मुंबईमध्ये आगमन करून नेत्रदिपक प्रदर्शनासह हा अविस्मरणीय प्रवास सुरू असणार आहे, ज्यात दूरदर्शी डिझाइनर
तरूण ताहिलियानी आणि शोस्टॉपर्स टायगर श्रॉफ आणि मानुषी छिल्लर यांचा समावेश आहे.
मुंबई, 08 मार्च 2025: गुरुग्राम
आणि चंदीगडमधील ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरच्या भरघोस यशानंतर, या टूरने आता पुढचे त्याचे प्रदर्शन मुंबईला
दाखवण्याचे ठरवले आहे, ज्यामुळे भारताची ग्लॅमर राजधानी एका आकर्षक नवकल्पक उपक्रमाच्या यशामध्ये रूपांतरित
झाली. या प्रदर्शनाने अत्याधुनिक कलेची क्रिएटिव्हीटी, धाडसी कलात्मक विधाने आणि समकालीन सौंदर्यशास्त्राच्या
कुशलतेने तयार केलेल्या सिम्फनीद्वारे पुन्ही प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. माझगाव येथील बेव्हिव लॉन्समधील जादुई फ्लोटिंग
रनवेमुळे तरूण ताहलियानीच्या आकर्षक डिझाइनसाठी मनमोहक वातावरण तयार झाले आहे, जो रनवे मुंबईच्या
किनारपट्टीच्या मोहक विस्तरासमोर करण्यात आला आहे.

माझगाव येथील बेव्ह्यू लॉन्स येथील भव्य तरंगत्या धावपट्टीने तरुण ताहिलियानीच्या उत्कृष्ट डिझाइनसाठी एक शो-
स्टॉपिंग पार्श्वभूमी प्रदान केली, जी मुंबईच्या किनारपट्टीच्या चित्तथरारक विस्तारासमोर सेट केली गेली होती.
फॅशन डिझाईन काऊंसिल ऑफ इंडिया (FDCI) च्या भागीदारीत, हा टूर भारतातील फॅशन क्षेत्रात मोहक प्रदर्शनांमुळे
क्रांती घडवत आहे. FDCI चे यश आणि टूरच्या अत्याधुनिक दृष्टी यांच्यातील समन्वय मुंबईत नवीन उंचीवर पोहोचला,
ज्याने परंपरेने प्राप्त गोष्टींचे नाविन्यपूर्णतेने अखंडपणे एकत्रिकरण केले आणि एका असाधारण देखाव्यासाठी एक नवीन
मानक स्थापित केले.
“इंडिया एन-व्होग” या मोहक थीम अंतर्गत, तरुण ताहिलियानी यांनी त्यांचा भव्य संग्रह ‘ड्रीमस्केप’ सादर केला. हा संग्रह
तीन मनमोहक थीममध्ये विभागला गेला होता – ‘रनवे ऑफ ड्रीम्स’ने त्याच्या शुद्ध स्वरूपात कल्पनारम्य चित्रण केले; ‘रेड
कार्पेट’ने अनियंत्रित ग्लॅमरचे मूर्त रूप दिले; आणि ‘टाइमलेस चार्म’, जो प्रतिष्ठेसाठी साक्षीदार ठरला.प्रत्येक विभागात
सिताराच्या अप्रतिम सिलुएटपासून झरतारच्या पारंपारिक एम्ब्रॉयडरी पर्यंत नाविन्यपूर्ण कलेच्या अपवादात्मक
कारागिरीचे प्रदर्शन करण्यात आले. ही प्रक्रिया बहारच्या निसर्ग-प्रेरित मोटिफ्सने सुरू झाली आणि नफीसच्या शांत
लक्झरीने संपली, ज्यामध्ये अमर्यादपणे स्त्रीत्वाच्या बारकावे असणाऱ्या रचनेला एकत्र करण्यात आले. शेवटी, भरपुर
आनंदासाठी समुद्रकिनारी असलेल्या लॉनवर एका उत्साही आफ्टर-पार्टी ठेवण्यात आली, ज्यात डीजे मा फैजाच्या
रोमांचक उर्जेने पार्टीचा आनंद द्विगुणीत केला.
पर्नोड रिकार्ड इंडियाचे ग्लोबल बिजनेस डेव्हलपमेंट विभागाचे मुख्य विपणन अधिकारी आणि प्रमुख कार्तिक मोहिंद्रा
म्हणाले, “ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर नेहमीच क्रिएटिव्हिटी मर्यादेपलीकडे नेण्यासाठी आणि फॅशनला कला म्हणून पुन्हा
समोर आणण्यासाठी आयोजित केला जातो. या अनोख्या भव्य तरंगत्या रनवेमुळे भारताची फॅशन राजधानी असलेल्या
मुंबईमध्ये टूर आणल्याने आम्हाला हे स्वप्न नवीन शिखरावर नेण्याची संधी मिळाली. जसजसे आपण पुढे जात राहू तसतसे
प्रत्येक अनुभव फॅशनच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात प्रदर्शन करत राहील, ‘द वन अँड ओन्ली’ या व्यासपीठाला
नावीन्यपूर्णता आणि आधी कधिही घडले नाही अशी प्रतिष्ठेची साक्ष देत राहील. ”
डिझाइनर तरून ताहिलियानी, या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की, “माझा संग्रह, ‘ड्रीमस्केप’, परंपरेने
चालत आलेल्या आणि आधुनिक गोष्टींचा एक उत्सव आहे, जिथे कालातीत कारागिरीला सहजतेने अभिजातता मिळते.
मुंबईच्या किनारपट्टीच्या मनमोहक वातावरणामध्ये, ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर व्यासपीठावर ते सादर करताना मला खूप
आनंद होत आहे. हा अनुभव खरोखरच जादुई होता आणि अशा फॅशन बाबत उत्सुक प्रेक्षकांसमोर माझे क्रिएटिव्ह
दृष्टिकोन सादर करण्याची मला संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे.”
शोस्टॉपर टायगर श्रॉफ म्हणाले, “ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरचा भाग असणे आणि तरुण ताहिलियानीच्या उत्कृष्ट कलाकृतींचे
प्रदर्शन करणे हे फारच अनोखे कार्य होते. त्यांच्या संग्रहामध्ये बारकावे असलेले तपशील आणि निर्दोष कारागिरीने
भरभरून जिवंतपणा होता. नाविन्यपूर्ण तरंगत्या रनवेमुळे हा अनुभव असाधारण बनला, डिझाइन आणि कारागिरीच्या
एकत्रिकरणामधून शुद्ध जादू निर्माण केली. अशा नेत्रदीपक वातावरणात त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व
करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो.”
मानुषी छिल्लार आपले मत मांडतांना म्हणाल्या, “ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरमध्ये तरुण ताहिलियानीच्या मंत्रमुग्ध
करणाऱ्या ड्रीमस्केप कलेक्शनसाठी भव्य तरंगत्या रनवेवर चालणे खरोखरच मंत्रमुग्ध करणारे होते. त्याच्या उत्कृष्ट
डिझाईन्सने मला आश्चर्यचकित केले आणि शहराची चैतन्यशील ऊर्जेमध्ये तर प्रत्येक क्षणाला जणूकाही जादूच भरलेली
होती. फॅशन आणि कलेचे हे एक अतिशय मनमोहक एकत्रिकरण होते आणि मी या टूरचा एक भाग होते याचा मला
अभिमान आहे.”
क्युरेटर आशिष सोनी म्हणाले, “मुंबई आवृत्ती ही ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरच्या प्रतिष्ठित जगाचे आणि त्याच्या अतुलनीय
हॉट क्युचर आणि नाविन्यपूर्ण डिझाइनच्या प्रदर्शनाद्वारे निर्माण होणाऱ्या प्रभावाचे एक उत्तम उदाहरण होती. टूरचे
क्युरेटर म्हणून, एन-व्होग अनुभवांचे ‘द वन अँड ओन्ली’ हे व्यासपीठ कसे आकार घेत राहणार हे बघणे आता फारच
उत्सुकतेचे झाले आहे.”
FDCI चे अध्यक्ष सुनिल सेठी म्हणाले, “ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरमध्ये आम्ही फॅशन क्षेत्राचा नवनवीन पद्धतीने विकास
करत असतो त्यामुळे यासोबत भागीदारी करण्याचा FDCI ला फारच मोठा अभिमान आहे. मुंबई आमच्या सांगितलेल्या
दृष्टिकोनाचा एक उत्तम पुरावा होता. फॅशनमधील दोन प्रमुख केंद्र म्हणून, आम्ही फॅशन अनुभवांचे भविष्य घडवण्यासाठी
वचनबद्ध आहोत.”
फॅशन टूर आता 8 मार्च 2025 रोजी विझागला जाणार आहे, जिथे डिझायनर अक्षत बन्सलचा ब्रँड, ब्लोनीच्या
नाविन्यपूर्ण डिझाईन्सना तमन्ना भाटियाच्या मनमोहक उपस्थितीने जिवंत केले जाईल.