मुंबई, ४ सप्टेंबर २०२६: आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाने फिनिक्स मार्केटसिटी येथे आपल्या नवीन स्टोअरचे उद्घाटन केले आहे, यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे. या उद्घाटनासह, ब्रँडची आता संपूर्ण महाराष्ट्रात १६ स्टोअर्स झाली आहेत, जी राज्यातील त्यांच्या सतत रिटेल विस्तारातील आणखी एक पाऊल दर्शवते.
मुंबईतील प्रमुख रिटेल आणि लाईफस्टाईल ठिकाणांपैकी एक असलेल्या फिनिक्स मार्केटसिटीमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेले हे स्टोअर ग्राहकांना दागिन्यांचा आपुलकीचा, नयनरम्य आणि ग्राहक-केंद्रित अनुभव देण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. ३७,००० हून अधिक डिझाइन्सचे कलेक्शन असलेल्या या स्टोअरमध्ये वधूचे दागिने, सणासुदीचे कलेक्शन, समकालीन अत्याधुनिक दागिने आणि हलक्या वजनाचे दैनंदिन वापराचे दागिने यासारख्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण केल्या जातात. इंद्रियाच्या डिझाइन-फर्स्ट तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब दर्शवणारे हे स्टोअर पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक सौंदर्याचा संगम घडवून आणते. तसेच, ब्रायडल लाउंज आणि कारागिरी रूम यांसारख्या खास जागा व्यक्ती आणि कुटुंबांसाठी अधिक वैयक्तिकृत व उत्साहित खरेदीचा अनुभव प्रदान करतात.
या लाँचसह, इंद्रिया पश्चिम भारतात आपला विस्तार अधिक दृढ करत आहे, तसेच आपला विस्तृत दागिन्यांचा पोर्टफोलिओ आणि सिग्नेचर इन-स्टोअर अनुभव मुंबईतील ग्राहकांच्या अधिक जवळ घेऊन येत आहे.
या प्रसंगी मत व्यक्त करत इंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्हणाले, “मुंबई अशी बाजारपेठ आहे, जिथे दागिने हे परंपरा, आकांक्षा आणि व्यक्तिगततेचा संगम साधतात. येथील ग्राहक सातत्याने बदलणाऱ्या डिझाइन ट्रेंड्सशी जोडलेले आहेत, तरीही ते कारागिरी, गुणवत्ता आणि दागिन्यांशी जोडलेल्या भावनिक मूल्यांना अधिक महत्त्व देतात. यामुळे ग्राहकांना दागिन्यांची खरेदी करण्याच्या अनेक प्रसंगांमध्ये ते कसे शोधतात आणि जुडले जातात याचा पुनर्विचार करण्याची संधी आम्हाला मिळते. मुंबईतील आमचा वाढता विस्तार हा बदलत्या ग्राहक वर्गावरील आमचा विश्वास दर्शवतो आणि फिनिक्स मार्केटसिटीमधील आमचे नवीन स्टोअर आम्हाला मुंबईच्या या गतिमान रिटेल क्षेत्रात ग्राहकांसाठी व्यापक डिझाइन शैली आणि अधिक आकर्षक रिटेल अनुभव आणण्याची संधी देते.”
इंद्रिया संपूर्ण भारतात आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार करत असताना ब्रँडच्या वाढीमध्ये महाराष्ट्र धोरणात्मक बाजारपेठ राहिली आहे. हे नवीन स्टोअर विचारपूर्वक डिझाइन केलेल्या जागा, आधुनिक कारागिरी आणि दागिन्यांच्या भव्य अनुभवांद्वारे ग्राहकांशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याच्या इंद्रियाच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते, तसेच प्रत्येक खरेदीमध्ये डिझाइन, भावना आणि वैयक्तिकता शोधणाऱ्या भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी पसंतीचे दागिन्यांचे ठिकाण म्हणून आपले स्थान दृढ करते.