कॅस्‍ट्रॉल इंडियाची शाहरूख खानसोबत नवीन मोहिम #GarmiMeinBhi3xProtection ने 3X प्रोटेक्‍शनला नव्‍या उंचीवर नेले

News Service
  • नवीन कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍ह 3X प्रोटेक्‍शन देते, जे इंजिनचे जास्‍त गरम होण्‍यापासून संरक्षण करण्‍यास मदत करते
  • ओगील्‍व्‍ही इंडियाने डिझाइन केलेल्‍या ‘#GarmiMeinBhi3xProtection मोहिमेचे नेतृत्‍व एसआरके करत आहेत
  • टेलिव्हिजन, डिजिटल, प्रिंट आणि आऊटडोअरवर १० भाषांमध्‍ये मल्‍टी-प्‍लॅटफॉर्म सादरीकरण  

मुंबई, ८ मार्च २०२५: कॅस्‍ट्रॉल इंडिया या देशातील आघाडीच्‍या ल्‍युब्रिकण्‍ट उत्‍पादक कंपनीने आपला प्रमुख दुचाकी इंजिन ऑईल ब्रँड कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍हच्‍या रिलाँचला पाठिंबा देण्‍यासाठी उच्‍च-प्रभावी विपणन मोहिम लाँच केली आहे. इंजिनला जास्‍त गरम होण्‍यापासून उच्‍च दर्जाचे 3X प्रोटेक्‍शन देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या उत्‍पादन अपग्रेडला मल्‍टी-चॅनेल मोहिमेचे पाठबळ आहे, ज्‍यामध्‍ये ब्रँड अॅम्‍बेसेडर शाहरूख खान आहेत. 

ओगील्‍व्‍ही इंडियाने संकल्‍पना मांडलेली ही मोहिम क्रिएटिव्‍ह हूक म्‍हणून भारतातील उन्‍हाळ्यामधील उष्‍ण तापमानाला प्रकाशझोतात आणते, तसेच उच्‍च अॅड्रेनालाइन चेस सीक्‍वेन्‍सच्‍या माध्‍यमातून या उष्‍ण तापमानामध्‍ये देखील कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍हची स्थिरता दाखवते. राजस्‍थानमधील उष्‍ण वाळवंटात शूटिंग करण्‍यात आलेल्‍या टीव्‍हीसीमध्‍ये एसआरकेने गुन्‍हेगारांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. हा पाठलाग अधिक तीव्र होत असताना कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍हची शक्‍ती असलेली त्‍यांची बाइक प्रखर उष्‍णतेवर मात करते, तर सामान्‍य इंजिन ऑईलची शक्‍ती असलेली गुन्‍हेगारांची बाइक जास्‍त गरम होते आणि थांबते.

”कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍हची गाथा साधी, पण शक्तिशाली आहे, ती म्‍हणजे प्रखर स्थितींमध्‍ये संरक्षण. या गाथेला सादर करण्‍यासाठी शाहरूख खान यांच्‍याहून उत्तम कोणीच नाही. त्‍यांची पडद्यावरील उपस्थिती, तसेच उत्‍पादनाचे प्रबळ वचन प्रभावी कथानक तयार करतात,” असे ओगील्‍व्‍ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणाले. ”या मोहिमेच्‍या माध्‍यमातून आम्‍ही लाखो बाइकर्सशी संलग्‍न होईल असे रोचक पैलू तयार करण्‍यासाठी उत्‍पादन कार्यक्षमता आणि प्रबळ कथानकाला एकत्र केले आहे.”

ही मोहिम १० भाषांमध्‍ये लाँच करण्‍यात आली आहे, ज्‍यामधून विविध ग्राहकवर्गांपर्यंत पोहोच वाढण्‍याची खात्री मिळते. टीव्‍हीसी रविवारी खेळवण्‍यात येणाऱ्या चॅम्पियन्‍स ट्रॉफी फायनलच्‍या प्रसारणादरम्‍यान पदार्पण करेल. टीव्‍ही व डिजिटल व्‍यतिरिक्‍त कॅस्‍ट्रॉल प्रभाव वाढवण्‍यासाठी प्रभावक सहयोग, सोशल मीडिया सहभाग आणि हाय-व्हिजिबिलिटी आऊटडोअर प्‍लेसमेंट्स यांचा देखील फायदा घेत आहे. या श्रेणीमध्‍ये मेकॅनिक्‍स अभिप्राय देण्‍यासाठी प्रमुख आहेत आणि या मोहिमेला प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी कॅस्‍ट्रॉल इंडिया भारतभरातील ४० शहरांमध्‍ये बादशाह मेकॅनिक जलसाचे आयोजन करेल, जेथे मेकॅनिक सल्‍ला व पसंती अधिक प्रबळ करण्‍यासाठी प्रत्‍यक्ष ३० हजारांहून अधिक मेकॅनिक्‍सशी संलग्‍न होईल. या रिलाँचचा भाग म्‍हणून ब्रँड नवीन पॅकेजिंग सादर करणार आहे, जेथे प्रत्‍येक पॅकवर शाहरूख खानचा फोटो पाहायला मिळेल.

”ओव्‍हरहिटिंग बाइकरसाठी प्रमुख समस्‍या आहे, जी भारतात विशेषत: अधिक दिसून येते, जेथे उन्‍हाळा खूप तप्‍त असतो आणि लांबच्‍या प्रवासादरम्‍यान इंजिन अधिक गरम होऊ शकते,” असे कॅस्‍ट्रॉल इंडियाचे उपाध्‍यक्ष व विपणन प्रमुख रोहित तलवार म्‍हणाले. ”ही मोहिम कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍हच्‍या 3X प्रोटेक्‍शनचे वचन अधिक दृढ करते, तसेच देशभरातील बाइकर्सच्‍या सर्वात मोठ्या समस्‍येचे निराकरण करत त्‍यांच्‍यासोबतचे संबंध अधिक दृढ देखील करते.”

‘#GarmiMeinBhi3xProtection’ मोहिम निदर्शनास आणते की, संरक्षणासारखा कार्यक्षम फायदा सर्वसमावेशक ग्राहक गाथेमध्‍ये परिवर्तन घडवून आणू शकतो. शाहरूख खान यांची स्‍टार पॉवर, प्रबळ उत्‍पादन तत्त्व आणि उच्‍च दर्जाच्‍या संरक्षणााला एकत्र करत कॅस्‍ट्रॉल इंडियाने मोहिम डिझाइन केली आहे, जी दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍याची अपेक्षा आहे.

”पडद्यावर गुन्‍हेगारांचा पाठलाग करायचा असो किंवा वास्‍तविक जीवनात वाहतूकीमधून नेव्हिगेट करायचे असो, उष्‍णता असह्य ठरू शकते,” असे शाहरूख खान म्‍हणाले. ”कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍हचे 3X प्रोटेक्‍शन खात्री देते की, इंजिन कूल राहतात आणि बाइक कार्यरत राहते. या मोहिमेसाठी कॅस्‍ट्रॉलसोबत सहयोग करताना आनंद होत आहे. ही मोहिम भारतातील प्रत्‍येक राइडरशी कनेक्‍ट होण्याच्‍या पद्धतीने या सर्वोत्तम उत्‍पादनाला प्रत्‍यक्षात आणते.”   

नवीन कॅस्‍ट्रॉल अॅक्टिव्‍ह आता भारतभरातील रिटेल आऊटलेट्स आणि ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button