आर्थिक वर्ष २०२६ साठी ईबीआयटीडीए वार्षिक २५.८ टक्के वाढीसह ५६८ कोटी रूपयांवर पोहोचला आणि करोत्तर नफा (पीएटी) १३.० टक्के वाढीसह २२० कोटी रूपयांवर पोहोचला
आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीसाठी आतापर्यंतच्या सर्वोच्च तिमाही ईबीआयटीडीएची नोंद, जो वार्षिक २१.२ टक्के वाढीसह १८२ कोटी रूपयांवर पोहोचला
बोर्डने २७० टक्के लाभांशची शिफारस केली, जो प्रति इक्विटी शेअर ५.४ रूपये आहे
मुंबई, १५ मे २०२६: अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड (एबीडी) या भारतातील अग्रगण्य स्पिरिट्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ साठी आपले लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
एकत्रित आर्थिक निकालांचा संक्षिप्त आढावा:
वर्षातील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
कार्यसंचालनांमधून उत्पन्न ३,९४९ कोटी रूपये, आर्थिक वर्ष २०२५ मधील ३,५४१ कोटी रूपयांच्या तुलनेत ११.५ टक्के वाढ.
आतापर्यंतचा सर्वोच्च वार्षिक ईबीआयटीडीए ५६८ कोटी रूपये, आर्थिक वर्ष २०२५ मधील ४५१ कोटी रूपयांच्या तुलनेत २५.८ टक्के वाढ.
आतापर्यंतचा सर्वोच्च वार्षिक करोत्तर नफा (पीएटी) २२० कोटी रूपये, आर्थिक वर्ष २०२५ मधील १९५ कोटी रूपयांच्या तुलनेत १३.० टक्के वाढ.
आर्थिक २०२६ च्या चौथ्या तिमाहीमधील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून सलग ७व्या तिमाहीत सातत्यपूर्ण नफ्यातील कामगिरी.
कार्यसंचानांमधून उत्पन्न १,०२० कोटी रूपये, आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील ९३५ कोटी रूपयांच्या तुलनेत ९.१ टक्के वाढ.
आतापर्यंतचा सर्वोच्च तिमाही ईबीआयटीडीए १८२ कोटी रूपये, आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील १५० कोटी रूपयांच्या तुलनेत २१.२ टक्के वाढ.
आतापर्यंतचेसर्वोच्च तिमाही ईबीआयटीडीए मार्जिन १७.९ टक्के, आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील १६.१ टक्क्यांच्या तुलनेत १७९ बीपीएसने वाढ.
करोत्तर नफा (पीएटी) ३८ कोटी रूपये, आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील ७९ कोटी रूपयांच्या तुलनेत ५२.१ टक्के कपात.
या आर्थिक निकालांबाबत मत व्यक्त करत एबीडीचे व्यवस्थापकीय संचालक अलोक गुप्ता म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ हे एबीडीसाठी एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरले आहे. या वर्षात आम्ही विक्रमी वार्षिक नफा नोंदवला असून शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून सलग दुसऱ्या वर्षी प्रत्येक तिमाहीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हे यश आमच्या पीअँडए पोर्टफोलिओची वेगवान वाढ, लक्झरी पोर्टफोलिओची निर्मिती आणि शिस्तबद्ध खर्च व्यवस्थापनामुळे मिळाले आहे. आणखी एक महत्त्वाचे यश म्हणजे आयसीओएनआयक्यू व्हाईट (ICONiQ White)ने १० दशलक्ष केसेसचा टप्पा ओलांडला आहे. आमच्या उत्पादन क्षमतेच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे पुरवठा साखळीची कार्यक्षमता अधिक वाढेल आणि एबीडीची गतीमानता व मार्जिन सुधारण्यास मदत होईल. या प्रबळ पायावर आधारित, आता आम्ही वाढीच्या एका परिवर्तनीय टप्प्यात प्रवेश करत आहोत, जिथे नवीन आर्थिक वर्षात बाजारपेठेतील आमचे स्थान अधिक विस्तारण्यावर आणि मार्केट शेअर वाढवण्यावर आमचा भर असेल.”
मंडळाकडून लाभांश शिफारस
संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२६ साठी प्रत्येकी २ रूपयांच्या (पूर्ण भरणा झालेल्या) इक्विटी शेअरवर २७० टक्के, म्हणजेच प्रति शेअर ५.४ रूपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीनंतर हा लाभांश दिला जाईल.
आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीमधील कामगिरी आणि अलीकडील घडामोडींचा आढावा:
प्रेस्टीज अँड अबव्ह (पीअँडए) पोर्टफोलिओ: सातत्यपूर्ण वेगवान प्रिमियमायझेशन
आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ९.३ दशलक्ष केसेसची विक्री झाली, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील ८.५ दशलक्ष केसेसच्या तुलनेत वार्षिक ८.७ टक्के वाढ झाली. यामध्ये पीअँडए श्रेणीतील २०.५ टक्क्यांच्या प्रबळ वार्षिक वाढीचा मोठा वाटा आहे.
पीअँडए विभाग अधिक प्रबळ होत आहे, विक्रीच्या प्रमाणात वाढ होऊन ते आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ४७.० टक्क्यां वर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ४२.४ टक्के होते. तसेच, मूल्याच्या बाबतीत देखील सुधारणा होऊन ते आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ५७.७ टक्के झाले आहे, जे आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ५१.६ टक्के होते.
जगातील सर्वात वेगाने वाढणारा मिलियनेअर स्पिरिट्स ब्रँड (२०२३ आणि २०२४) असलेल्या आयसीओएनआयक्यू व्हाईट (ICONiQ White)ने मार्च २०२६ मध्ये १० दशलक्ष केसेसचा टप्पा ओलांडला. आर्थिक वर्ष २६ मध्ये या ब्रँडने १०.७ दशलक्ष केसेसची विक्री साध्य केली, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२५ मधील ५.७ दशलक्ष केसेसच्या तुलनेत ८७.८ टक्के वाढ झाली. सर्व बाजारपेठांमध्ये आपली पकड मजबूत ठेवत आणि परदेशातही विस्तार करत, हा ब्रँड मद्यपानासाठी कायदेशीर वयोमर्यादेत प्रवेश करणाऱ्या भारतातील नव्या पिढीतील ग्राहकांची पहिली पसंती बनत आहे.
लक्झरी पोर्टफोलिओ विस्तार (एबीडी माएस्ट्रो)
‘द कलेक्टिव्ह’ लिमिटेड एडिशन ३४-वर्षीय सिंगल माल्ट: फेब्रुवारी २०२६ मध्ये सादर करण्यात आलेली ‘द कलेक्टिव्ह’ ही एबीडी माएस्ट्रोची अल्ट्रा लक्झरी लिमिटेड एडिशन आहे. हे १९९१ मध्ये मॅकॅलन डिस्टिलरीमध्ये डिस्टिल केलेले एक दुर्मिळ ३४ वर्षांचे स्पीसाइड सिंगल माल्ट आहे. फक्त ६० हाताने बनवलेल्या आणि वैयक्तिकरित्या क्रमांकित केलेल्या बाटल्यांमध्ये हे उपलब्ध आहे, महाराष्ट्रात याची किंमत प्रति बाटली ११ लाख रूपये आहे. या लाँचला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, तसेच ५० टक्क्यांहून अधिक एडिशन आधीच प्री-ऑर्डर्स आणि विक्रीद्वारे सुनिश्चित झाले आहेत.
झोया पिंक: सुपर-प्रीमियम झोया जिन पोर्टफोलिओचा आकर्षक भाग म्हणून एप्रिल २०२६ मध्ये झोया पिंक लाँच करण्यात आले. झोया पिंक ब्रँडचे आधुनिक स्थान अधिक दृढ करते आणि विशेष प्रसंगांच्या निमित्ताने प्रीमियम ग्राहकांना लक्ष्य करते. महाराष्ट्रातील लाँचनंतर आता भारतातील इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये टप्प्याटप्प्याने हे उत्पादन उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
व्याप्तीमध्ये वाढ: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार
एबीडीने आपल्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीचा विस्तार केला आहे, जेथे आर्थिक वर्ष २०२५ मधील २३ देशांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३६ देशांपर्यंत आपली पोहोच वाढवली आहे.
आमच्या पोर्टफोलिओमधील सर्वात नवीन मिलियनेअर ब्रँड आयसीओएनआयक्यू व्हाईट (ICONiQ White) आता ९ देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
आमच्या सुपर-प्रीमियम ते लक्झरी पोर्टफोलिओमधील ब्रँड्स आर्थोस ब्लेंडेड माल्ट स्कॉच व्हिस्की आणि झोया जिन आता यूएई, न्यूझीलंड, आयव्हरी कोस्ट आणि रवांडा येथे उपलब्ध आहेत.
४५ कोटी रूपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसह कियॉन (KION) मधील इक्विटी हिस्सा संपादनास मंजुरी:
मार्च २०२६ मध्ये, कंपनीने कियॉन ब्लेंडर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (‘कियॉन’) मधील ५० टक्क्यांपर्यंत इक्विटी हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली. कियॉन आंध्र प्रदेशातील विझियानगरम येथे अंदाजे ३०० कोटी रूपयांच्या एकूण गुंतवणुकीसह ६६ एमएलपीए क्षमतेची ड्युअल-मोड डिस्टिलरी उभारत आहे, जी आर्थिक वर्ष २०२८ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या प्रस्तावित संपादनाचा उद्देश बॅकवर्ड इंटिग्रेशन प्रबळ करणे, पुरवठा साखळीची कार्यक्षमता सुधारणे आणि कंपनीची प्रमुख बाजारपेठेतील उत्पादन उपस्थिती अधिक दृढ करणे हा आहे.
प्रमुख पुरस्कार आणि सन्मान:
आयकॉन्स ऑफ व्हिस्की इंडिया अवॉर्ड्स २०२६: एबीडी माएस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडला १५व्या आयकॉन्स ऑफ व्हिस्की इंडिया अवॉर्ड्स २०२६ मध्ये ‘डिस्ट्रिलर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रीमियम आणि सुपर-प्रीमियम पोर्टफोलिओमधील उत्कृष्ट डिस्टिलिंग, नाविन्यता आणि गुणवत्तेतील सातत्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. याव्यतिरिक्त, आर्थोस ब्लेंडेड माल्ट स्कॉच व्हिस्कीला “कॅम्पेन इनोव्हेटर ऑफ द इयर” म्हणून गौरवण्यात आले. भारतातील प्रीमियम स्कॉच ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अत्यंत स्पर्धात्मक श्रेणीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी वापरलेल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लंडन स्पिरिट्स कॉम्पिटिशन २०२६: एबीडी माएस्ट्रोने लंडन स्पिरिट्स कॉम्पिटिशन २०२६ मध्ये घवघवीत यश संपादन केले. झोया स्पेशल बॅच जिन, झोया एस्प्रेसो कॉफी जिन आणि वूडबर्न्स कंटेम्पररी इंडियन माल्ट व्हिस्की या उत्पादनांनी तीन सुवर्णपदके पटकावली. यासोबत आर्थोस ब्लेंडेड माल्ट स्कॉच व्हिस्की, पुमोरी स्मॉल बॅच जिन, रंगीला कंटेम्पररी इंडियन व्होडका, झोया वॉटरमेलन जिन आणि सेग्रेडो अल्डिया व्हाईट रम यांनाही पुरस्कार मिळाले, ज्यामधून कंपनीच्या सुपर-प्रीमियम पोर्टफोलिओमधील गुणवत्ता आणि सातत्यता दिसून येते. तसेच, कंपनीचे मिलियनेअर ब्रँड्स स्टर्लिंग रिझर्व्ह बी७ व्हिस्की, आयसीओएनआयक्यू व्हाईट (ICONiQ White) व्हिस्की, गोल्डन मिस्ट ब्रँडी आणि कायरॉन ब्रँडी यांनीही अनेक पुरस्कार जिंकले. या यशामधून एबीडीच्या पोर्टफोलिओची व्याप्ती आणि जागतिक स्तरावर विविध श्रेणींमध्ये वाढत असलेली ओळख निदर्शनास येते.