Medical expenses can arise even when hospitalisation is not needed. Doctor consultations, prescribed medicines, diagnostic tests,…
Author: Prashant Ovhal
भारतातील तरुणांमध्ये नियोजित कर्ज घेण्याचा वाढता कल/ अनुभवाधारित खर्चामुळे भारतात वैयक्तिक कर्जाची नवी लाट
एआय-आधारित अंडररायटिंग आणि कर्ज अंतिम पर्यायाऐवजी एक आर्थिक साधन मानणाऱ्या कर्जदारांच्या नवीन पिढीमुळे भारतातील वैयक्तिक कर्ज क्षेत्र वेगाने बदलत आहे भारतात वैयक्तिक कर्जाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होत आहे. एकेकाळी प्रामुख्याने आणीबाणी किंवा आर्थिक अडचणींशी जोडली जाणारी वैयक्तिक कर्जे आता आकांक्षी आणि व्यावहारिक अशा दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजित आर्थिक साधन म्हणून वापरली जात आहेत. हा बदल विशेषतः तरुण ग्राहक आणि श्रीमंत कर्जदारांमध्ये दिसून येत आहे, जे दीर्घकालीन गुंतवणुकीला धक्का न लावता मोक्याच्या वेळी कर्जाचा वापर करण्यास अधिक सोयीस्कर मानत आहेत. कोटक महिंद्रा बँकेचे पर्सनल लोन्सचे बिझनेस हेड अमित पाठक म्हणाले, “हा बदल दोन समांतर प्रवाहांमुळे होत आहे: कर्जदारांच्या वर्तनातील बदल आणि एआय-आधारित अंडररायटिंगचा वाढता वापर. जलद, सुलभ आणि अधिक स्थिर कर्जाच्या उपलब्धतेकडे ग्राहकांची अपेक्षा बदलत आहे, तसतसे बँका देखील अधिक स्मार्ट जोखीम मूल्यांकन आणि फसवणूक शोधण्याच्या क्षमतेमध्ये गुंतवणूक करत आहेत”. या बदलाचा मुख्य चालक म्हणजे अनुभवाधारित कर्जाबाबत वाढणारी सुविधा होय. तरुण ग्राहक, विशेषतः जेन झी आणि पहिल्यांदाच कमाई करणारे प्रवास, लग्नसराई, जीवनशैलीतील खरेदी आणि आयुष्यातील इतर महत्त्वाच्या अनुभवांसारख्या ऐच्छिक खर्चासाठी कर्जाचा वापर करण्यास उत्सुक आहेत. कर्जाकडे सावधगिरीने पाहणा-या पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत तरुण कर्जदार कर्जाकडे साधन म्हणून पाहतात, जे त्यांना भविष्यातील कमाईच्या क्षमतेनुसार वर्तमान आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. तसेच, नियोजित कर्जाच्या या वाढीसोबत जबाबदार कर्ज व्यवहाराची प्रबळ संस्कृती निर्माण होत आहे, ज्यामध्ये ग्राहक शिस्तबद्धपणे परतफेड, उत्तम क्रेडिट स्कोअर राखणे आणि स्वतःच्या क्षमतेनुसार कर्ज घेण्याला अधिक महत्त्व देत आहेत. विशेष म्हणजे, कर्जाची ही वाढती मागणी परतफेड वर्तनावर नकारात्मक परिणाम करत आहे असे नाही. वाढती आर्थिक साक्षरता, क्रेडिट स्कोअरची जाणीव आणि शिस्तबद्धपणे परतफेड करण्याची उत्तम समज यामुळे अधिक जबाबदार कर्ज पद्धतीला प्रोत्साहन मिळत आहे. आज कर्जदार उत्तम क्रेडिट व्यवहार राखण्याबाबत आणि एकाच वेळी अनेक कर्जे घेण्यासारख्या गोष्टी टाळण्याबाबत अधिक जागरूक आहेत. तसेच, बँका एआय व मशीन लर्निंग-आधारित अंडररायटिंग मॉडेल्सद्वारे कर्जाचे मूल्यांकन आणि वितरण करण्याच्या पद्धतीत बदल करत आहेत. कर्जाची प्रक्रिया अधिक डिजिटल होत आहे, तसे एआय जलद, अधिक अचूक आणि सुरक्षित निर्णय घेण्यास सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही मॉडेल्स नियमन आराखड्याच्या अंतर्गत तयार आणि लागू केली जात आहेत, ज्यामध्ये मानवी देखरेख देखील निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बँका कर्ज मंजुरीचे निर्णय घेण्यासाठी केवळ एआयच्या आउटपुटवर अवलंबून नाहीत. व्यापक अंमलबजावणीपूर्वी मॉडेल्सची लहान गटांवर चाचणी केली जाते, ज्याचे निकाल वेळेनुसार तपासून सुधारले जातात. यामुळे अंडररायटिंग मॉडेल्सची अचूकता सुधारण्यास मदत होते, तसेच फसवणूक शोधण्याची क्षमता दृढ होते आणि सायबर धोके किंवा ओळखपत्रांचा गैरवापर यांच्याशी संबंधित धोके कमी होतात. धनकोंना (कर्जदात्यांना) कमी कालावधीत ग्राहकांच्या डेटाच्या मोठ्या प्रमाणाचे विश्लेषण करण्याची सुविधा देऊन एआय अंडररायटिंग प्रक्रियेत अधिक सुधारणा करत आहे. यामुळे अधिक सूक्ष्म जोखीम मूल्यांकन, डिफॉल्टचे अधिक अचूक अंदाज आणि उत्तम दर ठरवणे शक्य होत आहे. सुधारित जोखीम शोध प्रक्रियेमुळे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स कमी होतात आणि अधिक कार्यक्षम कर्ज वितरणास पाठबळ मिळते, ज्याचा शेवटी बँका आणि कर्जदार या दोघांनाही फायदा होतो. दुसरा एक नवा प्रवाह म्हणजे श्रीमंत ग्राहकांकडून लिक्विडिटी मॅनेजमेंट टूल (रोख रकमेच्या नियोजनाचे साधन) म्हणून वैयक्तिक क्रेडिट लाईन्सचा केला जाणारा वापर. अल्पमुदतीच्या रोख रकमेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीचे पैसे काढून घेण्याऐवजी अनेक ग्राहक चक्रवाढ परतावा सुरक्षित ठेवून त्वरित रोख रक्कम मिळवण्यासाठी लवचिक क्रेडिट उत्पादनांचा वापर करत आहेत. ही विचारसरणीतील एक व्यापक बदल दर्शवते, जिथे कर्जाकडे केवळ आर्थिक अडचणीचे लक्षण म्हणून न पाहता अधिक स्मार्ट आर्थिक नियोजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे.
In India Among young people Planned Loan To take Growing Based on inclination / experience Due to cost In India Personal Loan New Wave
AI – based Underwriting And Loan Final Instead of an alternative One Financial Tool Believers Debtors New Because of generation In India Personal Loan Area Fast Changing Is In India Personal Loan In the method Big Change Happening There is . Once upon a time Mainly Emergency Or Financial With difficulties Added Going Personal Loans Now Aspiring And Practical Such Both Needs Complete To Planned Financial Tool Therefore Used Caste There…
Hiffin Receives Strong Industry Response at Photo Video Asia 2026 in New Delhi
New Delhi, September 4, 2026: Hiffin, a growing name in the imaging and photography accessories segment, received…
इंद्रियाने फिनिक्स मार्केटसिटीतील नवीन स्टोअरसह मुंबईत साधला विस्तार
मुंबई, ४ सप्टेंबर २०२६: आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाने फिनिक्स मार्केटसिटी येथे आपल्या नवीन स्टोअरचे उद्घाटन…
Indriya strengthens Mumbai presence with its new store at Phoenix Marketcity
The new Indriya store offers over 37,000 jewellery designs across bridal, festive, contemporary, and everyday wear…
Coke Studio Bharat Reimagines Marwari Folk with ‘Hivde Ro Haar’
National, September 2026: Coke Studio Bharat returns with the fifth release of Season 4, bringing back…
बांधकाम उपकरण उद्योगाने आयसीईएमए वार्षिक सत्र २०२६ मध्ये ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाणाऱ्या मार्गाची आखणी केली
केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, नीती आयोगाचे सदस्य डॉ. आर. बालसुब्रमण्यम…
Construction Equipment Industry Charts the Road to a Trillion-Dollar Economy at ICEMA Annual Session 2026
Union Minister H.D. Kumaraswamy and Union Minister G. Kishan Reddy, along with NITI Aayog Member Dr.…
Construction Equipment Industry Charts the Road to a Trillion-Dollar Economy at ICEMA Annual Session 2026
Union Minister H.D. Kumaraswamy and Union Minister G. Kishan Reddy, along with NITI Aayog Member Dr.…