राष्ट्रीय, जुलै, २०२६: कोका-कोलाची “द लॉस्ट व्हॉइसेस” ही भारतातील निस्सीम फुटबॉल चाहत्यांचा गौरव करण्यासाठी डिझाइन करण्यात…
Category: Business
Pay10 Enabling Women Entrepreneurs to Overcome Cross-Border Trade Challenges
National, India – As women-led businesses emerge as one of the fastest-growing segments within India’s MSME…
पे१० महिला उद्योजकांना क्रॉस-बॉर्डर (आंतरराष्ट्रीय) व्यापारातील आव्हानांवर मात करण्यासाठी सक्षम करत आहे
राष्ट्रीय, भारत – भारतातील एमएसएमई परिसंस्थेमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून उदयास येत असताना पे१० द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या शहरांमधील महिला उद्योजकांना प्रादेशिक व जागतिक व्यापारात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी सक्षम करण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. भारतामध्ये वाढत्या डिजिटल स्वीकारार्हतेमुळे महिला उद्योजक टेक्सटाईल्स, हस्तनिर्मित उत्पादने, सौंदर्य उत्पादने, फूड प्रोसेसिंग, लाइफस्टाइल उत्पादने आणि डिजिटल सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये आपले व्यवसाय उभे करत आहेत. असे असले तरी सुलभ क्रॉस-बॉर्डर पेमेंट पायाभूत सुविधा, नियामक सहाय्य आणि जलद पेमेंट सेटलमेंट्स मिळणे हे अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वाढवण्याच्या मार्गातील मोठे अडथळे ठरत आहेत. महिलांच्या नेतृत्वाखालील कंपन्या देखील भारताच्या निर्यात परिसंस्थेमध्ये आपले योगदान सातत्याने वाढवत आहेत. भारतातील महिला उद्योजक प्रगतीशीलपणे जागतिक व्यापारात गुंतत आहेत आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी पे१० च्या क्रॉस-बॉर्डर पेमेंट सोल्यूशन्ससारख्या डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधेचा प्रभावी वापर करत आहेत. डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मची वाढ आणि भारतातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसाठी जागतिक स्तरावर वाढणारी मागणी यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमई आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. नुकतेच निर्यात व लॉजिस्टिक ट्रॅकिंग डेटानुसार, महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांचा वाटा आता भारताच्या एकूण निर्यात प्रमाणात जवळपास ८ टक्के आहे आणि अधिक महिला उद्योजकांना औपचारिक कर्ज व डिजिटल व्यवसाय पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हा वाटा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांची निर्यात क्रियाक्रिलाप आता जागतिक स्तरावर ४० हून अधिक देशांमध्ये पसरलेली आहे. युनायटेड स्टेट्सला होणाऱ्या तयार कपड्यांच्या निर्यातीसारख्या विशिष्ट श्रेणींमध्ये भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांचा वैशिष्ट्यपूर्ण विभागांमध्ये जवळपास ३३ टक्के मार्केट शेअर असल्याचा अंदाज आहे. महिला उद्योजक प्रमुख गंतव्य बाजारपेठांमधून सक्रियपणे आंतरराष्ट्रीय पेमेंट्स गोळा करत आहेत, त्यामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ३३ टक्के हिश्श्यासह आघाडीवर आहे, त्यानंतर यूएईचा वाटा साधारणपणे १५ टक्के ते २० टक्के आणि मलेशियाचा वाटा १५ टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे. पे१० प्रादेशिक बाजारपेठांमध्ये जलद, सुरक्षित आणि नियमांनुसार व्यवहारांना सक्षम करणाऱ्या तंत्रज्ञान-आधारित आर्थिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून व्यवसायांसाठी क्रॉस-बॉर्डर पेमेंट प्रक्रिया सुलभ करून या आव्हानांचे निराकरण करत आहे. अॅस्पायर फॉर हरच्या २०२५ च्या अहवालानुसार, भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील जवळपास ८० टक्के व्यवसायांना आंतरराष्ट्रीय पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागतो, तर ६० टक्के व्यवसायांना निर्यात कायदे आणि अनुपालन आवश्यकतांसंदर्भात संघर्ष करावा लागतो. अधिकाधिक महिला उद्योजक जागतिक बाजारपेठेत विस्तार करत असताना पे१० सारखे फिनटेक प्लॅटफॉर्म्स सुव्यवस्थित क्रॉस-बॉर्डर पेमेंट पायाभूत सुविधा, सुधारित व्यवहार दृश्यमानता आणि एकात्मिक अनुपालन क्षमतांद्वारे ही आव्हाने दूर करण्यात मदत करत आहेत. या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे की, वाढत्या उद्योजकीय महत्त्वाकांक्षेनंतर देखील भारतातील ५८.५ दशलक्ष व्यवसायांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांचा वाटा केवळ १५.४ टक्के आहे. तसेच, भारतातील महिलांमधील डिजिटल उद्योजकतेमध्ये अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे. टाइड इंडियाकडून मिळालेल्या डेटानुसार, डिजिटल बिझनेस टूल्सचा वापर करणाऱ्या महिला उद्योजकांपैकी ९६ टक्के महिला उद्योजक द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या शहरांमधील आहेत. गेल्या वर्षभरात महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांच्या डिजिटल स्वीकारार्हतेमध्ये २८२ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. भारतातील व्यापक एमएसएमई परिसंस्थेमध्ये देखील महिलांच्या सहभागात लक्षणीय वाढ होत आहे. २०२५ मध्ये संसदेत सादर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईंच्या नोंदणीने २.८६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे, जे देशभरातील महिलांच्या मालकीच्या उद्योगांचे वेगाने होत असलेले औपचारिकीकरण अधोरेखित करते. या बदलत्या परिस्थितीबाबत मत व्यक्त करत पे१० इंडियाचे सीईओ डॉ. अतुल मेहता म्हणाले, “लहान शहरांमधील महिला उद्योजक भारताच्या डिजिटल कॉमर्स आणि निर्यात वाढीच्या गाथेमध्ये महत्त्वाच्या योगदानकर्त्या बनत आहेत. असे असूनही, त्यांच्यापैकी बहुतेकांना अजूनही आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये अडचणी, विलंबाने होणारे पेमेंट सेटलमेंट्स, पारदर्शकतेचा अभाव आणि ऑपरेशनल गुंतागुंत यांचा सामना करावा लागतो. पे१० मध्ये, आम्ही सुलभ क्रॉस-बॉर्डर पेमेंट अनुभव प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतो, जो या व्यवसायांना स्थानिक बाजारपेठांच्या पलीकडे अधिक आत्मविश्वासाने विस्तार करण्यास सक्षम करेल.” प्रादेशिक व्यापार सहभागाला चालना पे१० च्या क्रॉस-बॉर्डर क्षमतांचा मुख्य उद्देश महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना उच्च-वाढ असलेल्या प्रादेशिक व्यापार कॉरिडोर्स, भारत-जीसीसी बाजारपेठा, आग्नेय आशिया, दक्षिण आशियाई व्यापार परिसंस्था आणि उदयोन्मुख डिजिटल कॉमर्स मार्गांमध्ये अधिक प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी मदत करणे हा आहे. सोपी पेमेंट वर्कफ्लो, जलद व्यवहार दृश्यमानता आणि नियमांनुसार असणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधा याद्वारे पे१० चा भारतातील नॉन-मेट्रोमधून आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या उद्योजकांना पाठिंबा देण्याचा मनसुबा आहे. जयपूरमधील एका महिला टेक्सटाईल (कापड) निर्यातदाराचा विचार करा, जी यूएई आणि सिंगापूरमधील ग्राहकांना हस्तनिर्मित उत्पादने विकते. तिच्या उत्पादनांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी सातत्याने वाढत असताना क्रॉस-बॉर्डर पेमेंट्स व्यवस्थापित करणे हे मोठे आव्हान होते. पेमेंटमधील विलंब, व्यवहारांची मर्यादित दृश्यमानता आणि गुंतागुंतीच्या सेटलमेंट प्रक्रियेमुळे अनेकदा कॅश फ्लोवर परिणाम होत होते. ज्यामुळे इन्व्हेंटरीचे (मालाचा साठा) नियोजन करणे आणि सणासुदीच्या किंवा मागणीच्या हंगामात ऑर्डर्स पूर्ण करणे कठीण जात होते. पे१० च्या डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधेचा लाभ घेत या व्यवसायाला जलद पेमेंट दृश्यमानता, अधिक अंदाज लावता येण्याजोगे सेटलमेंट्स आणि सुव्यवस्थित क्रॉस-बॉर्डर पेमेंट अनुभव मिळाला. वेगवेगळ्या माध्यमांवरून येणाऱ्या पेमेंट्सचा मागोवा घेण्यात वेळ घालवण्याऐवजी हा व्यवसाय आता उत्पादन, ग्राहकांशी असलेले संबंध आणि आंतरराष्ट्रीय विस्तारावर लक्ष केंद्रित करू शकला. भारतातील हजारो एसएमई आणि महिला उद्योजकांसाठी आता परदेशात ग्राहक शोधणे आव्हान राहिलेले नाही, तर जागतिक व्यापाराच्या वेगाशी सुसंगत असणाऱ्या आर्थिक पायाभूत सुविधा मिळवणे हे मुख्य आव्हान आहे. यासंदर्भात पे१० सारखे इंटरऑपरेबल पेमेंट प्लॅटफॉर्म्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, जे व्यवसायांना अधिक आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि नियंत्रणासह आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होण्यास मदत करतात.
ACFI urges CBFC to scrutinise misleading claims on pesticides in The India Story movie before certification
New Delhi, 9th July 2026: Taking cognisance and strong objection to the misleading and unsubstantiated accusations regarding…
Herbalife India Introduces Dates Caramel Variant in its Formula 1 Nutritional Shake Range
Bengaluru, 09 July, 2026 – Herbalife India, a premier health and wellness company, has introduced a…
हर्बालाइफ इंडिया ने लॉन्च किया फॉर्मूला 1 न्यूट्रिशनल शेक का नया डेट्स कैरेमल फ्लेवर
बेंगलुरु, 9 जुलाई 2026: हेल्थ और वेलनेस क्षेत्र की कंपनी हर्बालाइफ इंडिया ने अपने फॉर्मूला 1…
Yamaha’s Performance EV Aerox E launched in India at Rs 2.81 lakh
Developed in India for premium urban mobility, the Aerox E delivers 117-km certified range and 95.5…
Investments in Indian Real Estate Diversify GeographicallyAmid Global Headwinds – Vestian
New Delhi, 8th July 2026: Geographical Diversification on the Rise Unlike the previous quarter, institutional investments in India’s…
कोटकने लाँच केले हौसला २.०, धैर्य आणि दृढनिश्चयाच्या जोरावर पाहिलेल्या स्वप्नांना देणार पाठबळ
तुमचे अनोखे किंवा धाडसी स्वप्न असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत: कोटक मुंबई, ७ जुलै २०२६: कोटक महिंद्रा…
WhatsApp hosts third annual Business Summit in India; announces Meta Business Agent to help businesses engage with customers and run their operations 24/7
Mumbai, July 7, 2026 – At the third edition of its annual Business Summit in Mumbai,…