IMDb द्वारे 2024 च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट व वेब सिरीजची घोषणा

कल्की 2898-एडी हा 2024 चा सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट आहे.हीरामंडी: द डायमंड बाजार ही 2024 ची…

टाटा मोटर्सकडून बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे आपल्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे अनावरण

विविध उद्योगांसाठी आधुनिक जेनसेट्स, इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स आणि अॅक्‍सल्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीचे प्रदर्शन नवी दिल्‍ली, ११ डिसेंबर २०२४:…

व्‍हॉट्सअॅपकडून भारतभरातील लघु व्‍यवसायांना प्रशिक्षित करण्‍यासाठी भारत यात्रा उपक्रमाचा शुभारंभ

डिसेंबर १०, २०२४: व्‍हॉट्सअॅपने आज ‘व्‍हॉट्सअॅप भारत यात्रा’ या अद्वितीय उपक्रमाचा शुभारंभ केला, ज्‍याचा भारतभरातील लघु…

कायनेटिक ग्रीनने डिजिटल डिस्प्ले प्लॅटफॉर्म आणि ॲनालिटिक्स लाँच करण्यासाठी जिओथिंग्‍ज सोबत केली भागीदारी

पुणे, १० डिसेंबर २०२४: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी…

सॅमसंग एजच्या ९व्या पर्वाच्या विजेत्यांनी जिओ टार्गेटिंग व जेनझेड हॉटस्पॉट टॅगिंगमधील नवोन्मेषांच्या माध्यमातून तांत्रिक सोल्यूशन्सचे बदलले रूप

भारत – डिसेंबर ५, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने आपल्या सॅमसंग एज (एम्पॉवरिंग…

एचडीएफसी लाइफच्या ‘लाइफ फ्रीडम इंडेक्स’नुसार (एलएफआय) सर्व ग्राहकवर्गांचा आर्थिक दृष्टिकोन पूर्वपदावर, कोविडनंतरच्या काळात निर्देशांक ९ अंकांनी वर

मुंबई, डिसेंबर ५, २०२४: भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या एचडीएफसी लाइफने लाइफ फ्रीडम इंडेक्सची (एलएफआय)…

दक्षिण आफ्रिकाचे पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले यांच्याकडून भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत कोड शेअरिंग भागीदारी

मुंबई, ५ डिसेंबर २०२४: दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले आणि दक्षिण आफ्रिकन टुरिझन सीईओ…

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत. ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित…

IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा

तृप्ती डिमरी ही‌ 2024 सालची सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार आहे व दुस-या क्रमांकावर दीपिका पदुकोन आहे…

अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण ची महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर दणक्यात एन्ट्री.

“महाराष्ट्राची हास्यजत्रा” कॉमेडीची हॅटट्रीक सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक सरप्राईस पहिल्याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. तिच्यात मुळातच असलेला रांगडेपणा प्रेक्षकांना “तुज माज सपान ” मालिकेतून भावला होता.  तोच अभिनय आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यविरांसोबत रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी भासेहच ठसका आता हास्यजत्रेचा मंचावर पाहायला मिळेल.                        या प्रहसनामध्ये प्राजक्ता सोबत तिच्यासारखाच रांगडा गडी रोहित माने देखील असणार आहे. वनिता खरात, चेतना भट, नम्रता संभेराव देखील या प्रहसनात प्राजक्ता सोबत आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रशासनात काय होणार हि धमाल आपल्याला तेव्हाच समजेल पण एवढं नक्की आहे कि हे धमाल प्रहसन असणार आहे कारण या प्रहसना दरम्यान प्राजक्ता ने चक्क रोहित ला आपल्या खांद्यावर उचलून घेतला आहे. आपल्या रांगडेपणाचा आणि ताकदीची झलक प्राजक्ता ने या प्रहसणादरम्यान प्रेक्षकांना दाखविली आहे. तर पाहायला विसरू नका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” कॉमेडीची हॅटट्रीक सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

error: Content is protected !!
Call Now Button