कार्डची माहिती देण्याची गरज नाही; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ७ लाखांहून अधिक हॉटेल्समध्ये मुक्कामाच्या तारखेच्या जवळ पैसे भरण्याची सुविधा
राष्ट्रीय, २२ जुलै २०२६: अनेक भारतीय प्रवाशांसाठी हॉटेल शोधणे ही मोठी अडचण नसते, पण प्रवासाचा आराखडा पूर्णपणे निश्चित होण्यापूर्वी पैसे भरण्याची वेळ येणे ही खरी समस्या असते. हीच अडचण लक्षात घेऊन फ्लिपकार्ट समूहातील क्लिअरट्रिपने आज Book@0 हे नवे फीचर सादर केले आहे. या सुविधेमुळे प्रवासी ₹० मध्ये कोणतेही हॉटेल आणि रूम आरक्षित करू शकतात, त्यासाठी कार्डची माहिती देण्याची आवश्यकता नाही. मुक्कामाच्या तारखेच्या जवळ गेल्यावरच पैसे भरता येतील.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून ७ लाखांहून अधिक हॉटेल्समध्ये उपलब्ध असलेले Book@0 हे फीचर प्रवाशांची एक महत्त्वाची अडचण दूर करते. अनेकदा उत्तम हॉटेल आणि आकर्षक दर मिळत असतानाही प्रवासाचा आराखडा पूर्णपणे निश्चित नसल्याने ग्राहक बुकिंग करण्यास कचरतात. आता ते कोणतीही आर्थिक बांधिलकी न घेता आपल्या पसंतीचे हॉटेल आरक्षित करू शकतील.
Book@0 अंतर्गत ग्राहक हॉटेल आणि रूम निवडून ₹० मध्ये बुकिंग निश्चित करू शकतात. त्यानंतर मुक्कामाच्या तारखेपूर्वी निश्चित कालावधीत क्लिअरट्रिप अॅपद्वारे पेमेंट पूर्ण करता येईल. या सुविधेसाठी कार्ड तपशील देण्याची आवश्यकता नाही, रद्द केल्यास कोणतेही शुल्क नाही, तसेच दरम्यान निवडलेली रूम किंवा मिळालेला दर गमावण्याचीही भीती नाही.
याबाबत अखिल मलिक, हेड – हॉटेल्स, क्लिअरट्रिप म्हणाले, “मोबाईलवरून बुकिंग करणाऱ्या, विशेषतः जनरेशन Z मधील भारतीय प्रवाशांची संख्या वाढत आहे. हे ग्राहक तात्काळ आर्थिक बांधिलकी न घेता प्रवासाचे नियोजन करू इच्छितात. Book@0 हे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे प्रवासी आणि त्यांच्या पसंतीच्या हॉटेलमधील शेवटचा मोठा अडथळा दूर होतो. त्यामुळे आतापर्यंत ऑनलाइन हॉटेल बुकिंगपासून दूर राहिलेल्या अनेक ग्राहकांपर्यंत ही सेवा पोहोचेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
Book@0 ही सुविधा विशेषतः आगाऊ नियोजन करणाऱ्या पर्यटन प्रवाशांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. कारण अशा प्रवासांमध्ये शेवटच्या क्षणी होणारे बदल किंवा बुकिंग रद्द करावे लागल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
भारतातील प्रत्येक प्रवाशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रवास अधिक सोपा व सर्वांसाठी सुलभ करण्याच्या क्लिअरट्रिपच्या व्यापक प्रयत्नांचा Book@0 हा महत्त्वाचा टप्पा आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांत क्लिअरट्रिप हॉटेल बुकिंग आणि मुक्कामाचा अनुभव अधिक सोपा, लवचिक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी आणखी अनेक नवीन सुविधा सादर करणार आहे.