Blog
On National Doctors' Day, Health Department Honours M3M Foundation for Advancing Primary Healthcare Through 'Kartavya' Initiative
Recognising its continued contribution towards strengthening public healthcare and improving access to quality health services, the…
Jodhpur Emerges as One of India's Fastest Growing Startup Hubs Marwari Catalysts' Plays a Vital Role in this Ecosystem
Do You Know ASG Eye Hospital, Utkarsh, Marwari Catalysts INKA, NPrep, Leapahead, UR Turms,Elara IVF, Dopahar,…
Finkurve Financial Services Limited – Arvog Raises Rs 50 Crore Through NCD Issuance from Franklin Templeton to Accelerate Growth and Business Expansion
Finkurve Financial Services Limited, one of India’s leading tech-first gold loan NBFCs, raises Rs. 50 crore through…
Kerakoll Strengthens H40 Family, Reinforcing H40 Gel Legacy and Introducing Next-Generation Adhesive Solutions in India
Kerakoll, a global leader in sustainable building solutions, continues to advance innovation in tile adhesives with…
Natixis CIB Bolsters Technology and Innovation Hub in India with Strategic Leadership Appointment
Hong Kong Natixis Corporate & Investment Banking (Natixis CIB) is pleased to announce the appointment of…
The World is Falling in Love with Ranch, and Here's a Walnut-Powered Twist
If you’ve been following football coverage lately, you’ve probably noticed an unexpected star emerging off the…
Turkish Airlines Announces Flight Resumptions, Restoring Middle East Network
Turkish Airlines, the airline that flies to more countries than any other in the world, continues…
NEW ZEALAND IS WORTH A ‘SPECIAL JOURNEY’
The MICHELIN Guide New Zealand 2026 Restaurant Selection debuts with 110 establishments, including 15 MICHELIN Star…
हिरो मोटोकॉर्पने आंध्र प्रदेशमध्ये ३२०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली तिरुपतीमध्ये फ्यूचर रेडी ग्लोबल पार्ट्स सेंटरचे भूमिपूजन
शाश्वत विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स आणि स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज तिरुपती, आंध्र प्रदेश येथे आपल्या दुसऱ्या ‘ग्लोबल पार्ट्स सेंटर’च्या (जीपीसी) भूमिपूजन समारंभासह राष्ट्र उभारणीच्या मोहिमेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला. हा ऐतिहासिक प्रकल्प ७५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीला दर्शवतो, जो कंपनीच्या ३,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या विस्तृत गुंतवणुकीच्या आराखड्याचा पाया आहे. या गुंतवणूकीचा उद्देश तिरुपतीला जागतिक दर्जाचे मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी हब बनवणे हा आहे, ज्यामुळे हिरो मोटोकॉर्पची जागतिक पुरवठा साखळी अधिक दृढ होईल आणि ऑटोमोटिव्ह व ईव्ही परिसंस्थेमधील भारताचे स्थान अधिक प्रबळ होईल. आंध्र प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री. एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, “हिरो मोटोकॉर्प आंध्र प्रदेशच्या विकास प्रवासात आणि विशेषतः रायलसीमा भागाच्या कायापालटमध्ये अत्यंत महत्त्वाचे भागीदार राहिले आहे. तिरुपतीमध्ये ग्लोबल पार्ट्स सेंटर स्थापन करण्याचा कंपनीचा निर्णय आमच्या राज्याची प्रगतीशील धोरणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार-अनुकूल परिसंस्थ आणि स्पीड ऑफ डुइंग बिझनेसप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेची पावती आहे. गेल्या काही वर्षांत, हिरो मोटोकॉर्पच्या उपस्थितीमुळे हजारो रोजगार निर्माण झाले आहेत, स्थानिक पुरवठा साखळी दृढ झाली आहे, कौशल्य विकास झाला आहे आणि रायलसीमा व संपूर्ण आंध्र प्रदेशच्या आर्थिक विकासाला गती मिळाली आहे. आम्हाला हा सहयोग अधिक दृढ होताना पाहून अत्यंत आनंद होत आहे. ही ऐतिहासिक गुंतवणूक तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करेल, रायलसीमाच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेला मजबूत करेल आणि तिरुपतीला भारतातील आघाडीचे मॅन्युफॅक्चरिंग, मोबिलिटी आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून स्थापित करेल. रायलसीमा हे उद्योग, नाविन्यता आणि प्रगत उत्पादनाचे मोठे केंद्र म्हणून उदयास येत असताना यासारखे सहयोग भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. आम्ही हिरो मोटोकॉर्पने आंध्र प्रदेशवर दाखवलेल्या निरंतर विश्वासाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही नाविन्यतेला चालना देणारी, दर्जेदार रोजगार निर्माण करणारी आणि सर्वांसाठी शाश्वत समृद्धी आणणारी भविष्यवेधी व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक औद्योगिक परिसंस्था तयार करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.” हिरो मोटोकॉर्पचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉ. पवन मुंजाळ म्हणाले, “हिरो मोटोकॉर्पमध्ये आमचा नेहमी विश्वास राहिला आहे की, व्यवसायाची वाढ आणि राष्ट्र उभारणी या एकत्र उपयुक्त ठरतात. तिरुपतीमधील आमच्या दुसऱ्या ग्लोबल पार्ट्स सेंटरचे भूमिपूजन हा आमच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. हा निर्णय भारताच्या भविष्यावरील आमचा सखोल विश्वास आणि आंध्र प्रदेशच्या विकासाच्या दृष्टीकोनाला दर्शवतो. तिरुपतीला मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी हबमध्ये रूपांतरित करून ही गुंतवणूक आमच्या जागतिक पुरवठा साखळीला अधिक सक्षम करेल, विविध बाजारपेठांमधील आमच्या विस्ताराला पाठबळ देईल आणि ‘मेड इन इंडिया, फॉर इंडिया अँड द वर्ल्ड’ या आमच्या कटिबद्धतेला दृढ करेल. माझे वडील, आमचे संस्थापक आणि चेअरमन एमेरिटस डॉ. बृजमोहन लाल मुंजाळ यांच्या जयंतीदिनी हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे अत्यंत खास क्षण आहे. त्यांचा दीर्घकाळ टिकणाऱ्या संस्थांच्या उभारणीवर आणि भविष्यासाठी नेहमी सज्ज राहण्यावर विश्वास होता. माझे पूजनीय वडील डॉ. बृजमोहन लाल मुंजाळ यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त या प्रकल्पाची सुरुवात करणे हृदयस्पर्शी आहे. एक खरे दूरदर्शी नेते म्हणून त्यांनी विश्वासाचे समर्थन केले की, महान संस्था केवळ वर्तमानात टिकून राहण्यासाठी तयार केल्या जात नाहीत, तर भविष्याचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना सक्रियपणे आकार दिला जातो. हे केंद्र त्यांच्या दूरदृष्टीला, मूल्यांना आणि भारताच्या क्षमतेवरील त्यांच्या अढळ विश्वासाला वाहिलेली एक नम्र मानवंदना आहे. मला पूर्ण खात्री आहे की, हे नवीन केंद्र त्यांचा उद्योग, उद्देश आणि राष्ट्रसेवेचा वारसा अभिमानाने पुढे नेईल.” भारतासाठी निर्मिती, जगाला पुरवठा हे आगामी ग्लोबल पार्ट्स सेंटर हिरो मोटोकॉर्पच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पेअर पार्ट्सच्या कामकाजासाठी धोरणात्मक केंद्र म्हणून काम करेल. आमच्या इलेक्ट्रिक वेईकल पोर्टफोलिओमधील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के वेईकल्सचे डिझाइन, इंजिनिअरिंग आणि उत्पादन पूर्णपणे तिरुपती प्लांटमध्ये केले जाते. या गुंतवणूकीमुळे प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता वेगाने वाढून १.२–१.५ दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे भविष्यातील गतिशीलतेसाठी भारतातील प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून तिरुपतीचे स्थान अधिक दृढ होईल. रोजगार संधींची निर्मिती या विस्तारामुळे जवळपास ४,००० रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ही रोजगार निर्मिती केंद्र सरकारच्या विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय संकल्पनेशी आणि आंध्र प्रदेश सरकारच्या स्वर्णांध्र संकल्पनेशी सुसंगत आहे. केवळ रोजगार निर्मितीच्या पलीकडे जाऊन हे ग्लोबल पार्ट्स सेंटर या भागात दीर्घकालीन फायदे मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. सामाजिक सक्षमीकरण शाश्वत विकासासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवत हिरो मोटोकॉर्पने आंध्र प्रदेश सरकारसोबत सहयोगाने
HERO MOTOCORP ANNOUNCES RS 3200+ CRORE INVESTMENT IN ANDHRA PRADESHBREAKS GROUND FOR FUTURE READY GLOBAL PARTS CENTRE IN TIRUPATI
Reinforcing its commitment to sustainable growth and community empowerment, Hero MotoCorp, the world’s largest manufacturer of…