७ शहरांमधील ३५० पेक्षा जास्त नोंदींनंतर, १६० अव्वल बारटेंडर्स प्रादेशिक चव आणि कथा राष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी स्पर्धा करत आहेत
मुंबई, २७ जुलै २०२६: भारतातील नवोदित मिक्सोलॉजिस्टना एकत्र आणणाऱ्या अत्यंत यशस्वी पदार्पणानंतर बार माएस्ट्रो आता राऊंड २ मध्ये पोहोचला आहे. हा सात शहरांमधील बारटेंडिंग चॅलेंज अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेडचा (एबीडी) लक्झरी आणि सुपर-प्रीमियम स्पिरिट्स विभाग एबीडी माएस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडद्वारे तुल्लीहो बेव्हरेज अकॅडमीच्या सहयोगाने आयोजित केला जात आहे. सुरुवातीच्या फेरीने देशभरातून ३५० हून अधिक नोंदी आकर्षित केल्या, तर या स्पर्धेभोवतीच्या चर्चेला सोशल मीडियावर व्यापक प्रतिसाद मिळाला. इंस्टाग्रामवर ७.६ दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले, ज्याने भारतातील नवोदित कॉकटेल टॅलेंटबाबत असणारा उत्साह अधोरेखित केला आहे.
सुरुवातीच्या फेरीच्या केंद्रस्थानी सर्जनशीलतेवर आधारित एक आव्हान होते: वूडबर्न्स कंटेंपररी इंडियन व्हिस्कीचा वापर करून एक मूळ हायबॉल कॉकटेल तयार करणे. बारटेंडर्सनी स्वतःला आकार देणाऱ्या परंपरा आणि भूप्रदेशांकडे पाहिल्यामुळे भारताच्या विविध वारशाची सुंदर झलक समोर आली. देशभरातील निवडीनंतर, १६० मिक्सोलॉजिस्ट राऊंड २ मध्ये प्रवेश करत आहेत, ज्यामध्ये प्रत्येक शॉर्टलिस्ट केलेले कॉकटेल तांत्रिक प्राविण्य, कल्पकता आणि सांस्कृतिक कथांकथनासाठी वेगळे ठरते.
मुंबई या स्पर्धेत उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून समोर आली आहे, ज्याने शहराइतक्याच विविध आणि गतिमान नोंदी सादर केल्या. स्थानिक बारटेंडर्सनी प्रादेशिक चवींना आधुनिक कॉकटेल संस्कृतीत अत्यंत कौशल्याने समाविष्ट केले, मग ते सुक्या बोंबलाद्वारे कोळी परंपरांचा सन्मान असो, शुभ्र इंद्रायणी तांदळाच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा गौरव असो किंवा नारळ आणि कोकमाच्या साहाय्याने किनारी ओळख टिपणे असो. प्रत्येक निर्मितीने तांत्रिक उत्कृष्टतेची सांस्कृतिक कथांकथनासोबत सुरेख सांगड घातली. कल्पकता आणि तांत्रिक कौशल्याच्या या शानदार प्रदर्शनामुळे एबीडी माएस्ट्रोने या शहराची स्पर्धात्मक क्षेत्र मर्यादा वाढवून मुंबईतील राऊंड २ च्या शॉर्टलिस्टची संख्या २० वरून दुप्पट करून ४० बारटेंडर्सवर नेली आहे.
बार माएस्ट्रोला मिळालेला प्रतिसाद आणि राऊंड २ च्या शुभारंभाबद्दल मत व्यक्त करत एबीडी माएस्ट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर बिक्रम बासू म्हणाले, ”बार माएस्ट्रोला मिळालेला प्रतिसाद भारतातील बारटेंडिंग समुदायाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. सहभागींनी त्यांच्या स्वतःच्या स्थानिक संस्कृती आणि घटकांभोवती कथांची रचना केलेली पाहणे अत्यंत उत्साहवर्धक होते. ही सर्जनशील स्वायत्तता एका जिवंत, नवीन भारतीय कॉकटेल संस्कृतीला चालना देत आहे. बार माएस्ट्रोच्या माध्यमातून आम्ही कारागिरी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देत राहू.
राऊंड २ चे परीक्षण उद्योगातील आदरणीय तज्ज्ञांच्या पॅनेलद्वारे केले जाईल, ज्यामध्ये अमि श्रॉफ, फ्लेअर बारटेंडर आणि मिक्सोलॉजिस्ट; अरिना सुचदे, शेफ, मिक्सोलॉजिस्ट आणि सस्टेनेबल फूड इनोव्हेटर; रोजिता तिवारी, ड्रिंक्स अँड डेस्टिनेशन्सच्या संस्थापक; आणि फिरुझान बिलिमोरिया, बेव्हरेज कन्सल्टंट यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ मुंबईतील ४ बारटेंडर्सची निवड करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, जे राष्ट्रीय अंतिम फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेची सांगता १९ ऑगस्ट २०२६ रोजी बार टेकओव्हरने होईल, त्यानंतर २० ऑगस्ट २०२६ रोजी ग्रँड फिनाले होईल, जिथे भारताच्या पहिल्या बार माएस्ट्रो विजेत्याला गौरविण्यात येईल.