टाटा मोटर्स आणि बीव्‍हीजी फाऊंडेशनने गूड समरिटन रोड सेफ्टी अॅप विकसित करण्‍यासाठी केली हातमिळवणी

News Service

महाराष्‍ट्रात रस्‍ता सुरक्षा आणि आपत्‍कालीन प्रतिसादामध्‍ये अग्रस्‍थानी

मुंबई, २३ जानेवारी २०२५: टाटा मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या ऑटो व मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स कंपनीने गूड समरिटन रोड सेफ्टी अॅप विकसित करण्‍यासठी आघाडीची ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था बीव्‍हीजी फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. या उपक्रमाचा रस्‍ता सुरक्षा आणि आपत्‍कालीन प्रतिसादामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. सुरक्षित रस्‍ते आणि प्रबळ समुदायांप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत टाटा मोटर्स सुरक्षितता व नाविन्‍यतेमधील आपल्‍या कौशल्‍यांचा फायदा घेत प्‍लॅटफॉर्मच्‍या विकासाचे नेतृत्‍व करत आहे.

विद्यमान अॅम्‍बुलन्‍स डिस्‍पॅच सिस्‍टम्‍समध्‍ये विनासायास एकीकृत होण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या अॅपचा प्रतिसाद वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्‍याचा आणि रस्‍ता अपघातांमधील पीडितांना वेळेवर वैद्यकीय हस्‍तक्षेप मिळण्‍याची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे. सर्वोत्तम इंटरफेस असलेले हे अॅप वापरकर्त्‍यांना आपत्‍कालीन स्थितींमध्‍ये त्‍वरित कृती करत आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट देत गूड समरिटन्‍सप्रमाणे कार्य करण्‍यास सक्षम करेल.

हे अॅप सध्‍या महाराष्‍ट्रातील पालघर जिल्‍ह्यामध्‍ये पायलट तत्त्वावर वापरले जात आहे, तसेच पायलट टप्‍प्‍यावर यशाच्‍या आधारावर हळूहळू राज्‍यातील इतर प्रांतांमध्‍ये विस्‍तारित करण्‍याची योजना आहे.

नॅशनल रोड सेफ्टी मंथच्‍या प्रसंगती मत व्‍यक्‍त करत टीएमपीव्‍ही व टीपीईएमचे चीफ स्‍ट्रॅटेजी ऑफिसर श्री. बालाजी राजन म्‍हणाले, “टाटा मोटर्समध्‍ये आमचा सुरक्षिततेवरील अविरत फोकस भारतातील रस्‍त्‍यांवर वेईकल्‍सच्‍या सुरक्षिततेसाबत सर्वांसाठी रस्‍ते सुरक्षित करण्‍यावर आहे. गूड समरिटन रोड सेफ्टी अॅप रस्‍ते सुरक्षित करण्‍यासाठी आणि व्‍यक्‍तींचे जीवन वाचवण्‍यसाठी तंत्रज्ञान व समुदायाचा फायदा घेण्‍यामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

बीव्‍हीजी फाऊंडेशनचे संचालक श्री. हनमंतराव गायकवाड म्‍हणाले, “आपत्‍कालीन वैद्यकीय सेवांमधील आमच्‍या अनुभवाने आम्‍हाला व्‍यक्‍तींचे जीवन वाचवण्‍यामध्‍ये प्रत्‍यक्षदर्शी बजावणारी महत्त्वाची भूमिका दाखवून दिली आहे. हे अॅप आणि प्रशिक्षण उपक्रमांचा समुदायांना कार्यक्षमपणे प्रतिसाद देण्‍यासाठी ज्ञान व टूल्‍ससह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.”

टाटा मोटर्स वेईकल सुरक्षिततेमध्‍ये अग्रस्‍थानी आहे आणि या सहयोगामधून सुरक्षितता संस्‍कृती निर्माण करण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, जी त्‍यांच्‍या वेईकल्‍समध्‍ये समाविष्‍ट असून व्‍यक्‍ती आणि समुदायांना रस्‍ते सुरक्षित ठेवण्‍याला प्राधान्‍य देण्‍यास प्रेरित करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button