अबू धाबी नॅशनल इन्शुरन्स कंपनीने भारतात शाखा स्थापन करण्यासाठी मंजूरी मिळवली

News Service
  • एडीएनआयसीला भारतातील गिफ्ट सिटीमध्ये कामकाज सुरू करण्याचा परवाना मिळाला.
  • या टप्‍प्‍यामधून कंपनीचा सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय विस्तार आणि वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांप्रती कटिबद्धता दिसून येते.
  • भारतातील शाखा विद्यमान सीमापार पुनर्विमा कामकाजाला अधिक दृढता देईल आणि यूएई व भारत यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत करेल.

अबू धाबी, यूएई, २१ एप्रिल २०२६: अबू धाबी नॅशनल इन्शुरन्स कंपनी (एडीएनआयसी) या कॉर्पोरेट आणि वैयक्तिक ग्राहकांसाठी अग्रगण्य प्रादेशिक मल्टी-लाइन विमा प्रदाता कंपनीने गुजरातमधील भारतातील पहिले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (आयएफएससी) गिफ्ट सिटी येथे पुनर्विमा व्यवसाय करण्यासाठी परवाना प्राप्‍त केला आहे. हा परवाना १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला आहे.

ही मंजूरी एडीएनआयसीच्या आंतरराष्ट्रीय विस्तार धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीने नुकतेच सौदी अरेबियाच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे आणि आता भारतातील आपल्या विद्यमान सीमापार पुनर्विमा व्यवसायाला अधिक दृढता दिली आहे.

भारतातील या शाखेमुळे उत्पन्‍नाचे स्रोत वैविध्यपूर्ण होण्यास आणि वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील ग्राहकांसाठी सेवा क्षमता वाढवण्यास मदत होईल, ज्यामुळे एडीएनआयसीच्या दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टाला अनुसरून ही शाखा यूएई व भारत यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यास हातभार लावेल.

या मंजुरीमधून यूएईच्‍या व्यावसायिक वातावरणाची स्थिरता दिसून येते. प्रादेशिक घडामोडी बदलत असतानाही येथील कंपन्या आपली धोरणात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्‍न करत आहेत. एडीएनआयसीच्‍या भारतातील प्रवेशामधून कंपनीची दीर्घकालीन वाढीप्रती कटिबद्धता दिसून येते आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीसह प्रादेशिक विमा कंपनी म्हणून कंपनीचे स्थान अधिक प्रबळ झाले आहे.

एडीएनआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरालामपोस मायलोनास म्हणाले: “गिफ्ट सिटीमध्ये कार्य करण्यासाठी परवाना मिळणे हा एडीएनआयसीच्या आंतरराष्ट्रीय वाढीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे भारत-यूएई आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्यासोबत भारतातील आमचे ग्राहक आणि भागीदारांना पाठबळ देण्याची आमची दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. आमची जागतिक उपस्थिती वाढवत असताना वेगाने बदलणाऱ्या बाजारपेठेत विश्वासार्ह आणि वैयक्तिक गरजांनुसार विमा उपाय प्रदान करणे आणि कार्यात्मक स्थिरता राखणे, यावर आमचा भर कायम राहील.”

एडीएनआयसी ग्रुप जगभरात विमा आणि पुनर्विमा सेवा प्रदान करतो. सध्या या ग्रुपची यूएई, सौदी अरेबिया आणि युनायटेड किंगडममध्ये कार्यालये आहेत, तसेच, भारतातील शाखा त्यांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा अधिक विस्तार करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button