू शकते.
● योग्य भूमिकेसाठी प्रयत्न करा: अनेक ठिकाणी अर्ज करण्यापेक्षा जिथे खरोखर गरज आहे तिथेच लक्ष केंद्रित करा. लिंक्डइनचे जॉब मॅच वैशिष्ट्य तुमची कौशल्ये कोणत्या नोकरीसाठी अगदी योग्य आहेत हे त्वरित ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी सर्वात योग्य असलेल्या जॉब अॅप्लिकेशन्सवर अधिक वेळ घालवू शकाल.
● तुमचे नेटवर्क हीच तुमची खरी संपत्ती आहे: तुमच्या आवडीच्या कंपन्यांमधील सध्याच्या आणि माजी कर्मचाऱ्यांशी प्रामाणिक नाते निर्माण करा, त्यांच्या पोस्ट्स आणि कंटेंटवर व्यक्त व्हा आणि काळाच्या ओघात हे संबंध अधिक दृढ करा. योग्य उद्देश ठेवून तुमच्या समुदायाशी जोडले गेल्याने तुम्हाला अशा संधी शोधण्यात मदत होऊ शकते, ज्यांच्याबद्दल तुम्हाला आधी माहित नव्हते.
● नियोजनबद्ध राहा आणि प्रयत्न सुरू ठेवा: टॉप कंपन्यांमध्ये भरती सुरू आहे, पण या प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे तुमच्या अर्जांवर लक्ष ठेवा, पुढील फॉलो-अप्सचे नियोजन करा आणि तुमच्या नेटवर्कमधील अशा व्यक्तींना ओळखत राहा, ज्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या कंपन्यांमध्ये इतरांपेक्षा वेगळे ठरण्यास मदत करू शकतील.
२०२६ मुंबई टॉप कंपनीज इंडिया यादीत स्थान मिळवलेल्या १० कंपन्या खालीलप्रमाणे आहेत:
- जेपीमॉर्गन चेस (JPMorganChase)
- मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley)
- सिटी (Citi)
- ईवाय (EY)
- जिओस्टार (JioStar)
- डॉइश बँक (Deutsche Bank)
- एमएससीआय इंक. (MSCI Inc.)
- एचएसबीसी (HSBC)
- गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप (Godrej Enterprises Group)
- युनिलिव्हर (Unilever)