मुंबई, २४ जुलै, २०२६: अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड (एबीडी) या भारतातील अग्रगण्य स्पिरिट्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी आपले लेखापरीक्षित न केलेले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीमधील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
स्वतंत्र वैशिष्ट्ये:-
• कार्यसंचालनांमधून मिळणारे उत्पन्न ९७५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील ९२६ कोटी रुपयांच्या तुलनेत ५.३ टक्के वाढ.
• ईबीआयटीडीए १४० कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील १२२ कोटी रुपयांच्या तुलनेत १४.४ टक्के वाढ.
• करोत्तर नफा (पीएटी) ६८ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील ६१ कोटी रुपयांच्या तुलनेत ११.९ टक्के वाढ .
• प्रबळ नफादायी वाढीचा वेग कायम.
एकत्रित वैशिष्ट्ये:-
• कार्यसंचालनांमधून मिळणारे उत्पन्न ९८४ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील ९३० कोटी रुपयांच्या तुलनेत ५.८ टक्के वाढ.
• ईबीआयटीडीए १२० कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ११९ कोटी रुपये होता. एबीडी माएस्ट्रो अंतर्गत नव्याने स्थापित सुपर-प्रीमियम ते लक्झरी पोर्टफोलिओमध्ये केलेल्या नियोजित गुंतवणुकीमुळे, ज्यामध्ये जाहिरात व प्रसिद्धीवरील वाढीव खर्च आणि वितरण विस्ताराच्या उपक्रमांचा समावेश आहे, ईबीआयटीडीए वाढ नियंत्रित राहिली. हे उपक्रम कंपनीच्या प्रीमियमवर आधारित वाढीच्या अजेंड्याला पाठबळ देतात.
• करोत्तर नफा (पीएटी) ४५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ५६ कोटी रुपये होता.
• जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा २४ कोटी रुपयांचा प्रभाव वगळता, लाइक-टू-लाइक (एलटीएल) ईबीआयटीडीए १४४ कोटी रुपये (२१.४ टक्के जास्त), ईबीआयटीडीए मार्जिन १४.७ टक्के (१८९ बेसिस पॉइंट्सने जास्त) आणि एलटीएल पीएटी ६३ कोटी रुपये (१३.६ टक्के जास्त) राहिला असता.
या निकालांबाबत मत व्यक्त करत एबीडीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमर सिन्हा म्हणाले, “आमची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीतील कामगिरी एबीडीच्या परिवर्तन प्रवासाची निरंतर प्रगती दर्शवते, ज्यामध्ये उत्पन्नातील स्थिर वाढ, अधिक समृद्ध पोर्टफोलिओ मिश्रण आणि संपूर्ण व्यवसायातील शिस्तबद्ध अंमलबजावणी यांचा समावेश आहे. या तिमाहीत जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा अल्पकालीन परिणाम झाला असला, तरी मूळ व्यवसाय प्रबळ आहे. आम्ही सध्या आमच्या मनुष्यबळात गुंतवणूक करणे, आमच्या ब्रँड्सना बळकटी देणे आणि आमच्या बॅकवर्ड इंटिग्रेशन प्रोजेक्ट्सची प्रभावी अंमलबजावणी कायम ठेवताना आमच्या प्रीमियमवर आधारित अजेंड्याला गती देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. नुकताच लागू झालेला भारत-यूके मुक्त व्यापार करार (एफटीए) मार्जिन वाढवणारा आहे, तसेच सुधारित स्त्रोत स्थिरतेद्वारे उच्च श्रेणीतील पोर्टफोलिओच्या संधींना पाठबळ देणारा आहे. या प्राधान्यक्रमांमुळे अधिक चपळ, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज एबीडी घडवण्यात मदत होणार आहे, तसेच मध्यम कालावधीत उत्पन्नात १५ टक्क्यांच्या आसपास वाढ मिळवण्याच्या आमच्या ध्येयाला पाठबळ मिळत आहे.”
आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीमधील कामगिरी आणि अलीकडील घडामोडींचा आढावा:
1) प्रेस्टीज अँड अबव्ह (पीअँडए) पोर्टफोलिओ: प्रिमियमायझेशनचा वेग कायम
• आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील ८.५ दशलक्ष केसेसच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ९.० दशलक्ष केसेसची विक्री झाली, ज्यातून एकूण विक्रीच्या प्रमाणात ६.२ टक्के वाढ दिसून येते. यामध्ये प्रीमियम अँड अबव्ह श्रेणीत वार्षिक आधारावर १०.७ टक्के वाढ झाली, तर मास प्रीमियम आणि इतर श्रेणीत वार्षिक आधारावर २.३ टक्के वाढ नोंदवली गेली.
• पीअँडए विभागाने पोर्टफोलिओमधील आपले योगदान वाढवले. विक्रीच्या प्रमाणानुसार त्याचे योगदान आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील ४६.२ टक्क्यांवरून वाढून आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ४८.२ टक्के झाले, तर मूल्याच्या दृष्टीने हे योगदान आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील ५५.८ टक्क्यांवरून ५९.३ टक्के झाले.
• सलग तीन कॅलेंडर वर्षे (२०२३, २०२४ आणि २०२५) जगातील सर्वात वेगाने वाढणारा मिलियनेर व्हिस्की ब्रँड ठरलेल्या आयकॉनिक व्हाईट ब्रँडने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ३.१ दशलक्ष केसेसची विक्री संपादित केली. दरमहा सरासरी १ दशलक्षहून अधिक केसेसची विक्री झाल्याने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील २.३ दशलक्ष केसेसच्या तुलनेत यात ३३.८ टक्के वाढ झाली. हा ब्रँड अंतर्गत बाजारपेठेत प्रबळ वेग कायम ठेवून परदेशातही आपला विस्तार सातत्याने वाढवत आहे, ज्यामुळे भारतातील कायदेशीर मद्यपान वयातील नवीन पिढीतील ग्राहकांमध्ये त्याचे स्थान अधिक दृढ होत आहे.
2) लक्झरी पोर्टफोलिओ: एबीडी माएस्ट्रो अंतर्गत सातत्यपूर्ण विस्तार
• झोया पिंक: सुपर-प्रीमियम झोया जिन पोर्टफोलिओचा आकर्षक भाग म्हणून एप्रिल २०२६ मध्ये झोया पिंक लाँच करण्यात आले. झोया पिंक प्रीमियम मद्य विभागातील ब्रँडचे समकालीन स्थान अधिक दृढ करते. महाराष्ट्रातील लाँचनंतर आता प्रसंगाला साजेशी पेये आणि ग्राहक प्रतिबद्धता उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये टप्प्याटप्प्याने हा ब्रँड उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
3) आंतरराष्ट्रीय बाजारपेठा: विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये विस्तारणारी उपस्थिती
• एबीडीने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीतील ३६ देशांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ३९ देशांमध्ये आपला आंतरराष्ट्रीय विस्तार केला.
• एबीडीचा नवीन मिलियनेर ब्रँड आयकॉनिक व्हाईट १० आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सादर करण्यात आला आहे, यामुळे भारताबाहेर ब्रँडच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या विस्तारास पाठबळ मिळत आहे.
• एबीडी माएस्ट्रो (सुपर-प्रीमियम ते लक्झरी पोर्टफोलिओ) चा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार सुरूच राहिला; आता कॅनडा, आयव्हरी कोस्ट, न्यूझीलंड, रवांडा, सिएरा लिओन आणि युएईमध्ये उपलब्ध आहे. आर्थोस ब्लेंडेड माल्ट व्हिस्की, झोया जिन आणि वूडबर्न्स व्हिस्की सोबत आता रंगीला व्होडका, एओडीएच आयरिश व्हिस्की आणि येलो डिझायनर व्हिस्की देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत.
4) प्रमुख पुरस्कार आणि सन्मान:
• इमेजएक्सएक्स २०२६ समिट अवॉर्ड्समध्ये रंगीलाला सोशल मीडियाच्या सर्वोत्कृष्ट वापराचा पुरस्कार: एबीडी माएस्ट्रोच्या रंगीलाला प्रतिष्ठित इमेजएक्सएक्स २०२६ समिट अवॉर्ड्समध्ये सोशल मीडियाच्या सर्वोत्कृष्ट वापरासाठी सन्मानित करण्यात आले. यामधून ब्रँडची डिजिटल-प्रथम ग्राहक कटिबद्धता, क्रिएटरवर आधारित कथाकथन आणि ट्रेंडसेटर्सच्या उत्साही समुदायासोबत असलेला दृढ संबंध दिसून येतो.
• रंगापूर केंद्राला बेस्ट फॅक्टरी/मॅनेजमेंट अवॉर्ड प्राप्त: तेलंगणातील रंगापूर येथील एबीडीच्या एकात्मिक उत्पादन केंद्राला तेलंगणा सरकारच्या कामगार, रोजगार, प्रशिक्षण आणि कारखाने विभागातर्फे बेस्ट फॅक्टरी/मॅनेजमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामधून तेथील उत्तम उत्पादन पद्धती आणि कार्यपद्धतीतील शिस्त अधोरेखित होते.
• आयकॉन्स ऑफ व्हिस्की इंडिया अवॉर्ड्स २०२६: एबीडी माएस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडला १५व्या आयकॉन्स ऑफ व्हिस्की इंडिया अवॉर्ड्स २०२६ मध्ये ‘डिस्टिलर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त, आर्थोस ब्लेंडेड माल्ट स्कॉच व्हिस्कीला “कॅम्पेन इनोव्हेटर ऑफ द इयर” म्हणून गौरवण्यात आले. यावरून कंपनीचे गुणवत्ता, नाविन्यता आणि प्रीमियम ब्रँड उभारणीवरील लक्ष अधोरेखित होते.